लंडनः ब्रिटनमधील (Britain) शाही घराण्यातील विंडसर कॅसलमधील थेम्स नदीच्या किनाऱ्यावरील राणी एलिझाबेथ द्वित्तीय (Queen Elizabeth) यांच्या राजहंसांच्या कळपातील 26 हंसांना मारुन टाकण्यात आले आहे. या राजहंसांना बर्ड फ्लू (Bird Flu) झाल्याने मारून टाकण्यात आले आहे. या रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रसार वाढत असल्याने पक्षांसाठी धोका वाढला आहे. त्या कळपातील सहा राजहंसांचा एवियन इंफ्लूएंजामुळे मृत्यू झाल्याने नदीतील सर्वच राजहंसांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या रोगामुळे आतापर्यंत 33 पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे. ब्रिटनमधील पर्यावरण, खाद्य आणि ग्रामीण विभागाच्या पशू चिकित्सालयामार्फत राजहंसाना मारण्यासाठी बोलवण्यात आले आहे. या नदीकिनाऱ्यावर असणाऱ्या सर्व राजहंसांची मालकी राणी एलिझाबेथ यांच्याकडे आहे. या राजहंसांच्या मृत्यूमुळे राणी एलिझाबेथ दुःखी झाल्या असून या बाबत घडणाऱ्या सर्व घटनांचा तपशील मला द्या अशी सूचनाही प्रशासनला देण्यात आली आहे. राणी एलिझाबेथ यांच्याकडे ब्रिटनमध्ये असणाऱ्या सर्व राजहंसांची मालकी आहे.
दरवर्षी टेम्स नदीपात्रात उन्हाळ्याच्या दिवसात एका कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. या कार्यक्रमामध्ये राजहंसांचे कळप आणि त्यांची संख्या मोजली जाते. या कार्यक्रमामध्ये हंसांना पकडण्याची एक परंपरा समजली जाते. ही परंपरा बाराव्या शतकापासून चालत आली आहे. ज्या वेळी ब्रिटनमध्ये मोकळ्या पाण्यात मुक्तपणे वावरणाऱ्या राजहंसांवर त्यावेळच्या राजाने मालकी हक्काचा दावा केला होता. तो दावा यासाठी होता की, नागरिकांनी खाण्यासाठी राजहंसाची हत्या करू नये. त्यानंतर आताही नदीकिनारी असणाऱ्या काही हंस पक्षांवर राणी एलिझाबेथ यांच्याकडून मालकी सांगितली जाते.
राजहंसावर ‘वर्शिपफुल कंपनी ऑफ विंटर्स’ आणि ‘द वर्शिपफुल कंपनी ऑफ डायर्स’ या संस्थांबरोबर पंधराव्या शतकापासून मालकी हक्क दिले गेले आहेत. त्यासाठीच आता राजहंसांची संख्या वाढविण्यासाठी त्यांच्या आरोग्याची तपासणी केली जाते. त्यांचे वजन करून ते जखमी आहेत का? याचेही मुल्यांकन केले जाते. सध्या मात्र कोरोना महामारीमुळे ब्रिटनमध्ये हंस पक्षांची संख्या तपासणीचे काम थांबण्याची चिन्हे आहेत. विंडसर कॅसलच्या तीन कि.मी परिसरामध्ये 150 ते 200 हंस पक्षाची संख्या नोंदविण्यात आली आहे.
संबंधित बातम्या
‘हे’ एक नाणं तुमच्याकडे असेल तर तुम्ही कोट्यधीश होणार
दुर्मिळ आजारानं पछाडलेल्या 15 वर्षांच्या प्रसिद्ध YouTube स्टारनं घेतला जगाचा निरोप! चाहते हळहळले