USA vs Russia : अमेरिकेने फायटर जेट्समध्ये बसवलं माको, काय आहे हे? रशिया-चीनची हालत होईल खराब

USA vs Russia : यामुळे अमेरिकन फायटर जेट्सची ताकद कैकपटीने वाढणार आहे. अमेरिकन एअर फोर्सनंतर अमेरिकन नौदलानेही या अस्त्राचा वापर करावा, अशी लॉकहीड मार्टिनची इच्छा आहे. काय आहे माको? किती घातक आहे?

USA vs Russia : अमेरिकेने फायटर जेट्समध्ये बसवलं माको, काय आहे हे? रशिया-चीनची हालत होईल खराब
American Fighter jetsImage Credit source: Lockheed Martin
Follow us
| Updated on: Jul 26, 2024 | 2:00 PM

तुम्ही फक्त नाव घ्या…F-15, F-16, F-18, F-35, F-22 फायटर जेट असो किंवा B-1B, B-52, B-21 बॉम्बर. अमेरिका आपल्या सर्व लढाऊ विमानांमध्ये नवीन हायपरसोनिक मिसाइल फिट करणार आहे. या मिसाइलच नाव आहे, Mako. लॉकहीड मार्टिनने हे मिसाइल बनवलय. या मिसाइलला मल्टी-मिशन वेपन म्हटलं जातं. हे मिसाइल समुद्र, हवा, एयर डिफेंस सिस्टमवर हल्ला करण्याास सक्षम आहे. अमेरिकेने आपले सर्व फायटर जेट्स, बॉम्बवर्षक विमान आणि टेहळणी विमानामध्ये या मिसाइलची चाचणी केलीय. एफ-18 सुपर हॉर्नेट आणि एफ-15 मध्ये सुद्घा हे मिसाइल फिट होऊ शकतं.

एफ-22 रॅप्टर आणि एफ-35 लाइटनिंग-2 मध्ये सुद्धा हे मिसाइल बसवलं जाणार आहे. त्याशिवाय अमेरिकेच्या बॉम्बवर्षक विमानातही फिट केलं जाईल. यामुळे अमेरिकन फायटर जेट्सची ताकद कैकपटीने वाढणार आहे. हे अत्याधुनिक खतरनाक मिसाइल अमेरिकेच्या चौथ्या पिढीच्या फायटर जेट्सपासून पाचवी आणि सहाव्या पिढीच्या स्टेल्थ फायटर एयरक्राफ्ट्समधुन सुद्धा डागता येईल.

सॉलिड रॉकेट मोटर

हे मिसाइल हवेतून लॉन्च करता येईल. म्हणजे कुठल्याही फायटर जेटमधून डागता येईल. 590 किलोग्रॅम वजनाच्या या मिसाइलमध्ये 130 किलोग्रॅम वॉरहेड फिट करता येऊ शकतं. 13 फुट लांब आणि 13 इंच व्यास वाल्या या मिसाइलमध्ये सॉलिड रॉकेट मोटर आहे. ज्यामुळे या क्षेपणास्त्राला 6200 किलोमीटर प्रतितास गती मिळते.

या घातक अस्त्राबद्दल कधी झाला खुलासा?

एप्रिल महिन्यात या मिसाइल बद्दल खुलासा झाला. मेरीलँड या संरक्षण प्रदर्शनात हे मिसाइल दाखवण्यात आलं. अमेरिकन एअर फोर्सनंतर अमेरिकन नौदलानेही या मिसाइलचा वापर करावा, अशी लॉकहीड मार्टिनची इच्छा आहे. पाणबुडी आणि युद्धनौकेवरुन लॉन्च होणाऱ्या Mako मिसाइलचा वेरिएंट बनवण्यात येतोय.

फायटर जेट सोबत विंध्वंसक मिसाइल

Mako मिसाइलद्वारे रशिया आणि चीनच्या प्रशांत महासागरातील एंटी-एक्सेस आणि एरिया डिनायल (A2/AD) शस्त्र, यंत्र नष्ट करता येऊ शकतात. आतापर्यंत जी हायपरसॉनिक मिसाइल्स होती, ती आकाराने मोठी होती. माको मिसाइल आकारने छोटं आणि दमदार आहे. वजनाने हे हलकं क्षेपणास्त्र आहे. खतरनाक फायटर जेट सोबत विंध्वंसक मिसाइल. कुठल्याही एयर डिफेंस सिस्टिमला हे मिसाइल रोखता येणार नाही.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.