Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Iran Israel War: इराणने इस्त्रायलवर चुकूनही हल्ला करु नये…अमेरिकेने उघडपणे धमकावले

Iran-Israel War Latest News: इराणचे सर्वोच्च नेते अली खमेनी यांनी 2 नोव्हेंबर 2024 रोजी सांगितले की अमेरिका आणि इस्रायलला निश्चितपणे योग्य उत्तर मिळेल. त्यावर अमेरिकेने आता इराणला उघडपणे धमकी दिली आहे.

Iran Israel War: इराणने इस्त्रायलवर चुकूनही हल्ला करु नये...अमेरिकेने उघडपणे धमकावले
Iran-Israel War
Follow us
| Updated on: Nov 03, 2024 | 10:22 AM

Iran-Israel War Latest News: इराण आणि इस्त्रायल दरम्यान संघर्ष सुरु आहे. इराणने केलेल्या क्षेपणास्त्र हल्यास इस्त्रायलने मागील आठवड्यात उत्तर दिले होते. त्यानंतर इराणने पुन्हा इस्त्रायलवर हल्ला करण्याची धमकी दिली आहे. इराणच्या या धमकीनंतर आता अमेरिकेने थेट प्रतिक्रिया दिली आहे. इराणाने इस्त्रायलवर हल्ला करण्याची चूक करु नये, असे अमेरिकेने म्हटले आहे.

काय म्हटले आहे अमेरिकेने

स्वित्झर्लंड मार्गे इराणला पाठवलेल्या थेट संदेशात अमेरिकेन बिडेन प्रशासनाने इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणला थेट इशारा दिला आहे. अमेरिकेने म्हटले इराणने इस्त्रायलवर हल्ला केला तर त्यानंतर इस्त्रायलकडून होणाऱ्या संभाव्य हल्ल्याला प्रतिक्रिया २६ ऑक्टोबर रोजी केल्या गेलेल्या हल्ल्याइतका मर्यादित नसेल. हा हल्ला अधिक मोठा असू शकतो. आम्ही इस्त्रायलला थांबवू शकणार नाही. मागील हल्ल्यासारखा हा हल्ला मर्यादीत राहील, याची हमी आम्ही घेऊ शकणार नाही, असे अमेरिकन अधिकाऱ्याने या संदेशात म्हटले आहे.

अमेरिकेने इराणला धमकावले

1 ऑक्टोबर रोजी इराणने इस्त्रायलवर क्षेपणास्त्र हल्ला केला होता. त्यानंतर त्याला प्रत्युत्तर म्हणून इस्त्रायलने 26 ऑक्टोबर रोजी इराणवर हल्ला केला. इस्त्रायलच्या या हल्ल्यात इराणचे चार सैनिक आणि एका नागरिकाचा मृत्यू झाला. त्यानंतर इराणचे सर्वोच्च नेते अली खमेनी यांनी 2 नोव्हेंबर 2024 रोजी सांगितले की अमेरिका आणि इस्रायलला निश्चितपणे योग्य उत्तर मिळेल. त्यावर अमेरिकेने आता इराणला उघडपणे धमकी दिली आहे.

हे सुद्धा वाचा

हा हल्ला अधिक मोठा असणार

इस्रायली आर्मी रेडिओ अनामने अमेरिकन अधिकाऱ्यांचा हवाला देत वृत्त दिले आहे की, वॉशिंग्टनने इराणमधील लष्करी हालचाली रेकॉर्ड केल्या आहेत.  बिडेन प्रशासनाचा अंदाज आहे की इराण 26 ऑक्टोबरच्या इस्रायलच्या हवाई हल्ल्यांना उत्तर देईल, परंतु केव्हा आणि कसे हे स्पष्ट नाही. दुसरीकडे इराण संसदेचे सदस्य जनरल इस्माइल कोवसरी यांनी सांगितले की, इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परीषदेने इस्त्रायलविरोधात हल्ल्यास मंजुरी दिली आहे. हा हल्ला इराणने यापूर्वी 1 ऑक्टोबर रोजी केलेल्या हल्ल्यापेक्षाही मोठा असणार आहे. त्यावेळी इस्त्रायलवर इराणाने 200 क्षेपणास्त्र ढागली होती.

खोक्याच्या बायकोने केला मोठा खुलासा, म्हणाली..
खोक्याच्या बायकोने केला मोठा खुलासा, म्हणाली...
'हा विषय आता संपवा'; औरंगजेबाच्या कबरीवर चंद्रकांत खैरे काय म्हणाले?
'हा विषय आता संपवा'; औरंगजेबाच्या कबरीवर चंद्रकांत खैरे काय म्हणाले?.
युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड; कार्यकर्ते आक्रमक
युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड; कार्यकर्ते आक्रमक.
धनंजय मुंडेंची आमदारकी 100 टक्के जाणारच; करुणा शर्मा यांचा दावा
धनंजय मुंडेंची आमदारकी 100 टक्के जाणारच; करुणा शर्मा यांचा दावा.
वाढत्या उष्णतेने सोलापूरकरांचे हाल बेहाल
वाढत्या उष्णतेने सोलापूरकरांचे हाल बेहाल.
'होळी खेळताना त्यांना माझ्या भावाचे..' - धनंजय देशमुख
'होळी खेळताना त्यांना माझ्या भावाचे..' - धनंजय देशमुख.
खोक्याला बावी गावात आणलं; घटनास्थळावर कसून चौकशी सुरू
खोक्याला बावी गावात आणलं; घटनास्थळावर कसून चौकशी सुरू.
आता घरकुलांना पाच ब्रास मोफत वाळू मिळणार; बावनकुळेंनी दिली माहिती
आता घरकुलांना पाच ब्रास मोफत वाळू मिळणार; बावनकुळेंनी दिली माहिती.
करुणा शर्मा खोक्याला कसं ओळखता? सांगितली 'ती' घटना
करुणा शर्मा खोक्याला कसं ओळखता? सांगितली 'ती' घटना.
राणेंचे जुने व्हिडिओ काढा, हलालचं मटण खाताना दिसतील; वडेट्टीवारा टोला
राणेंचे जुने व्हिडिओ काढा, हलालचं मटण खाताना दिसतील; वडेट्टीवारा टोला.