पूर्व तिमोरमध्ये 6.1 रिश्टर स्केलचा भूकंप, आता त्सुनामीचा इशारा, वाचा सविस्तर…

आग्नेय आशियाई देश पूर्व तिमोरमध्ये आज सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. 6.1 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. यानंतर हवामानशास्त्रज्ञांनी हिंदी महासागरात त्सुनामीचा इशारा दिला आहे.

पूर्व तिमोरमध्ये 6.1 रिश्टर स्केलचा भूकंप, आता त्सुनामीचा इशारा, वाचा सविस्तर...
Follow us
| Updated on: May 27, 2022 | 4:38 PM

मुंबई : भूकंपाची शक्यता वर्तण्यात आली होती. ती आता खरी ठरली आहे. पूर्व तिमोरच्या किनार्‍यावर 6.4 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला आहे. युरोपीयन-भूमध्य भूकंप विज्ञान केंद्राने (EMSC) ही माहिती दिली आहे. भूकंपाच्या धक्क्याने परिसरात एक खळबळ उडाली. लोकांनी घरांमधून पळ काढल्याचं पाहायला मिळालं. भूकंपामुळे खूप जास्त नुकसान किंवा जीवितहानी झाली नसल्याची माहिती आहे. पण तरिही भूकंपाचे धक्के मात्र जोरदार जाणवल्याचं स्थानिकांनी सांगितलं. पण याचा हिंदी महासागर क्षेत्रावर परिणाम होण्याची शक्यता आहे. हिंदी महासागरात त्सुनामी (Tsunami) निर्माण होण्याची शक्यता, त्सुनामी सल्लागार समीतीने वर्तवली आहे.

आग्नेय आशियाई देश पूर्व तिमोरमध्ये आज सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. 6.1 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. यानंतर हवामानशास्त्रज्ञांनी हिंदी महासागरात त्सुनामीचा इशारा दिला आहे. आज सकाळी झालेल्या भूकंपामुळे हिंदी महासागरात त्सुनामी येऊ शकते. या भूकंपामुळे हिंदी महासागरात सुनामी येऊ शकते, असं तज्ज्ञ सांगतात. भूकंपामुळे खूप जास्त नुकसान किंवा जीवितहानी झाली नसल्याची माहिती आहे. पण तरिही भूकंपाचे धक्के मात्र जोरदार जाणवल्याचं स्थानिकांनी सांगितलं.

तिमोर बेटाच्या पूर्वेकडील बाजूस 51.4 किमी खोलीवर भूकंप झाला, अशी माहिती यूएस जिओलॉजिकल सर्व्हेने दिली आहे. मागच्या महिन्यात इंडोनेशियामध्ये असाच भूकंप झाला होता. त्याची तीव्रता 6.0 इतकी होती.

पूर्व तिमोर महासागरातील अत्यंत संवेदनशील प्रदेशात येतो. इथे वारंवार भूकंप होत आहेत. फेब्रुवारी महिन्यात उत्तर सुमात्रा बेटावर झालेल्या भूकंपात अनेक जणांचा मृत्यू झाला होता. ‘रिंग ऑफ फायर’ अशी या जागेची ओळख आहे. इथे सतत भूकंप होत असतात.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.