Russia-Ukraine War : युक्रेनकडे एक खास मिसाइल, पण अमेरिका त्यांना ते वापरु देत नाहीय, का?

Russia-Ukraine War : युक्रेन आणि रशियामध्ये सुरु असलेलं युद्ध थांबण्याच कुठलही चिन्ह दिसत नाहीय. उलट दिवसेंदिवस हे युद्ध आणखी भीषण होत चाललय. युक्रेनने रशियाविरुद्ध एक खास मिसाइल वापरण्याची अमेरिका-ब्रिटनकडे परवानगी मागितली आहे. युक्रेनकडे ते मिसाइल आहे, तरी सुद्धा ही परवानगी का मिळत नाहीय?

Russia-Ukraine War : युक्रेनकडे एक खास मिसाइल, पण अमेरिका त्यांना ते वापरु देत नाहीय, का?
storm shadow missile
Follow us
| Updated on: Sep 14, 2024 | 12:19 PM

युक्रेन आणि रशियामधील युद्ध दिवसेंदिवस अधिक भीषण होत चाललय. रशियाकडून सतत सुरु असलेल्या हल्ल्यांमुळे युक्रेनकडून एका खास मिसाइलची मागणी करण्यात येत आहे. त्याचं नाव आहे. स्टॉर्म शॅडो मिसाइल. रशियाच्या हल्ल्याचा सामना करण्यासाठी युक्रेन या मिसाइलची मागणी करत आहे. रशिया विरुद्ध हे मिसाइल वापरण्यास अमेरिका, ब्रिटनने युक्रेनला परवानगी दिलेली नाही. हे प्रतिबंध हटवण्याची युक्रेन अनेक आठवड्यांपासून मागणी करत आहे. आता अमेरिका आणि ब्रिटनने हे प्रतिबंध हटवण्यावर विचार सुरु केलाय. स्टॉर्म शॅडो एक क्रूज मिसाइल आहे. यूके आणि फ्रान्सने मिळून हे मिसाइन तयार केलय. बंकरसह दारु-गोळ्याच भांडार क्षणार्धात उद्धवस्त करण्याची या मिसाइलची क्षमता आहे. स्टॉर्म शॅडो हे एक शक्तीशाली मिसाइल आहे. 250 किलोमीटर या मिसाइलची रेंज आहे.

युक्रेनकडे आधीपासून हे मिसाइल आहे. पण काही अटी-बंधनांमुळे युक्रेनला हे मिसाइल रशिया विरोधात वापरता येत नाहीय. युक्रेनला आपल्या सीमेच्या हद्दीतच स्टॉर्म शॅडो मिसाइल वापरण्याची परवानगी आहे. रशियन टार्गेट्सना उद्धवस्त करण्यासाठी या मिसाइलचा वापर करण्याची परवानगी द्यावी अशी युक्रेनने अमेरिका आणि ब्रिटनकडे मागणी केली आहे.

या एका मिसाइलची किंमत किती?

हे मिसाइल जितकं शक्तीशाली आहे, त्याचा निर्मिती खर्च सुद्धा तितकाच मोठा आहे. या मिसाइलच्या निर्मितीसाठी 1 मिलियन डॉलर म्हणजे 8 कोटी 32 रुपये खर्च येतो. शत्रुला चकवण्यासाठी ड्रोनसह खूप खबरदारी घेऊन या मिसाइलचा वापर करण्यात येतो. क्रीमियामध्ये काळ्या सागरात रशियन नौदल तळांवर याच स्टॉर्म शॅडोज मिसाइलने लक्ष्यभेद करण्यात आला होता.

युक्रेनला ही मिसाइल्स का हवी आहेत?

रशियावर पलटवार करण्यासाठी युक्रेनकडे लांब पल्ल्याचे ड्रोन्स आहेत. पण ते जास्त वजन वाहून नेऊ शकत नाही. रशियन डिफेन्स सिस्टिमकडून अनेकदा ही ड्रोन्स पाडली जातात. स्टॉर्म शॅडोज आणि अमेरिकन ATACMS या लांब पल्ल्याच्या मिसाइल्सद्वारे रशियन हल्ले रोखण्यात मदत मिळू शकते, असा युक्रेनचा तर्क आहे.

युक्रेनला स्टॉर्म शॅडोज मिसाइल वापरण्याची परवानगी का नाही मिळतय?

स्टॉर्म शॅडोज मिसाइल वापरण्याची परवानगी दिली, तर रशिया-युक्रेनमधील संघर्ष आणखी भडकण्याची भिती अमेरिका, ब्रिटनला आहे. युक्रेनने स्टॉर्म शॅडोज मिसाइलने रशियाच्या आत खोलवर हल्ला केला, तर रशिया अजून घातक पलटवार करेल असं अमेरिका-ब्रिटनच मत आहे. त्यामुळे ते युक्रेनला हे मिसाइल वापरण्याची परवानगी देत नाहीयत.

रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?.
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा.
'राहुल गांधींची जीभ छाटू नये, जिभेला चटके..',भाजप खासदाराची जीभ घसरली
'राहुल गांधींची जीभ छाटू नये, जिभेला चटके..',भाजप खासदाराची जीभ घसरली.
बहिणींनंतर आता भाऊही लाडके... अजितदादांच्या 'त्या' जाहिरातीची एकच चर्च
बहिणींनंतर आता भाऊही लाडके... अजितदादांच्या 'त्या' जाहिरातीची एकच चर्च.
महायुती-मविआत चर्चा सुरू, जागांवरून रस्सीखेच, कोण-कुठे मोठा भाऊ?
महायुती-मविआत चर्चा सुरू, जागांवरून रस्सीखेच, कोण-कुठे मोठा भाऊ?.
गुडघे टेकायला लावणार की आयुष्यात पश्चाताप..,जरांगेंचा फडणवीसांना इशारा
गुडघे टेकायला लावणार की आयुष्यात पश्चाताप..,जरांगेंचा फडणवीसांना इशारा.
लालबाग राजाला २५ तासानंतर जड अंतःकरणाने निरोप, गिरगाव चौपाटीवर विसर्जन
लालबाग राजाला २५ तासानंतर जड अंतःकरणाने निरोप, गिरगाव चौपाटीवर विसर्जन.
अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, नवा CM कोण?
अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, नवा CM कोण?.
नादच खुळा... रथ, गाडी, टेम्पो सोडून बाप्पाचा 'रॉयल' थाट; बघा व्हिडीओ
नादच खुळा... रथ, गाडी, टेम्पो सोडून बाप्पाचा 'रॉयल' थाट; बघा व्हिडीओ.
पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपती बाप्पाला निरोप
पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपती बाप्पाला निरोप.