Ukraine vs Russia: पुतिन आणि किम जोंग उन यांनी असा रचला युक्रेनला संपवण्याचा डाव

Russia-Ukraine War : रशिया आणि उत्तर कोरिया या दोन्ही देशांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून युद्ध सुरु आहे. युक्रेनला अमेरिका आणि इतर नाटो देशांकडून मदत होत असल्याने तो रशियाच्या विरोधात युद्ध लढत आहे. दुसरीकडे बलाढ्य रशियाला आणखी एका देशाकडून मदत होत आहे. आता नवीन यंत्रणा तो रशियाला देणार आहे.

Ukraine vs Russia: पुतिन आणि किम जोंग उन यांनी असा रचला युक्रेनला संपवण्याचा डाव
Follow us
| Updated on: Aug 28, 2024 | 4:02 PM

युक्रेन आणि रशिया यांच्यात गेल्या अनेक महिन्यांपासून युद्ध सुरु आहे. बलाढ्य रशियासमोर युक्रेनने अजूनही गुडघे टेकलेले नाहीत. युक्रेनला अमेरिका आणि इतर युरोपीयन देशांकडून मदत मिळतेय. पण या युद्धात रशिया तरी अजून वरचढ ठरला आहे. या युद्धात अमेरिकेसह नाटो देश रशियाच्या विरोधात उभे राहिले आहेत. रशियाला एकटा पाडण्याचे प्रयत्न सुरु आहेत. पण पुतीन काही कमी नाहीत. युद्धात इंधन आणि पाणी कसे मिळवावे हे त्यांना चांगले माहित आहे. यामुळेच त्यांनी अमेरिकेच्या शत्रूंसोबतची मैत्री वाढवली आहे. अमेरिकेचा शत्रू आता रशियाचा सर्वात मोठा मित्र बनला आहे. तो देश दुसरा तिसरा कोणता नाही तर उत्तर कोरिया आहे. उत्तर कोरियाकडून सातत्याने शस्त्रे आणि क्षेपणास्त्रांचा पुरवठा होत आहे. उत्तर कोरियाने रशियासोबत असा डाव आखला आहे की, अमेरिकेचे ही टेन्शन वाढले आहे.

उत्तर कोरियाने नवीन तंत्रज्ञानाने सुसज्ज असे रॉकेट लॉन्चर हुकूमशहा किम जोंग-उनच्या उपस्थितीत चाचणी घेतली. आता युक्रेनविरुद्धच्या युद्धात तो रशियाला ही नवीन यंत्रणा देऊ शकतो. उत्तर कोरियाचे हे नवे शस्त्र अत्यंत घातक असल्याचं बोललं जातं. उत्तर कोरियाच्या या निर्णयामुळे दक्षिण कोरियाही दहशतीत आहे. कारण हे शस्त्र सेऊल आणि त्याच्या आसपासच्या भागात लक्ष्य श्रेणीमध्ये ठेवता येते.

उत्तर कोरियाने केले नवीन रॉकेट लाँचर विकसित

फेब्रुवारीमध्ये किम जोंग उन म्हणाले होते की, उत्तर कोरियाने एक नवीन रॉकेट लाँचर विकसित केले आहे, जे अचूक मारा करते. यामुळे आपली शस्त्र क्षमता वाढवू शकते. मे मध्ये, उत्तर कोरियाने सांगितले की ते 2024 ते 2026 दरम्यान कोरियन पीपल्स आर्मी युनिट्समध्ये शस्त्र प्रणाली तैनात करेल. उत्तर कोरियावर लक्ष ठेवणाऱ्या तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, युक्रेन युद्धात ही तंत्रज्ञान वापरता यावे म्हणून उत्तर कोरियाने ही चाचणी घेतली आहे.

दक्षिण कोरिया आणि अमेरिका यांच्यात चांगले संबंध नाही. उत्तर कोरियाने नेहमीच अमेरिकेला हल्ल्याचा इशारा दिला आहे. आता युक्रेनच्या विरोधात ही प्रणाली रशियाला दिली जाऊ शकते. ज्यामुळे अमेरिका चिंतेत आहे. उत्तर कोरियाने आपल्या विरुद्ध हल्ल्याची तयारी म्हणून मित्र राष्ट्रांद्वारे संयुक्त सरावाचा दीर्घकाळ निषेध केला आहे. हुकूमशहाच्या या पाऊलामुळे अमेरिका आणि झेलेन्स्की यांच्यातील तणाव वाढणार आहे.

चीन आणि उत्तर कोरियाकडून मदत

उत्तर कोरिया खरेच हे नवीन रॉकेट लाँचर रशियाला देईल का? तर याचे उत्तर होय असे दिसते. उत्तर कोरिया काही काळापासून रशियाला सातत्याने नवीन शस्त्रे आणि क्षेपणास्त्रांचा पुरवठा करत आहे. रशियाला उत्तर कोरियाकडून हे नवीन रॉकेट लाँचर मिळाल्यास त्याची ताकद आणखी वाढणार आहे. किम जोंग उन यांनी पुतीन यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. हे दोन्ही देश अमेरिकेचे कट्टर शत्रू आहेत. दुसरीकडे चीनही रशियाला मदत करत आहे.

मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला.
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?.
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर.
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?.
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्...
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्....
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.