Donald Trump : राष्ट्राध्यक्ष निवडणुकीआधी ट्रम्प यांची मोठी खेळी, हिंदुंच्या समर्थनार्थ मोठं वक्तव्य

Donald Trump : अमेरिकेत येत्या 5 नोव्हेंबरला राष्ट्राध्यक्ष निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. त्याआधी डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठी खेळी केली आहे. त्यांनी हिंदुंच्या मुद्यावरुन मोठ वक्तव्य केलं आहे. असं करुन त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार कमला हॅरिस यांना अडचणीत आणलं आहे. डोनाल्ड ट्रम्प काय बोललेत ते जाणून घेऊया.

Donald Trump : राष्ट्राध्यक्ष निवडणुकीआधी ट्रम्प यांची मोठी खेळी, हिंदुंच्या समर्थनार्थ मोठं वक्तव्य
donald trump kamala harris
Follow us
| Updated on: Nov 01, 2024 | 9:57 AM

अमेरिकेचे माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. ट्रम्प यांनी या प्रसंगी बांग्लादेशमध्ये हिंदुंवर झालेल्या हल्ल्याचा निषेध केला. भारतासोबत संबंध अधिक बळकट करण्याचा त्यांनी संकल्प केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपले चांगले मित्र असल्याच त्यांनी सांगितलं. “अमेरिकेला पुन्हा मजबूत बनवू. इथे शांतता निर्माण करु आणि अमेरिकेतील हिंदुंच सुद्धा रक्षण करु” असं ट्रम्प म्हणाले. अमेरिकेत 5 नोव्हेंबरला राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प रिपब्लिकन पार्टीचे उमेदवार आहेत. डेमोक्रॅटिक पार्टीकडून कमला हॅरिस निवडणूक मैदानात आहेत. दिवाळीच्या शुभेच्छा देताना डोनाल्ड ट्रम्प यांनी बांग्लादेशी हिंदुंचा उल्लेख केला. बांग्लादेशात पूर्णपणे अराजकता निर्माण झाल्याच ते म्हणाले.

“बांग्लादेशात हिंदु, ख्रिश्चन आणि अन्य अल्पसंख्यांकांविरुद्ध जो क्रूर हिंसाचार सुरु आहे, त्याचा मी निषेध करतो” असं डोनाल्ड ट्रम्प सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हणाले. “बांग्लादेशात अल्पसंख्याकांवर हल्ले सुरु आहेत. लूटपाट होत आहे. बांग्लादेशात पूर्णपणे अराजकतेची स्थिती आहे” असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार कमला हॅरिस आणि राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्यावर हिंदुंच्या मुद्यावरुन मोठा आरोप केला. “उपराष्ट्रपती कमला हॅरिस आणि राष्ट्रपती ज्यो बायडेन यांनी जगभरातील आणि अमेरिकेतील हिंदुंकडे दुर्लक्ष केलय असं ट्रम्प म्हणाले. माझं सरकार आल्यानंतर मी भारत आणि माझे चांगले मित्र पंतप्रधान मोदींसोबत पार्टनरशिप अधिक भक्कम करीन” असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.

‘वाईटावर चांगल्याचा विजय होईल’

डोनाल्ड ट्रम्प कमला हॅरिसवर निशाणा साधताना म्हणाले की, “कमला हॅरिस टॅक्स वाढवून तुमचा छोटा बिझनेस संपवेल. मी आल्यावर टॅक्स कपात करेन” त्यांनी सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. “दिवाळी हा प्रकाशाचा उत्सव असून वाईटावर चांगल्याचा विजय होईल” असं ट्रम्प म्हणाले.

‘जमावाने हिंदुंवर हल्ले केले होते’

पहिल्यांदाच डोनाल्ड ट्रम्प हे बांग्लादेशच्या मुद्यावर बोलले आहेत. बांग्लादेशमध्ये मागच्या महिन्यात सत्तापालट झाला. त्यावेळी देशातील स्थिती बिघडली होती. लोकांच्या जमावाने हिंदुंवर हल्ले केले होते. यात अनेक हिंदुंचा मृत्यू झाला. अनेक जखमी झाले. हिंदुंच्या घरांना आगी लावणं, जाळपोळ अशा घटना सुद्धा बांग्लादेशमध्ये घडल्या.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.