तुर्कीच्या भूकंपाआधी आकाशात एक धक्कादायक दृश्य, पक्ष्यांनी दिला होता इशारा! VIDEO
पक्ष्यांनी भूकंपावेळी सावध केल्याचा दावा करत तो शेअर केला जात आहे. तुर्कस्तान आणि उत्तर सीरियाच्या अनेक भागांना भूकंपाचा तडाखा बसला आहे.
तुर्कस्तान आणि सीरियामध्ये भूकंपामुळे जवळपास दहा हजार लोकांचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. अनेक इमारती कोसळल्या असून लाखो घरे उद्ध्वस्त झाली आहेत. दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओची जोरदार चर्चा होत आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून असा दावा करण्यात आला आहे की, आकाशात फिरणाऱ्या या पक्ष्यांना या भयानक दुर्घटनेची आधीच जाणीव झाली होती. त्यांनी सतर्कही केले होते.
खरं तर हा व्हिडिओ बिझनेसमन आनंद महिंद्रासह अनेकांनी शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये पक्षी आकाशात फिरताना आणि विचित्र गोष्टी करताना दिसत आहेत. पक्षी हजारोंच्या संख्येने आहेत आणि तुर्कस्तानमधील एका शहरावर ओरडताना दिसतात.
हा व्हिडिओ तुर्कस्तानमधील भूकंपाच्या काही वेळापूर्वीचा असल्याचा दावा केला जात आहे. पक्ष्यांना हे माहीत होतं का? कारण हा व्हिडिओ संध्याकाळचा आहे आणि तुर्कस्तानमध्ये भूकंप देखील पहाटे झाला. हा व्हिडिओ पाहून अनेक तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, या पक्ष्यांना याची जाणीव झाली आणि त्यांनी सतर्कही केले.
एका स्थानिक टीव्ही चॅनेलनेही तो शेअर करत लिहिलं आहे की, तुर्कस्तानमध्ये भूकंप होण्यापूर्वी पक्ष्यांमध्ये विचित्र हालचाल पाहायला मिळाली होती. कदाचित त्यांनी याबाबत सावधगिरी बाळगली असावी.
Nature’s alarm system. We are not sufficiently tuned in to nature to hear it… https://t.co/jzjkQxCxsR
— anand mahindra (@anandmahindra) February 6, 2023
या व्हिडिओचं सत्य काहीही असलं तरी तो प्रचंड व्हायरल होत असून पक्ष्यांनी भूकंपावेळी सावध केल्याचा दावा करत तो शेअर केला जात आहे. तुर्कस्तान आणि उत्तर सीरियाच्या अनेक भागांना भूकंपाचा तडाखा बसला आहे.
यामुळे तेथील अनेक इमारती कोसळल्या असून भीषण नुकसान झाले आहे. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 7.8 इतकी होती. या तीन धक्क्यांनंतर तेथील लोकांचे जीवन उद्ध्वस्त झाले आहे.