Monkeypox Virus: कोरोनानंतर जगावर मंकीपॉक्सचं संकट; मंकीपॉक्स पोहोचला 20 देशांमध्ये; WHO ने जारी केले निवेदन

आतापर्यंत मंकीपॉक्सने बाधित रूग्ण हे फक्त मध्य आणि पश्चिम आफ्रिकन देशांमध्येच समोर येत होते. पण आता युरोपीय देशांमध्येही त्याचा प्रसार झपाट्याने होत आहे.

Monkeypox Virus: कोरोनानंतर जगावर मंकीपॉक्सचं संकट; मंकीपॉक्स पोहोचला 20 देशांमध्ये; WHO ने जारी केले निवेदन
मंकीपॉक्सImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 27, 2022 | 5:48 PM

Monkeypox Virus:जगात कोरोनाने (Corona) थैमान घातले. त्यामुळे अख्या जगालाच लॉकडाऊन व्हावं लागलं होतं. कोरोनाचा दोन वर्षांतील कहर आता कुठं कमी होत असून जनजीवन सुरळीत होत आहे. याचदरम्यान जगावर पुन्हा नवे संकंट ओढावले आहे. ते म्हणजे मंकीपॉक्स (Monkey Pox). कोरोनानंतर मंकीपॉक्स या आजाराने आपल् पाय पसरायला सुरूवात केली असून तो आता जगातील 20 हून अधिक देशांमध्ये पसरला आहे. आणि या देशांमध्ये सुमारे 200 रुग्णांची नोंद झाली आहे. याशिवाय 100 हून अधिक संशयित रुग्ण आढळून आले आहेत. मंकीपॉक्सचे रुग्णांच्या बाबतीत जे देश सुरक्षित होते तेथे देखील मंकीपॉक्सचे रुग्ण आढळून आले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) शुक्रवारी ही माहिती दिली. मंकीपॉक्स हा एक प्रकारचा विषाणू आहे, जो वन्य प्राण्यांना संक्रमित करतो आणि त्यांच्यापासून मानवापर्यंत पोहोचतो. हा चिकन पॉक्स कुटुंबातील आजार आहे.

युरोपीय देशांमध्येही प्रसार झपाट्याने

आतापर्यंत मंकीपॉक्सने बाधित रूग्ण हे फक्त मध्य आणि पश्चिम आफ्रिकन देशांमध्येच समोर येत होते. पण आता युरोपीय देशांमध्येही त्याचा प्रसार झपाट्याने होत आहे. हा आजार शास्त्रज्ञांनी 1958 मध्ये पहिल्यांदा शोधला होता. त्यानंतर चेचक सारखे दोन आजार झाले. डॉक्टरांनी माकडांवर संशोधन केले, त्यानंतर या आजाराला मंकीपॉक्स असे नाव देण्यात आले. मानवांमध्ये मंकीपॉक्स विषाणूचे पहिले प्रकरण 1970 मध्ये नोंदवले गेले. त्यानंतर आफ्रिकन देश काँगोच्या सुदूर पूर्व भागात एका मुलाला या विषाणूची लागण झाल्याचे आढळून आले.

आफ्रिकन देशांमध्ये हजारो बाधित

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचा अंदाज आहे की दरवर्षी डझनभर आफ्रिकन देशांमध्ये मंकीपॉक्स संसर्गाची हजारो प्रकरणे समोर येत आहेत. बहुतेक प्रकरणे काँगोमधून समोर येत आहेत. हा आकडा वार्षिक सुमारे 6000 आहे. तर नायजेरियामध्ये दरवर्षी सुमारे 3000 प्रकरणे नोंदवली जात आहेत. मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण ब्रिटनमध्ये 7 मे रोजी आढळून आला होता. अलिकडच्या आठवड्यात, व्हायरस उत्तर अमेरिका आणि युरोपमध्ये पसरला आहे. व्हायरसने ग्रस्त असलेले रुग्ण काही आठवड्यांत बरे होतात. यातून आतापर्यंत एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही.

हे सुद्धा वाचा

युरोपमध्ये 118 प्रकरणांची पुष्टी

युरोपियन युनियनच्या रोग प्रतिबंधक आणि नियंत्रण केंद्राने (EU) मंकीपॉक्सच्या 118 प्रकरणांची नोंद केली आहे. स्पेन आणि पोर्तुगालमध्ये संसर्ग सर्वात जास्त पसरत असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. तसेच स्पेनमध्ये 51 आणि पोर्तुगालमध्ये 37 बाधित समोर आले आहेत. ब्रिटनच्या आरोग्य संस्थेने व्हायरसच्या 90 प्रकरणांची नोंद केली आहे. यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल (CDC) ने सात राज्यांमध्ये नऊ प्रकरणे ओळखली आहेत. कॅनडाच्या आरोग्य अधिकार्‍यांनी मंकीपॉक्सच्या 16 प्रकरणांची नोंद केली आहे. एका रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की, ही सर्व प्रकरणे क्यूबेक प्रांतात समोर आली आहेत. सीडीसीच्या संचालक रोशेल व्हॅलेस्की यांनी सांगितले की, यूएसमध्ये आढळून आलेले मंकीपॉक्सचे रुग्ण हे झपाट्याने पसरत असलेल्या देशांमध्ये गेले नाहीत. ते म्हणाले की असे होऊ शकते की विषाणू देशांतर्गत पसरत आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.