Russia Ukraine War Video: तू चाल गड्या तुला रं भीती कशाची? जेव्हा यूक्रेनच्या लोकांनी रशियन रणगाडे अडवले

रशियाच्या आक्रमणापुढं यूक्रेन कमजोर दिसत असला तरी राष्ट्रपती वोलोदेमीर झेलेन्स्की (volodymyr zelensky)  आणि यूक्रेनची जनता झुकलेली नाही.

Russia Ukraine War Video: तू चाल गड्या तुला रं भीती कशाची? जेव्हा यूक्रेनच्या लोकांनी रशियन रणगाडे अडवले
Russia Ukraine War चा विपरित परिणाम होण्याची शक्यताImage Credit source: Twitter Video Snap
Follow us
| Updated on: Mar 02, 2022 | 2:51 PM

नवी दिल्ली : रशिया (Russia) आणि युक्रेन (Ukraine) यांच्यातील युद्धाचा आज सातवा दिवस आहे. रशियां सातव्या दिवशी देखील युक्रेनवर आक्रमक हल्ले सुरु ठेवले आहेत. व्लादिमीर पुतिन यांनी यूक्रेनवर अणवस्त्र हल्ल्याची तयारी सुरु केली आहे. दुसरीकडे यूक्रेनचे राष्ट्रपती वोलेदिमीर झेलेन्स्की आंतरराष्ट्रीय मंचावर शस्त्रांची मदत मिळावी म्हणून आवाहन करत आहेत. रशियाच्या आक्रमणापुढं यूक्रेन कमजोर दिसत असला तरी राष्ट्रपती वोलोदेमीर झेलेन्स्की (volodymyr zelensky)  आणि यूक्रेनची जनता झुकलेली नाही. यूक्रेनची जनता रशियाच्या आक्रमणाला धाडसानं तोंड देत आहे. रशियाच्या लष्काराचे रणगाडे यूक्रेनच्या सामान्य जनतेनं अडवल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्या व्हिडीओत चेरनिहीव प्रांतातील तो व्हिडीओ असल्याचं म्हटलं जातंय. व्हिडीओत आपणाला यूक्रेनचे नागरिक रशियन रणगाडे रोखत असल्याचं समोर आलं आहे. यामुळं यूक्रेनचे लोक एक प्रकारे राष्ट्रपती वोलेदिमीर झेलेन्स्की यांना युद्धाच्या प्रसंगी पाठिशी राहत असल्याच दिसून येत आहे.

पाहा व्हिडीओ

युक्रेनची सामान्य जनता झेलेन्स्की यांच्या पाठिशी

रशियानं युक्रेन विरोधात लढाई सुरु केल्यानंतर काही नागरिकांनी देश सोडून दुसऱ्या देशात आश्रय घेतलाय. तर, दुसरीकडे काही नागरिक देशात राहूनच रशियन आक्रमणाला तोंड देत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी रशियन रणगाडा युक्रेनचा नागरिक ट्रॅक्टर लावून ओढून नेत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर रशियाच्या सैनिकाला युक्रेनची एक महिला देखील जाब विचारत असल्याचा व्हिडीओ समोर आला होता. आता चेरनिहीव येथील हा व्हिडीओ युक्रेनच्या नागरिकांनी अद्याप लढण्याचं स्पिरीट सोडलं नसल्याचं दिसून आलं आहे.

रशियाकडून बॉम्ब हल्ले सुरुच

रशियाने सुरूवातीला युक्रेनमध्ये प्रवेश केल्यानंतर युक्रेनची राजधानी कीव मध्ये असलेल्या लष्करीसाठा नष्ठ करण्याचं काम केलं. त्यानंतर त्यांनी तिथल्या सरकारी कार्यालये नष्ठ करण्याचं काम केलं. हे करीत असताना रशियाच्या बॉम्ब हल्ल्यात अनेक नागरिकांचा मृत्यू झाल्याचे पाहायला मिळालं आहे. दुसरीकडे युक्रेन आणि रशिया यांच्यातील चर्चेची पहिली फेरी निष्फळ ठरली आहे. आता रशिया आणि युक्रेन यांच्यात दुसऱ्या फेरीची चर्चा सुरु आहे. दुसरीकडे रशियानं युक्रेनविरोधात भीषण हल्ले सुरुचं ठेवले आहेत.

इतर बातम्या :

Video: ना प्रसुतीगृह सोडलं ना पोलीस हेडक्वार्टर्स, रशियाच्या बाँब हल्ल्यात मजबूत इमारतीही जमीनदोस्त

Nuclear War: अर्ध्या तासात 10 करोड लोकांचा मृत्यू, जाणून घ्या आण्विक युद्ध झालं तर काय होऊ शकतं ?

मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट.
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.