America Sonobuoy : अमेरिका लवकरच भारताला देणार गेमचेंजर सोनोबॉय, त्यामुळे काय घडू शकतं?
America Sonobuoy : अमेरिकेकडून लवकरच भारताला सोनोबॉय सिस्टिम मिळणार आहे. हे गेमचेंजर अस्त्र आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अमेरिका दौऱ्यादरम्यान भारताला हे यश मिळालय. यासाठी अंदाजित 52.8 मिलियन डॉलरचा खर्च येणार आहे.
अमेरिकेने भारताला सोनोबॉयची विक्री करण्यास मंजुरी दिली आहे. सोनोबॉय हे एंटी सबमरीन उपकरण आहे. त्यामुळे सागरात भारताची ताकद वाढणार आहे. भारताला हे उपकरण खरेदीसाठी अंदाजित 52.8 मिलियन डॉलरचा खर्च येणार आहे. या उपकरणाच्या मदतीने भारतीय नौदलाला सहजतेने आपल्या समुद्र क्षेत्रातील शत्रुच्या पाणबुड्या शोधून काढता येतील. सोनोबॉयमुळे भारतीय नौदलाची ताकद किती वाढेल? ते जाणून घेऊया. भारताला होणाऱ्या सोनोबॉयच्या विक्रीबद्दल काँग्रेसला सूचित करण्यात आलं आहे, असं अमेरिकेच्या संरक्षण सहकार्य एजन्सीने सांगितलं.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अमेरिका दौऱ्यादरम्यान भारताला हे यश मिळालय. अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉयड ऑस्टिन यांच्यासोबत भारत-अमेरिका द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत बनवण्यासाठी पेंटागनशी चर्चा केली. या दरम्यान संरक्षण सहकार्य, क्षेत्रीय सुरक्षा, औद्योगिक सहकार्य, भारत-प्रशांत क्षेत्र आणि अन्य महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय मुद्यांवर चर्चा झाली. त्याचवेळी ही एंटी सबमरीन वारफेयर सोनोबॉयच्या खरेदीचा करार झाला.
ही सिस्टिम कशी काम करते?
सोनोबॉय एक पोर्टेबल सोनार सिस्टिम आहे. सोनार म्हणजे साऊंड नेविगेशन एंड रेजिंग सिस्टमच्या मदतीने लांबच्या कुठल्या वस्तुची माहिती मिळवणं. ही वस्तू किती लांब आहे? त्याची स्थिती, दिशा याची माहिती मिळवली जाते. त्यासाठी साऊंड वेव्जची मदत घेतली जाते. या सिस्टमद्वारे पाण्यात साऊंड वेव्ज सोडल्या जातात. त्यांच्या मार्गात एखादी वस्तू आली तर त्याला धडकून इको म्हणजे (प्रतिध्वनी) येतो. या साऊंड वेव्ज सोडल्यानंतर त्यांना परत यायला किती वेळ लागतो? यावरुन वस्तू किती लांब आहे ते समजतं.
खासियत काय?
सोनोबॉय जवळपास तीन फुट लांब आणि पाच इंच व्यासाची सोनार सिस्टिम आहे. याची खासियत ही आहे की, पाणबुडी शोधण्यासाठी जहाज, हेलीकॉप्टर, विमान, युद्धनौका आणि पाणबुडीवरुन समुद्रात सोनोबॉयला टाकलं जातं. सोनाबॉय एक्टिव, पॅसिव आणि स्पेशल पर्पज असं तीन प्रकारच असतं.
पोर्टेबल सोनार सिस्टम एकॉस्टिक उपकरण
सोनाबॉय हे अमेरिकी टेक्नोलॉजीच उपकरण आहे. एमएच-60आर हेलीकॉप्टरद्वारे समुद्रात हे उपकरण टाकून पाणबुडीचा शोध घेता येऊ शकतो. भारतीय नौदलाला या सिस्टिमने सुसज्ज करण्यात अडचण येणार नाही. कारण ही एक पोर्टेबल सोनार सिस्टम एकॉस्टिक सेंसरने सज्ज आहे. भारतीय नौदलाला या उपकरणाद्वारे शत्रुच्या पाणबुडीचा अत्यंत हळू आवाजही सहज, स्पष्टपणे ऐकू येईल. युद्धकाळात शत्रूच्या पाणबुडीला जलसमाधी देण्यासाठी हे उपकरण महत्त्वाची भूमिका बजावेल.