मोदींच्या नेतृत्वाचा अमेरिकेतही डंका; जाता जाता ट्रम्प यांच्याकडून सर्वोच्च गौरव
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाची केवळ भारतालाच नव्हे तर जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेलाही भुरळ पडली आहे. (Trump presents Legion of Merit to PM Narendra Modi for pushing India-US ties)
वॉशिंग्टन: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाची केवळ भारतालाच नव्हे तर जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेलाही भुरळ पडली आहे. त्यामुळे अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाता जाता मोदी यांना Legion of Merit हा अमेरिकेतील सर्वोच्च सन्मान देऊन गौरवले आहे. अमेरिकेतील भारतीय राजदूत तरणजीत सिंग संधू यांनी या पदकाचा स्वीकार केला. अमेरिकेने मोदींना हा सर्वोच्च पुरस्कार दिल्याने त्यांच्या निर्विवाद नेतृत्वावर शिक्कामोर्तब झालं आहे. (Trump presents Legion of Merit to PM Narendra Modi for pushing India-US ties)
अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ओ ब्रायन यांनी व्हाईट हाऊसमध्ये भारतीय राजदूत तरणजीत सिंग संधू यांच्याकडे हे पदक सोपवले. राष्ट्रपती ट्रम्प यांनी भारत आणि अमेरिकेचे संबंध मजबूत करण्यावर भर दिल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना Legion of Merit हे पदक बहाल केलं आहे, असं ब्रायन यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. Legion of Merit हा पुरस्कार अमेरिकेतील सर्वोच्च पुरस्कार आहे. चीफ कमांडर श्रेणीचा हा पुरस्कार असून तो केवळ एखाद्या देशाच्या सरकारला किंवा एखाद्या देशाच्या प्रमुखांनाच दिला जातो.
जागतिक महाशक्तीच्या दिशेने भारताची वाटचाल
भारताला जागतिक महाशक्ती म्हणून नावारुपाला आणण्यासाठी मोदींना हा पुरस्कार दिला आहे. शिवाय त्यांच्या मजबूत नेतृत्व क्षमतेसाठीही या पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी अमेरिका आणि भारताचे संबंध मजबूत करण्यावर भर दिला होता. त्याची दखलही हा पुरस्कार देताना घेण्यात आली आहे.
या देशातील पंतप्रधानांचाही गौरव
या पुरस्काराने मोदींसह ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन आणि जापानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांनाही गौरवण्यात आलं आहे. वॉशिंग्टन डीसीमध्ये झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात या देशांच्या प्रतिनिधींनी या पुरस्काराचा स्वीकार केला. हिंद प्रशांत क्षेत्रात मुक्त व्यापार करण्यास प्रोत्साहन दिल्यामुळे शिंजो आबे यांना तर संयुक्त सुरक्षा आणि ग्लोबल वॉर्मिंगच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी मॉरिसन यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. (Trump presents Legion of Merit to PM Narendra Modi for pushing India-US ties)
मोदींचा या पुरस्कारांनी गौरव
पंतप्रधान मोदींना यापूर्वीही अनेक देशांनी पुरस्कार देऊन गौरवले आहे. 2016मध्ये सौदी अरबने ऑर्डर ऑफ अब्दुल अजीज अल साऊद, स्टेट ऑर्डर ऑफ गाजी अमीर अमानुल्लाह खान, 2018मध्ये स्टेट ऑफ पॅलेस्टाइन पुरस्कार, 2019मध्ये यूएईने ऑर्डर ऑफ जायद पुरस्कार, रशियाने सेंट अँड्र्यू आणि मालदीवने निशान इजुद्दीन पुरस्काराने गौरवले आहे. (Trump presents Legion of Merit to PM Narendra Modi for pushing India-US ties)
VIDEO : TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 21 December 2020https://t.co/5QLxgxiM2G #Top9news #MaharashtraNews
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 21, 2020
संबंधित बातम्या:
अमेरिकेच्या लढाऊ विमान F/A-18 ने सर्वात कठीण परीक्षा उत्तीर्ण केली, भारतीय नौदलाला काय फायदा होणार?
इमरान खान यांना 12 लाखांचा दंड, ‘या’ प्रकरणामुळं पंतप्रधानांनी भरले पैसे?
जो बायडन यांचे ‘भारतीय प्रेम’ पुन्हा एकदा समोर; केरळमधल्या ‘या’ व्यक्तीकडे सोपवली जबाबदारी
(Trump presents Legion of Merit to PM Narendra Modi for pushing India-US ties)