UNSC Membership : आता या मुस्लीम देशाने भारताला दिला पाठिंबा

भारताचे वर्चस्व आता जागतिक स्तरावर वाढले आहे. अनेक अरब देश भारतासोबत मैत्रीपूर्ण संबंध वाढवत आहेत. यामध्ये अनेक महत्त्वाच्या देशांचा समावेश आहे. भारत करत असलेल्या मागणीला अनेक देश आता पाठिंबा देऊ लागले आहेत. मुस्लीम राष्ट्र भारताचे समर्थन करत असल्याने तिकडे पाकिस्तानच्या चिंता वाढल्या आहेत.

UNSC Membership : आता या मुस्लीम देशाने भारताला दिला पाठिंबा
Follow us
| Updated on: Feb 24, 2024 | 2:36 PM

saudi support India : भारताने गेल्या १० वर्षात अनेक देशांसोबत मैत्रीचे संबंध आणखी घट्ट केले आहेत. यामध्ये आखाती देशांचा देखील समावेश आहे. भारतासोबत व्यापार वाढवण्यासाठी अनेक देशांमध्ये चढाओढ लागली आहे. ज्यामध्ये सौदी अरेबिया, दुबई या सारख्या देशांचा समावेश आहे. दुसरीकडे सौदी अरेबियाने भारताला पुढे येऊन पाठिंबा दिला आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताला देखील स्थान मिळावे यासाठी सौदी अरेबियाने भारताचे समर्थन केले आहे. यूएईकडून मिळालेला पाठिंबा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. परिषदेत सुधारणा करण्याचे आवाहन भारताने केले आहे. त्याला देखील सौदीने पाठिंबा दिला आहे.

सौदी अरेबियाकडून भारताला पाठिंबा

सौदी अरेबियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सुरक्षा परिषदेत काही सुधारणांची गरज आहे. आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा यामध्ये दुहेरी मापदंड न ठेवता विश्वासार्हता असेल तर तसे करणे आवश्यक असल्याचे त्यात म्हटले आहे.

गाझामध्ये तात्काळ युद्धबंदीची मागणी करण्यात आली होती. पण याला अमेरिकेने व्हेटो केल्यानंतर सौदी अरेबियाने ही मागणी केली आहे. गाझामध्ये अमेरिकेने दुटप्पीपणा स्वीकारल्याचा आरोपही सौदीने केला आहे. उल्लेखनीय आहे की भारताने वारंवार UNSC च्या विस्ताराची मागणी केली आहे आणि पाच स्थायी सदस्यांच्या वर्चस्वाला आव्हान दिले आहे. अमेरिका, ब्रिटन, चीन, रशिया आणि फ्रान्स हे UNSC चे पाच स्थायी सदस्य देश आहेत, ज्यांना P-5 राष्ट्र म्हणून ओळखले जाते.

भारत स्थायी सदस्य नाही

संयुक्त राष्ट्रातील भारताच्या स्थायी प्रतिनिधी रुचिका कंबोज यांनी म्हटले की, 188 सदस्य असलेल्या देशांवर केवळ पाच देश किती काळ राज्य करत राहणार हा प्रश्न आहे. हे बदलणे अत्यंत गरजेचे आहे. जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश असूनही भारत अद्याप सुरक्षा परिषदेचा स्थायी सदस्य नाही. अलीकडेच भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर म्हणाले होते की, आम्ही हे साध्य करू, पण ते इतक्या सहजासहजी होणार नाही. भारताला स्थायी सदस्य करण्यासाठी आतापर्यंत रशिया, अमेरिका आणि फ्रान्सने देखील पाठिंबा दर्शवला आहे. पण चीनचा याला विरोध आहे.

भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ.
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार.
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य.
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड.
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत.
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.