Ukraine attack on Russia : यूक्रेनचा रशियावर पलटवार, ऐतिहासिक बेलगोरोडमधील ऑईल डेपोवर हल्ला, पाहा व्हिडीओ

| Updated on: Apr 01, 2022 | 3:07 PM

यूक्रेनच्या सैन्यानं बुधवारी रशियन सैन्याला प्रत्युत्तर दिलं आहे. बुधवारी यूक्रेन सैन्याच्या दोन हेलिकॉप्टर्सनी (Ukraine Helicopters attack Russian Oil Depot) रशियाच्या बेलगोरोडमध्ये आक्रमण केलं. यूक्रेनच्या हेलिकॉप्टर्सनी रशियनं ऑईल डेपोवर हल्ला केला.

Ukraine attack on Russia : यूक्रेनचा रशियावर पलटवार, ऐतिहासिक बेलगोरोडमधील ऑईल डेपोवर हल्ला, पाहा व्हिडीओ
यूक्रेनचा रशियावर हल्ला
Image Credit source: RT Twitter
Follow us on

Russia Ukraine War नवी दिल्ली : रशिया (Russia) आणि यूक्रेन (Ukraine) यांच्यातील युद्ध सुरु झाल्याचा 37 वा दिवस आहे. युद्धात रशियाकडून यूक्रेनची अनेक शहरं बेचिराख कऱण्यात आली आहेत. या युद्धात रशियाचं देखील मोठं नुकसान झालं आहे. दोन्ही देशांमध्ये कोणीही युद्धापासून माघार घेण्यास तयार नाही. यूक्रेनच्या सैन्यानं बुधवारी रशियन सैन्याला प्रत्युत्तर दिलं आहे. बुधवारी यूक्रेन सैन्याच्या दोन हेलिकॉप्टर्सनी (Ukraine Helicopters attack Russian Oil Depot) रशियाच्या बेलगोरोडमध्ये आक्रमण केलं. यूक्रेनच्या हेलिकॉप्टर्सनी रशियनं ऑईल डेपोवर हल्ला केला. त्यानंतर डेपोमध्ये आग लागली आणि स्फोट झाले. बेलगोरोडचे गव्हर्नर व्याचेस्लाव ग्लेडकोव यांनी टेलिग्राम अ‌ॅपवर यासंदर्भातील माहिती दिली आहे. रशियन ऑईल डेपोवर हेलिकॉप्टर्सनं कमी उंचीवरुन हल्ला केल्याचं त्यामध्ये दिसून आलं आहे. यूक्रेनच्या हल्ल्यानंतर रशियन ऑईल डेपोमध्ये आग लागली. या हल्ल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ग्लेडकोव यांनी ऑईल डेपोला आग लागल्यामुळं जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याच सांगितलं. ऑईल डेपो जवळील रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे.

पाहा व्हिडीओ

बेलगोरोड यूक्रेनच्या खारकीव जवळ

रशियन तेल कंपनी रोसनेफ्टनं आईल डेपोसंदर्भात माहिती देण्यास नकार दिला आहे. बेलगोरोडमध्ये रशियन सैन्यानं दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी बंकर्स बनवले होते. 1943 मध्ये येथे खुर्स्क येथे एक प्रसिद्ध लढाई झाली होती. शहरातील त्या ठिकाणाला युद्ध स्मारकात रुपांतरित करण्यात आलं आहे. या भागातून राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांच्या राजकीय पक्षाकडून भारतीय वंशाचे अभय सिंह प्रतिनिधित्व करत आहेत.

मॉस्कोपासून बेलगोरोड हे शहर 700 किलोमीटरवर आहे. महामार्गाद्वारे तिथं पोहोचण्यासाठी 10 तासांचा वेळ लागतो. मात्र, सध्या त्या मार्गावर पोलीस आणि सैन्याचा बंदोबस्त आहे. बेलगोरोड हे शहर यूक्रेनच्या खारकीव आणि सूमीच्या जवळ आहे. भारतीय विद्यार्थ्यांना यूक्रेनमधून परत आणलं जात असताना बेलगोरोडमध्ये 130 बसेस तयार ठेवण्यात आल्या होत्या.

इतर बातम्या:

Shivsena NCP: राऊत म्हणतात, गृहखात्याने अधिक सक्षम व्हावं, मुख्यमंत्री म्हणाले, दिलीप वळसे-पाटील उत्तम काम करताहेत

‘असले घाण आरोपही कोणी लावू नका’; म्हणत विशाखा सुभेदारने घेतला मोठा निर्णय