Joe biden : जो बायडन सायकल चालवत होते अन् बघता-बघता भररस्त्यात पडले!, पाहा व्हीडिओ…
ग्रुपमध्ये अनेकजण सायकल चालवताना दिसत आहेत. त्यांच्यात जो बायडनदेखील आहेत. सायकल पुढे येते तेव्हा बायडन ती सायकल थांबवतात. अन् तोल जावून बायडन खाली पडतात.
मुंबई : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचा नुकताच अपघात झालाय. काल (शनिवार) ते अमेरिकेतील डेलावेर राज्यातील त्यांच्या फार्म हाऊसच्या आवारात फिरत असताना हा अपघात झाला. बायडन सुट्टी इजॉय करण्यासाठी सायकलवरून फेर फटका मारत होते. तेव्हा ते सायकलवरून पडले. अन् सगळेच अवाक झाले.
जो बायडन यांचा अपघात
जो बायडन यांचा नुकताच अपघात झालाय. काल (शनिवार) ते अमेरिकेतील डेलावेर राज्यातील त्यांच्या फार्म हाऊसच्या आवारात फिरत असताना हा अपघात झाला. बायडन सुट्टी इजॉय करण्यासाठी सायकलवरून फेर फटका मारत होते. तेव्हा ते सायकलवरून पडले. अन् सगळेच अवाक झाले.
BBC CNN
Breaking News! Putin sabotaged Biden‘s Bike to make him fall! pic.twitter.com/lmqqjetGc7
— Levi (@Levi_godman) June 18, 2022
ग्रुपमध्ये अनेकजण सायकल चालवताना दिसत आहेत. त्यांच्यात जो बायडनदेखील आहेत. सायकल पुढे येते तेव्हा बायडन ती सायकल थांबवतात. अन् तोल जावून बायडन खाली पडतात. तेव्हा उपस्थित त्यांच्या मदतीला धावले तेव्हा “मी ठीक आहे”, असं बायडन म्हणाले.
Biden just beefed it on his bike in Delaware pic.twitter.com/eYj2oG0tHJ
— Quoth the Raven (@QTRResearch) June 18, 2022
बायडन यांनी या अपघाताबाबत माहिती दिली आहे. “मी सायकलवरून उतरताना पाय पेडलवरून घसरला. अन् मी पडलो पण मला कोणत्याही वैद्यकीय मदतीची गरज नाही. मी ठणठणीत आहे. उरलेल्या वेळात मी माझ्या कुटुंबासोबत मजा करणार आहे”, असं बायडन यांनी सांगितलं. व्हाईट हाऊसमधील सरकारी अधिकाऱ्यानेही या अपघाताबाबत माहिती दिली. ” बायडन यांचा अपघात झाला ही खरी गोष्ट आहे. पण त्यांची तब्येत अगदी उत्तम आहे.”
I’m just shocked they let him ride a bike without training wheels. https://t.co/AXctSEEmQC
— Donald Trump Jr. (@DonaldJTrumpJr) June 18, 2022
मागच्या महिन्यातही बायडन एअर फोर्स वनच्या पायऱ्या चढताना जवळजवळ पडले होते. अशीच एक घटना गेल्या वर्षी अटलांटा इथेही घडली होती. तेव्हा बायडन तीन वेळा विमानाच्या पायऱ्यांवर अडखळले होते. सध्या बायडन त्यांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी त्यांच्या पत्नीसोबत डेलावेअरमध्ये आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रेहोबोथ बीचवर सुट्टी इन्जॉय करत आहेत.