Ukraine-russia War : युद्धाबाबत भारताने घेतली महत्त्वाची भूमिका, पडद्यामागे हालचालींना वेग

रशिया आणि युक्रेनमध्ये फेब्रुवारी 2022 पासून सुरु झालेले युद्ध अजूनही संपलेली नाही. दोन्ही बाजुला प्रचंड हानी झाली आहे. अनेक लोकं मारली गेली आहेत. पण तोडगा निघत नाहीये. आता भारत महत्त्वाच्या भूमिकेत आहे. भारताकडून सतत यावर चर्चा सुरु आहे, भारताने हे युद्ध संपवण्यासाठी आणि शांती प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. पंतप्रधान मोदी सतत दोन्ही नेत्यांच्या संपर्कात आहेत.

Ukraine-russia War : युद्धाबाबत भारताने घेतली महत्त्वाची भूमिका, पडद्यामागे हालचालींना वेग
Follow us
| Updated on: Sep 12, 2024 | 5:28 PM

रशिया आणि युक्रेनमधील युद्ध अजूनही संपत नाहीये. युक्रेनमध्ये अनेक ठिकाणी रशियाने हल्ले केले आहेत ज्यामुळे मोठी हानी झाली आहे. युक्रेन आणि रशिया युद्धावरुन जग दोन गटात वाटले गेले आहे. पण भारताने यावर सावध भूमिका घेतली आहे. भारताने रशिया आणि युक्रेनला एकत्र येऊन चर्चा करण्याचं आवाहन केले आहे. त्यातच भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचे आणखी एक वक्तव्य समोर आलंय. ते म्हणाले की, रशिया आणि युक्रेनने संवादाद्वारे संघर्ष संपवला पाहिजे आणि त्यासाठी भारत दोन्ही देशांना शक्य तो सल्ला देण्यास तयार आहे. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल एका महत्त्वाच्या बैठकीसाठी रशियात असताना एस जयशंकर यांचे हे वक्तव्य समोर आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रस्तावित केलेली शांतता योजना घेऊन डोभाल मॉस्कोला गेल्याचा दावा केला जात आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासोबत ते ही योजना शेअर करणार आहेत.

युद्धभूमीवर तोडगा नाही

एका रिपोर्टनुसार, परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी बर्लिनमध्ये जर्मन परराष्ट्र कार्यालयाच्या वार्षिक राजदूत परिषदेत बोलताना रशिया-युक्रेन युद्धावर भाष्य केले. ते म्हणाले, की ‘या युद्धभूमीवर तोडगा निघेल असे आम्हाला वाटत नाही. केवळ चर्चेतूनच गोष्टी ठीक होतील आणि जेव्हा कोणतीही चर्चा होईल तेव्हा मुख्य पक्षांना म्हणजे रशिया आणि युक्रेनलाही त्यात सहभागी व्हावे लागेल. पंतप्रधान मोदींचा रशिया आणि युक्रेन दौरा आणि हे ‘युद्धाचे युग’ नाही, असे त्यांनी म्हटले होते. जयशंकर म्हणाले की, युद्धभूमीवर काहीतरी तोडगा निघेल हे स्पष्ट आहे. हे कसे संपेल, तुम्हाला सल्ला हवा असेल तर आम्ही सल्ला द्यायला सदैव तयार आहोत.

अजित डोवाल रशियामध्ये

भारताच्या शांतता प्रस्तावावर रशिया आणि युक्रेनची भूमिका अजून समोर आलेली नाही. BRICS NSA शिखर परिषदेसाठी अजित डोभाल रशियात आहेत. संघर्ष संपवण्यासाठी भारताने पुढाकार घेतला आहे. त्यांनी रशिया-युक्रेन समस्येचे निराकरण करण्यावर भर दिला आहे. अजित डोवाल यांनी सेंट पीटर्सबर्ग येथे ब्रिक्स राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार परिषदेत सांगितले की, विद्यमान संरचना संवेदनशील समस्यांना सामोरे जाण्यासाठी कमकुवत ठरत आहेत. अशा परिस्थितीत विश्वासार्हता बहाल करायची असेल तर बहुपक्षीयता सुधारावी लागेल.

भारत शांततेसाठी प्रयत्नशील

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच केलेल्या युक्रेन दौऱ्यात राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की यांना सांगितले होते की, भारत शांतता प्रस्थापित करण्यासाठी सगळं काही करायला तयार आहे. संघर्ष संपवण्यासाठी सर्व शक्य योगदान देईल. पुतिन आणि झेलेन्स्की या दोघांची मोदींनी भेट घेतलीये. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनीही युक्रेन संघर्षाबाबत आपण ज्या तीन देशांशी सतत संपर्कात आहोत त्यात भारताचा समावेश असल्याचे सांगितले आणि ते सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत असल्याचे सांगितले.

'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?.
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप.
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.