Ultra Hot Jupiter: या ग्रहावर एक वर्ष फक्त 16 तासांचा आहे! NASA शास्त्रज्ञांना नवीन शोध

TOI-2109b ग्रह आतापर्यंत शोधलेला दुसरा सर्वात उष्ण ग्रह आहे. या नवीन ग्रहाबद्दल आश्चर्यकारक बाब म्हणजे तो सुर्याभोवती फक्त 16 तासांत आपली प्रदक्षिणा पूर्ण करतो. याचा अर्थ या ग्रहावरील एक वर्ष फक्त 16 तासांचे आहे.

| Edited By: | Updated on: Nov 28, 2021 | 6:37 PM
1 / 5
खगोलशास्त्रज्ञांनी सूर्यमालेच्या (Solar system) बाहेर एक नवीन ग्रह शोधला आहे. शास्त्रज्ञांनी या नवीन ग्रहाला TOI-2109b असे नाव दिले आहे. आतापर्यंत असे 4000 हून अधिक ग्रहांचा शोध लागला आहे, जे सूर्यमालेबाहेर परिक्रमा करतात. हे ग्रह पृथ्वीपासून हजारो प्रकाशवर्षे (light years) दूर आहेत.

2 / 5
TOI-2109b ग्रह आतापर्यंत शोधलेला दुसरा सर्वात उष्ण ग्रह आहे. या नवीन ग्रहाबद्दल आश्चर्यकारक बाब म्हणजे तो सुर्याभोवती फक्त 16 तासांत आपली प्रदक्षिणा पूर्ण करतो. याचा अर्थ या ग्रहावरील एक वर्ष फक्त 16 तासांचे आहे.

TOI-2109b ग्रह आतापर्यंत शोधलेला दुसरा सर्वात उष्ण ग्रह आहे. या नवीन ग्रहाबद्दल आश्चर्यकारक बाब म्हणजे तो सुर्याभोवती फक्त 16 तासांत आपली प्रदक्षिणा पूर्ण करतो. याचा अर्थ या ग्रहावरील एक वर्ष फक्त 16 तासांचे आहे.

3 / 5
सूर्यमालेतील खगोलशास्त्रज्ञांनी शोधलेले बहुतेक ग्रह नेपच्यूनसारखे आहेत आणि काही पृथ्वीसारखे आहेत. पण, हा नवीन ग्रह एक वायूमय ग्रह आहे, ज्याला 'अल्ट्रा हॉट ज्युपिटर' म्हणूनही संबोधलं जातय. असा ग्रह अजून पर्यंत सापडला नव्हता. A

4 / 5
गेल्या काही वर्षात खगोलशास्त्रज्ञांना अनेक हॉट ज्युपिटर सापडले आहेत. तथापि, या नवीन ग्रहाला अल्ट्रा हॉट ज्युपिटर असे म्हटले जाते कारण या ग्रहावरील तापमान 3300 अंश सेन्सिअस आहे आणि हा दुसरा सर्वात उष्ण ग्रह आहे.

5 / 5
MIT च्या नेतृत्वाखालील मिशनने NASA च्या Transiting Exoplanet Survey Satellite (TESS) द्वारे या TOI-2109b अल्ट्राहॉट ग्रहाचा शोध लावला आहे. हा शोध खगोलशास्त्रीय जर्नलमध्ये (Ashtronomical Journal) प्रकाशित झाला आहे.