Blast in Iran | जनरल सुलेमानीच्या कबरीजवळ बॉम्बस्फोटात 103 बळी, इराणचा बदला घेण्याचा निश्चय

Blast in Iran | इराणचा दिवंगत जनरल कासिम सुलेमानी 3 जानेवारी 2020 रोजी बगदाद विमानतळाजवळ अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात ठार झाला होता. सुलेमानी इराणमधील एक शक्तीशाली नेता होता. बुधवारी त्याच्या कबरीजवळ त्याचं स्मरण करण्यासाठी लोक मोठ्या संख्येने जमले होते. त्यावेळी दोन शक्तीशाली बॉम्बस्फोट झाले.

Blast in Iran | जनरल सुलेमानीच्या कबरीजवळ बॉम्बस्फोटात 103 बळी, इराणचा बदला घेण्याचा निश्चय
Blast in IranImage Credit source: PTI
Follow us
| Updated on: Jan 04, 2024 | 10:22 AM

Twin blast in Iran | इराणच्या दक्षिणेकडील केरमान शहर बुधवारी दोन शक्तीतशाली बॉम्बस्फोटांनी हादरलं. यात 103 नागरिकांचा मृत्यू झाला. 200 जण जखमी झाले. इराणचा दिवंगत टॉप जनरल कमांडर कासिम सुलेमानीच्या कबरीजवळ हे बॉम्बस्फोट झाले. 2020 साली अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात कासिम सुलेमानी ठार झाला होता. सुलेमानीच स्मरण करण्यासाठी त्याच्या कबरीजवळ मोठ्या संख्येने लोक जमले होते. त्यावेळी हे बॉम्बस्फोट झाले. पहिला बॉम्बस्फोट झाल्यानंतर दुसरा स्फोट 20 मिनिटांनी झाला. कोणीही या बॉम्बस्फोटांची जबाबदारी घेतलेली नाही. अज्ज्ञात दहशतवाद्यांना या बॉम्बस्फोटासाठी इराणने जबाबदार धरल आहे. इस्लामिक स्टेटचे दहशतवादी घडवून आणतात त्या पद्धतीचा हा बॉम्बस्फोट वाटतो, असं बायडेन प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं.

केरमान शहरात अल-जमान मशिदीजवळ हे बॉम्बस्फोट झाले. इथे सुलेमानीची कबर आहे. त्याच्या चौथ्या स्मृतीदिनी मोठ्या संख्येने लोक जमले होते, त्यावेळी हा बॉम्बस्फोट झाला. करमानच्या डेप्युटी गवर्नरने हा दहशतवादी हल्ला असल्याच म्हटलं आहे. रिमोट कंट्रोलच्या मदतीने हे बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आले.

हमासचा नंबर दोन कमांडर ठार

इराणने या हल्ल्याचा बदला घेण्याचा निश्चय केलाय. नुकतच बेरुतमध्ये इस्रायलच्या ड्रोन हल्ल्यात हमासचा नंबर दोन कमांडर सालेह अल-अरूरी ठार झाला. त्याला इराणच समर्थन प्राप्त होतं. त्यानंतर लगेचच इराणमध्ये हे दोन शक्तीशाली बॉम्बस्फोट झालेत. इराण सातत्याने हमासच समर्थन करत आलय. हमास विरोधात युद्ध लढणाऱ्या इस्रायलला इराण सतत धमकी देत होता. पुढच्या काही दिवसात आंतरराष्ट्रीय राजकारणात या बॉम्बस्फोटाचे तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता आहे. इस्रायलला आणखी आघाड्यांवर लढाव लागू शकतं.

' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड.
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत.
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.