Video: पहिल्यांदाच यूक्रेन-रशियातली चर्चा हस्तांदलोनाने झाली, खुद्द रशियन सरकारी चॅनलचं ट्विट

आज त्यांच्या दुसऱ्यांदा वाटाघाटीच्या टेबलावर चर्चा झाली. यावेळी हस्तांदोलन करत या चर्चेला सुरूवात झाली. या चर्चेचा व्हिडिओ खुद्द रशियन सरकारी चॅनलने (Russian News Channel) ट्विट केला आहे.

Video: पहिल्यांदाच यूक्रेन-रशियातली चर्चा हस्तांदलोनाने झाली, खुद्द रशियन सरकारी चॅनलचं ट्विट
चर्चेतून मार्ग निघणार?Image Credit source: RT
Follow us
| Updated on: Mar 03, 2022 | 10:38 PM

Russia Ukraine War : गेल्या आठ दिवसात युक्रेन (Ukraine) आणि रशिया (Russia)  या दोन्ही देशांनी युद्धामुळे अनेक झळा सोसल्या आहेत. दोन्ही देशांचे यात खूप नुकसान झाले आहे. तसेच अनेक जीव या युद्धात गमावले आहेत. आज त्यांच्या दुसऱ्यांदा वाटाघाटीच्या टेबलावर चर्चा झाली. यावेळी हस्तांदोलन करत या चर्चेला सुरूवात झाली. या चर्चेचा व्हिडिओ खुद्द रशियन सरकारी चॅनलने (Russian News Channel) ट्विट केला आहे. आता या चर्चेतून तरी मार्ग निघेल आणि युद्ध संपेल अशी आशा सर्वांना लागली आहे. युद्ध थांबवण्यासाठी दोन्ही देशात दोन दिवसांपूर्वीच चर्चेची पहिली फेरी पार पडली मात्र ती निष्फळ ठरली होती. आज या दोन्ही देशात चर्चेची दुसरी फेरी सुरू आहे. सकाळीच युक्रेनने चर्चेला नकार दिल्याची बातमी आली होती. बेलारूसमध्ये या दोन्ही देशात चर्चेची पाहिली फेरी पार पडली आहे. त्यानंतर चर्चेच्या दुसऱ्या फेरीबाबत काहीसा संभ्रम निर्माण झाला होता. मात्र या व्हिडिओने पुन्हा एकदा दोन्ही देश चर्चेच्या टेबलावर असल्याचे स्पष्ट केले आहे.

रशियन सरकारी चॅनलचे ट्विट

चर्चेवेळी काही अटी घाल्याची माहिती

युक्रेनच्या आणि रशियाच्या चर्चेतील काही महत्वाच्या बाबीही समोर आल्या आहेत. ही चर्चा सुरू होताच. गोळीबार आणि हल्ले तात्काळ थांबवावे अशी अट युक्रेनने घातल्याची माहिती समोर आली आहे. मात्र रशियाकडून याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. गेल्या चर्चेवेळीही युक्रेन अशाच काही अटी घातल्याची बातमी समोर आली होती. आजच्या चर्चेदरम्यानही युक्रेनने प्रमुख तीन मागण्यांसह काही अटीशर्ती ठेवल्याची माहिती समोर आली होती.

रशियाचे युक्रेनवर तीव्र हल्ले

रशियाने युक्रेनवर हवाई हल्ले तीव्र केले आहेत. राजधानी कीवसह अनेक शहरे उद्ध्वस्त झाली आहेत. दरम्यान, कीवमध्ये एकाच वेळी भीषण स्फोटांचे आवाज ऐकू आले आहेत. त्यामुळे रशियाने हल्ले आणखी तीव्र केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे या युद्धाची दाहकता आणकी वाढली आहे. युद्ध थांबवण्याासाठी जगभरातून रशियावर दबाव आणण्याचा प्रयत्न होतोय. मात्र अजूनही युद्ध शांत व्हायचे नाव घेत नाही. आता या चर्चेतून तरी मार्ग निघेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. ही चर्चा संपल्यानंतरच याबाबत स्पष्टता येईल.

Russia Ukraine War : युक्रेन-रशिया पुन्हा वाटाघाटीच्या टेबलावर, युद्धावर तोडगा निघणार?

Video: तर तुम्हाला देशाबाहेर जावं लागलं नसतं, देशातल्या मेडिकलच्या शिक्षणावर पंतप्रधान मोदींचं मोठं वक्तव्य

Russia Ukraine War Video : युक्रेनमधील इरपिन शहर बेचिराख, काळजाचा थरकाप उडवणारा Video

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.