आधी वाऱ्यावर सोडलं आता तालिबानसोबत अमेरीकेची पडद्याआड चर्चा, टॉपचा अधिकारी काबूलमध्ये

अमेरीकेचे टॉपचे जासूस आणि तालिबानचा टॉपचा लीडर अब्दूल गनी बरादर (Abdul Ghani Baradar) यांच्यात काबूलमध्ये (Kabul)मध्ये गुप्त बैठक पार पडलीय.

आधी वाऱ्यावर सोडलं आता तालिबानसोबत अमेरीकेची पडद्याआड चर्चा, टॉपचा अधिकारी काबूलमध्ये
William J Burns Abdul Ghani Baradar
Follow us
| Updated on: Aug 24, 2021 | 7:10 PM

नवी दिल्ली: आधी अमेरीकेनं (Amercia) अफगाण जनतेला तालिबानच्या(Taliban) जबड्यात ढकललं. आता तिच अमेरीका तालिबानसोबत गुप्त गाठीभेटी करत असल्याचं वृत्त आहे. अमेरीकेचे टॉपचे जासूस आणि तालिबानचा टॉपचा लीडर अब्दूल गनी बरादर (Abdul Ghani Baradar) यांच्यात काबूलमध्ये (Kabul)मध्ये गुप्त बैठक पार पडलीय. एका मीडिया रिपोर्टनुसार 15 ऑगस्ट म्हणजेच तालिबाननं अफगाणिस्तानवर (Afghanistan)कब्जा केल्यानंतर दोन्ही देशातली ही पहिली टॉपची बैठक पार पडली. अफगाणिस्तानमध्ये तालिबाननं कब्जा केलाय. त्यानंतर राष्ट्रपती अशरफ गनी यांना पळ काढून संयुक्त अरब अमीरात(UAE)मध्ये आश्रय घ्यावा लागलाय.

वाशिंग्टन पोस्टमध्ये प्रकाशित बातमीनुसार- अमेरीकेची गुप्तचर संघटना CIA चे डायरेक्टर विल्यम जे बर्न्स(William J Burns) आणि तालिबानी नेते मुल्ला अब्दूल गनी बरादर यांच्यात काल एक गुप्त बैठक पार पडलीय. अमेरीकेचे अध्यक्ष जो बिडेन यांनीच सीआयएच्या टॉपच्या अधिकाऱ्याला तालिबानसोबत चर्चा करण्यासाठी पाठवलेलं आहे. काबूलमधून लोकांना विमानानं बाहेर काढण्यात अनेक अडचणी येतायत, त्याच पार्श्वभूमीवर ह्या भेटीला महत्व प्राप्त झालंय. खुद्द बिडेन यांनीच, अफगाणिस्तानमधून लोकांना एअरलिफ्ट करणं इतिहासातलं सर्वात कठिण मिशन असल्याचं म्हटलंय.

अमेरीकेवर मित्रपक्षांचा दबाव

जोपर्यंत अमेरीकेचा शेवटचा सैनिक अफगाणिस्तानमधून जात नाही तोपर्यंत सरकार स्थापनार नाही अशी भूमिका तालिबाननं घेतलीय. त्यातच अमेरीका आणि मित्रा पक्षांवर तालिबान कडक भूमिका घेत अडचणी निर्माण करतंय. त्यामुळेच अमेरीकेतल्या सैनिकांना महिन्याच्या शेवटपर्यंत अफगाणिस्तानमध्येच ठेवा, अशा दबाव मित्रपक्षांकडून वाढतोय. पुढच्या आठवड्याभरात अमेरीकेन, युरोपियन तसच इतर नागरीकांना अफगाणिस्तानमधून काढलं जाईल, तोपर्यंत अमेरीकन सैनिक अफगाणिस्तानमध्येच रहावेत असा अमेरीकेवर दबाव आहे. ह्या सगळ्या प्रक्रियेला तालिबाननं मदत करावी याची बोलणी अमेरीका करत असल्याचं वॉशिंग्टन पोस्टच्या वृत्तात म्हटलंय. तालिबान मात्र अशा कुठल्याही तडजोडीला तयार होत नाहीय. आता ह्या भेटीनंतर तालिबानची काय भूमिका असेल याची उत्सुकता आहे.

बरादर आणि तालिबानची भूमिका

अमेरीका किंवा त्यांच्या मित्र देशांशी कुठलाही समझोता करायला तालिबान तयार नाही. तालिबानचा प्रवक्ता सुहैल शाहीनने स्पष्ट केलंय- जर अमेरीका आणि ब्रिटननं जर 31 ऑगस्टच्यानंतरही स्वत:चं सैन्य जर अफगाणिस्तानमध्ये ठेवलं तर त्याचे परिणाम गंभीर होती असा इशारा तालिबाननं दिलाय. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर अमेरीकेला अपेक्षा अब्दूल गनी बरादरकडूनच आहे. कारण अब्दूल गनी बरादर हा पाकिस्तानच्या जेलमध्ये आठ वर्ष राहीला. अमेरीकेच्या दबावानंतरच त्याला तिथून सोडण्यात आलं. आता तोच अफगाणिस्तानचा नवा राष्ट्रपती असेल अशी शक्यता वर्तवली जातेय. कतारमध्ये जी शांती वार्ता झाली, त्यात बरादर हाच प्रमुख व्यक्ती होता. त्यामुळे आता बरादरच्याच भूमिकेकडे अमेरीकेचं लक्ष आहे.

इतर बातम्या:

Afghanistan Crisis: अफगाणिस्तानमध्ये तालिबानच नाही, तर ISIS चाही धोका, जगातील बलाढ्य NATO सैन्यानेही गुडघे टेकले?

काबूल विमानतळावर हल्लेखोर आणि अफगाण सुरक्षा दलांमध्ये चकमक, एक सैनिक ठार, तीन जखमी

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.