Turkey-Syria Earthquake : तुर्की आणि सीरीयाला पुन्हा भूकंपाचा धक्का, 14 दिवसानंतर तुर्की-सिरियाची स्थिती कशी?
तुर्की आणि सीरिया या देशातील झालेला भूकंप दोन्ही देशांचे मोठे नुकसान करून गेला आहे. याशिवाय 14 दिवस उलटले तरी अद्यापही भूकंपाचे धक्के जाणवत आहे.
अंकारा : तुर्की आणि सिरिया ( Turkey Earthquake ) इथे गेल्या काही दिवसांपासून भूकंपाची मालिका सुरूच आहे. 14 दिवसानंतर तुर्की आणि सिरियाच्या सीमेवरच मोठा भूकंप झाला आहे. 6.4 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप ( Earthquake ) असल्याची नोंद झाली आहे. नव्याने झालेल्या या भूकंपात आणखी तिघांचा बळी गेला असून 200 हून अधिक नागरिक जखमी असल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये अनेक इमारतींचे मोठे नुकसान झाले आहे. तुर्की येथील हाते ह्या प्रांतात भूकंप झाल्याची नोंद करण्यात आली असून मदत कार्य केले जात आहे.
तुर्की आणि सीरिया या देशातील झालेला भूकंप दोन्ही देशांचे मोठे नुकसान करून गेला आहे. याशिवाय 14 दिवस उलटले तरी अद्यापही भूकंपाचे धक्के जाणवत आहे. भारतासह 14 देश तुर्कस्थान आणि सीरियाला मदत करत आहे.
तुर्की आणि सिरिया या दोन्ही देशात भूकंपामुळे हजारोच्या संख्येने जीवित हानी झाली आहे. दोन्ही देशातील इमारतींना मोठ्या प्रमाणात धक्के बसल्याने अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या आहे.
अनेकांचे संसार सुद्धा जमिनीत गेले आहे. तर काहींचा संसार उघड्यावर पडला आहे. अनेक जणांना आपल्या मुलांचा आणि पालकांचा शोध लागत नाही. जीवनच विस्कळीत झाले आहे.
दोन्ही देशात गंभीर परिस्थिती असतांना तुर्की आणि सिरियाच्या सीमेवर हाते प्रांतात भूकंपाचे धक्के बसले आहे. त्यामुळे आधीच धोके दायक स्थितीत असलेल्या अनेक इमारती कोसळल्या आहे.
तुर्की येथे झालेल्या भूकंपाने हजारो नागरिकांचा बळी घेतला आहे. भूकंपाने प्रचंड नुकसान झाले आहे. इतर देशांकडून मदत मिळवत तुर्की आणि सीरिया हे देश पुन्हा उभा राहत आहे.
अनेक नागरिक बेघर झाल्याने त्यांना निवारा म्हणून लवकरच तेथे सरकार कडून घरं बांधून दिली जाणार आहे. साधारणपणे दोन लाख घरं बांधली जणार असल्याची माहिती तुर्कीचे राष्ट्रपती रेसेप तईप यांनी दिली होती.
तुर्की आणि सिरिया येथे पहिला भूकंप हा 6 फेब्रुवारीला झाला होता. त्यावेळी हजारो नागरिकांचा त्यामध्ये बळी गेला होता. यामध्ये भारताच्या एनडीआरएफ पाठवत मदत केली आहे. इतर देशही मदतीला धावले आहेत.
भूकंपामुळे मोठं संकट दोन्ही देशासमोर उभं राहिले आहे. त्यामध्ये आता पुन्हा शहर उभं करण्यासाठी तुर्की आणि सीरिया या दोन्ही देशाला मोठी कसरत करावी लागणार आहे. त्यातच हाते प्रांतात पुन्हा भूकंपाचे धक्के बसल्याने चिंता वाढली आहे.