‘त्या’ पराभवी राष्ट्राध्यक्षांच्या यादीत डोनाल्ड ट्रम्प यांचंही नाव, ट्रम्प ठरले पाचवे कमनशिबी अध्यक्ष

अध्यक्षपदाच्या निवडणुकीत दुसऱ्यांदा उमेदवारी लढून पराभवी झालेले डोनाल्ड ट्रम्प हे गेल्या तीन दशकातील पहिले अध्यक्ष ठरले आहेत (US election 2020 Donald Trump becomes fifth president who lost his second term).

'त्या' पराभवी राष्ट्राध्यक्षांच्या यादीत डोनाल्ड ट्रम्प यांचंही नाव, ट्रम्प ठरले पाचवे कमनशिबी अध्यक्ष
Follow us
| Updated on: Nov 08, 2020 | 12:21 AM

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या अध्यक्षपदाचा निवडणुकीचा निकाल अखेर समोर आला आहे. डेमोक्रेट पक्षाचे उमेदवार जो बायडन यांनी रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव केला आहे. ‘न्यूयॉर्क टाइम्स’च्या वृत्तानुसार बायडन यांना 273 इलेक्ट्रोल व्होट मिळाले आहेत. तर डोनाल्ड ट्रम्प यांना 214 इलेक्ट्रोल व्होट मिळाले आहेत (US election 2020 Donald Trump becomes fifth president who lost his second term).

डोनाल्ड ट्रम्प गेल्या निवडणुकीत जिंकून आले होते. त्यानंतर या निवडणुकीत त्यांनी पुन्हा एकदा अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी नशिब आजमवलं. या निवडणुकीत ट्रम्प आणि बायडन यांच्यात प्रचंड चुरस पाहायला मिळाली. मात्र, अखेर ट्रम्प यांचा पराभव झाला (US election 2020 Donald Trump becomes fifth president who lost his second term).

अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत दुसऱ्यांदा लढून पराभूत झालेले डोनाल्ड ट्रम्प हे गेल्या तीन दशकातील पहिले अध्यक्ष ठरले आहेत. अमेरिकेच्या आतापर्यंतच्या इतिहासात अनेक राष्ट्राध्यक्षांना जनतेने पुन्हा निवडून दिलं आहे. विशेष म्हणजे गेल्या 100 वर्षात अमेरिकेत फक्त चार राष्ट्राध्यक्षांना पुन्हा निवडणूक लढवली असता पराभव पदरात पडला आहे. त्यांनंतर या यादीत डोनाल्ड ट्रम्प यांचाही समावेश झाला हे. ट्रम्प हे पाचवे कमनशिबी राष्ट्राध्यक्ष ठरले आहेत.

याआधी 1992 साली जॉर्ज एचडब्ल्यू बुश यांचा दुसऱ्या सत्रातील निवडणुकीत पराभव झाला होता. बुश यांच्यानंतर सर्व राष्ट्राध्यक्षांनी प्रत्येकी दोन वेळा निवडणूक जिंकली. यामध्ये बराक ओबामा, जॉर्ज डब्ल्यू बुश (जूनियर) आणि बिल क्लिंटन यांचा समावेश आहे.

जॉर्ज एच डब्ल्यू बुश

अमेरिकेत 1992 साली तत्कालीन अध्यक्ष जॉर्ज एच डब्ल्यू बुश यांचा राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभव झाला होता. त्यामुळे रिपब्लिकन पक्षाची सत्ता बरखास्त झाली होती. डेमोक्रेट पक्षाचे बिल क्लिंटन यांनी त्यांचा पराभव केला होता.

जिमी कार्टर

डेमोक्रेट पक्षाचे जिमी कार्टर 1980 साली पराभूत झाले होते. रिपब्लिकन पक्षाचे रोनाल्ड रिगन यांनी त्यांचा पराभव केला होता. रिगन यांना त्यावेळी सर्वाधिक मतं मिळाली होती.

जेराल्ड फोर्ड

त्याआधी 1976 साली रिपब्लिकन पक्षाचे जेराल्ड फोर्ड यांचा पराभव झाला होता. जिमी कार्टर यांनी त्यांचा पराभव केला होता. 1974 साली वाटरगेट स्कँडलनंतर तत्कालीन राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी आपल्या राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर तत्कालीन उपाध्यक्ष जेराल्ड फोर्ड यांना राष्ट्राध्यक्ष बनवण्यात आलं होतं.

हर्बर्ट हूवर

रिपब्लिकन पक्षाचे हर्बर्ट हूवर यांचा 1932 साली डेमोक्रेटिक पक्षाचे फ्रेंकलिन डी रुझवेल्ट यांनी पराभव केला होता. रुझवेल्ट यांच्यासाठी त्यावेळी हा मोठा विजय होता. कारण त्यावेळी अमेरिका देश आर्थिक मंदीची झळ सोसत होता.

संबंधित बातम्या :

जो बायडन अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष, ट्रम्प यांचा पराभव

‘जो’ जीता वही सिकंदर!; जाणून घ्या कोण आहेत जो बायडन?

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.