PM Modi Ukraine Visit : पीएम मोदी पोहोचण्याआधीच युक्रेनचा रशियाच्या राजधानीवर सर्वात मोठा हल्ला
PM Modi Ukraine Visit : दोन वर्ष उलटली तरी अजून युक्रेन आणि रशियामधील युद्ध थांबलेलं नाहीय. उलट ही लढाई आणखी घनघोर बनत चालली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी युक्रेन दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. मात्र, त्या आधीच रशियाच्या राजधानीवर भीषण हल्ला झाला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी युक्रेन दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. त्याचवेळी मॉस्कोवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला झालाय. 21 आणि 22 ऑगस्टला मोदी पोलंडमध्ये असतील. त्यानंतर 23 ऑगस्टला मोदी युक्रेनमध्ये असतील. 45 वर्षानंतर भारताचा कुठला पंतप्रधान युक्रेनमध्ये जाणार आहे. त्याआधी युक्रेनने रशियाच्या मॉस्को शहरावर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला केला आहे. युक्रेनने मॉस्कोवर आतापर्यंतचा सर्वात मोठा ड्रोन हल्ला केला आहे अशी माहिती मेयर सर्गेई सोबयानिन यांनी दिली.
युक्रेनने मॉस्कोवर आतापर्यंतचा सर्वात मोठा ड्रोन हल्ला केला आहे. रशियन एअर फोर्सने राजधानीच्या दिशेने येणारे कमीत कमी 10 ड्रोन्स नष्ट केले आहेत. पोडॉल्स्क शहरातही काही ड्रोन्स नष्ट करण्यात आलेत अशी माहिती मेयर सर्गेई सोबयानिन यांनी दिली.
युक्रेनने किती ड्रोन्स डागली?
संरक्षण मंत्रालयाच्या एअर डिफेन्स सिस्टिमने शत्रूचा UAV हल्ला हाणून पाडला. जिथे ही ड्रोन्स पाडण्यात आली तिथे कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. मागच्यावर्षी मे महिन्यात झालेल्या ड्रोन हल्ल्यानंतरचा हा सर्वात मोठा हल्ला आहे. मागच्यावर्षी मॉस्कोमध्ये 8 ड्रोन्स नष्ट करण्यात आले होते. यावेळी 10 ड्रोन्स नष्ट करण्यात आले. सोबयानिन यांनी पहाटे 4:43 वाजता टेलीग्रामवर ही माहिती दिली.
हा भाग उत्तरेला मॉस्को क्षेत्राच्या सीमेजवळ
ड्रोन हल्ल्यात कुठलीही जिवीतहानी झाल्याची माहिती नाहीय असं रशियाच्या ब्रायंस्क क्षेत्राचे गवर्नर एलेक्जेंडर बोगोमाज यांनी सांगितलं. एक रिपोर्टनुसार, रशियाच्या तुला क्षेत्रात दोन ड्रोन्स नष्ट करण्यात आले. हा भाग उत्तरेला मॉस्को क्षेत्राच्या सीमेजवळ आहे. त्या शिवाय रशियाच्या साउथ-वेस्ट रोस्तोव क्षेत्राचे गवर्नर वसीली गोलुबेव यांनी सांगितलं की, एअरफोर्सने हवेतच युक्रेनची मिसाइल्स नष्ट केली. यात कोणीही जखमी झालेलं नाहीय.