Ban On Visa: या देशात भारतीयांना Visa Free Entry बंद! 1 जानेवारीपासून होणार अंमलबजावणी
भारतीयांसाठी व्हिसा मुक्त प्रवेश बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. 1 जानेवारी 2023 पासून, भारतीय पासपोर्ट धारकांना यापुढे वैध व्हिसाशिवाय...
सर्बिया सरकारने भारतीयांसाठी व्हिसा मुक्त प्रवेश बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. 1 जानेवारी 2023 पासून, भारतीय पासपोर्ट धारकांना यापुढे वैध व्हिसाशिवाय सर्बियाला जाण्याची सुविधा मिळणार नाही. बेकायदेशीर इमिग्रेशन नियंत्रित करण्यासाठी आणि युरोपियन व्हिसा धोरणाच्या आवश्यकतांचे पालन करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलंय.
“सर्बियामध्ये 30 दिवसांपर्यंत राहण्यासाठी सर्व भारतीय पासपोर्ट धारकांसाठी देशात व्हिसा-मुक्त प्रवेशाची व्यवस्था मागे घेण्यात आली आहे,” असं सरकारने एका निवेदनात म्हटले आहे.
यापूर्वी, राजनैतिक आणि अधिकृत भारतीय पासपोर्ट धारकांना 90 दिवसांसाठी व्हिसाशिवाय देशात येण्याची परवानगी होती, तर सामान्य पासपोर्ट धारकांसाठी हा कालावधी 30 दिवसांचा होता.
व्हिसा-मुक्त प्रवेश सर्बियाने सप्टेंबर 2017 मध्ये सुरू केला होता. सर्बियाला जाणारे भारतीय सर्बियाच्या शेजारील देश आणि इतर युरोपीय देशांमध्ये व्हिसा-मुक्त प्रवेश करू शकत नाही. शिवाय या देशांमधून व्हिसा नसल्याशिवाय प्रवास देखील करता येत नाही.
सर्बिया सरकारच्या या घोषणेनंतर, राजधानी बेलग्रेडमधील भारतीय दूतावासाने भारतीय नागरिकांना व्हिसा नियमांमधील बदलाविषयी माहिती देणारा सल्लागार जारी केला.
ॲडव्हायझरीमध्ये म्हटले आहे की, “1 जानेवारी 2023 पासून सर्बियाला जाणाऱ्या सर्व भारतीय नागरिकांना सर्बिया प्रजासत्ताकमध्ये प्रवेश करण्यासाठी व्हिसा आवश्यक असेल. सर्व भारतीय पासपोर्ट धारकांसाठी सर्बियामध्ये 30 दिवसांपर्यंत राहण्यासाठी व्हिसा-मुक्त प्रवेशाची विद्यमान व्यवस्था सर्बिया सरकारने मागे घेतली आहे. 1 जानेवारी 2023 रोजी किंवा त्यानंतर सर्बियाला भेट देऊ इच्छिणाऱ्या भारतीय नागरिकांनी नवी दिल्लीतील सर्बियाच्या दूतावासात किंवा ते राहत असलेल्या देशात व्हिसासाठी अर्ज करावा.”
या सल्लागारात असेही म्हटले आहे की वैध शेंजेन, यूके व्हिसा किंवा युनायटेड स्टेट्स व्हिसा असलेले किंवा या देशांमध्ये रहिवासी स्थिती असलेले भारतीय अद्याप 90 दिवसांपर्यंत सर्बियामध्ये प्रवेश करू शकतात.