Twitter Circle : ट्विटरनं आणलं इन्स्टासारखंच नवं फिचर, आता बनवा स्वत:चं ट्विटर सर्कल
ट्विटरनं आणलं नवं फिचर. त्याविषयी अधिक जाणून घ्या.
मुंबई : ट्विटरनं (Twitter) इन्स्टासारखंच नवं फिचर आणलंय. यामुळे आता तुम्ही दीडशे लोकांचा समूह बनवून तुमचं ट्विटर सर्कल (Twitter Circle) बनवू शकतात. ट्विटरचे नवे फिचर (new feature) इन्स्टासारखंच आहे. जे तुमच्या ट्विटसाठी तुम्हाला तुमचा ऑडियन्स निवडण्याचा पर्याय देतं. मंगळवारी या नव्या फिचरची घोषणा करताना ट्विटरनं सांगितलंय की, काही ट्विट्स प्रत्येकासाठी असतात आणि इतर फक्त तुम्ही निवडलेल्या लोकांसाठी असतात. आम्ही आता ट्विटर सर्कलचा प्रयोग करत आहोत. जे तुम्हाला दीडशे लोकांना एकत्र आणून देईल. हे दीडशे लोक तुमचे ट्विट्स बघू शकतात.’ आता ट्विटरच्या या सेवेमुळे ट्विटरच्या युजर्सला चांगलाच फायदा होणार आहे. युजर्स आपल्या आवडतीचा आपला ऑडियन्स निवडू शकतात. त्यामुळे इन्स्टाच्या धर्तीवर येणाऱ्या या नव्या फिचरचा चांगलाच फायदा ट्विटरच्या युजर्सला होऊ शकतो.
हे सुद्धा वाचाView this post on Instagram
View this post on Instagram
फिचरमध्ये नेमकं काय?
इलॉन मस्कच्या हातात ट्विटर आल्यानंतर पहिल्यांदाच युजर्ससाठी नवं फीचर आणलं आहे. ट्विटर ‘ट्विटर सर्कल’ नावाच्या एका नवीन फिचरची आता तपासणी केली जाणार आहे. वापरकर्ते 150 लोकांचा एक छोटा ग्रुप तयार करून त्यांच्यासोबत ट्विट शेअर करू शकतात. ट्विटरचे नवीन फीचर इन्स्टाग्रामच्या क्लोज फ्रेंड्स फीचरसारखे आहे. जे वापरकर्त्यांना त्यांच्या स्टोरीसाठी प्रेक्षक निवडण्याची परवानगी देतं. मंगळवार, 3 मे रोजी या फिचरची घोषणा करण्यात आली.
युजर्सच्या प्रतिक्रिया काय?
नवीन फीचर वापरणाऱ्या युजर्सनी त्यांचा फीडबॅक शेअर करायला सुरुवात केली आहे. यावेळी वेगवेगळ्या प्रतिक्रियांचा पाऊस पडत असल्याचं दिसतंय. एका युजर्सनं ट्विट केले की, “पहिले मला ते समजलं नाही पण हे खरोखरच एक छान फिचर आहे आणि मला अलीकडेच अशा गोष्टीची गरज भासू लागली आहे. त्यामुळे हे नवं फिचर माझ्यासाठी फायदेशीर ठरू शकतं ” असं या युजर्सनं म्हटलंय. तर दुसऱ्या एका युजर्सनं ट्विट केलंय की, “मला वाटत नाही की माझे ट्विट 150 पेक्षा जास्त लोकांनी पाहिले असेल. पण असो. ट्विटरने जे नवे फिचर आणलं आहे ते अनेकांसाठी फायदेशीर ठरेल यात शंका नाही. कारण, अनेकांना वाटतं की आपलाही एक ऑडियन्स असा किंवा एक प्रेक्षकवर्ग असावा ” दुसर्या युजर्सनं म्हटलं की, “माझ्या ट्विटर सर्कलमध्ये जोडण्यासाठी माझ्याकडे फक्त दोन लोक आहेत, माझ्यासाठी ते एका बिंदूसारखे आहे, वर्तुळासारखे नाही.”