Kamala Harris | ‘तिने’ही इतिहास घडवला! जाणून घ्या कोण आहेत कमला हॅरिस?

अमेरिकेचे मुत्सद्दी नेते जो बायडन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचा दणदणीत पराभव केल्यानंतर त्यांच्याच डेमोक्रॅटिक पक्षाच्या कमला हॅरिस यांनीही उपराष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकून इतिहास घडवला आहे.

Kamala Harris | 'तिने'ही इतिहास घडवला! जाणून घ्या कोण आहेत कमला हॅरिस?
Follow us
| Updated on: Nov 08, 2020 | 12:06 AM

वॉशिंग्टन: अमेरिकेचे मुत्सद्दी नेते जो बायडन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचा दणदणीत पराभव केल्यानंतर त्यांच्याच डेमोक्रॅटिक पक्षाच्या कमला हॅरिस यांनीही उपराष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकून इतिहास घडवला आहे. अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षपदी निवडून येणाऱ्या त्या पहिल्या भारतीय वंशाच्या महिला आणि आशियाई महिला आहेत. त्यामुळे अमेरिकेत नव्या पर्वाला सुरुवात झाल्याचं बोललं जात आहेत. (US Election: Who is Kamala Harris?)

मूळच्या भारतीय वंशाच्या असलेल्या कमला हॅरिस यांचा राजकीय प्रवास थक्क करणारा आहे. 20 ऑक्टोबर 1964 रोजी कॅलिफोर्नियाच्या ऑकलंडमध्ये कमला हॅरिस यांचा जन्म झाला. त्यांचे वडील डोनाल्ड हॅरिस हे आफ्रिकेचे असून आई श्यामला गोपालन भारतीय आहेत. श्यामला गोपालन या तामिळनाडूतील चेन्नईच्या असून त्या स्तन कँसर रोगतज्ज्ञ होत्या. यूनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया बर्कले येथे डॉक्टरेट करण्यासाठी त्या 1960मध्ये तामिळनाडूहून अमेरिकेत आल्या होत्या. कमला यांचे वडील डोनाल्ड हॅरिस हे स्टॅनफोर्ड विद्यापीठाचे सेवानिवृत्त प्राध्यापक आहेत. ते अर्थशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी जमैकाहून अमेरिकेला आले होते. तिथेच श्यामला आणि डोनाल्ड हॅरिस यांची भेट झाली आणि प्रेमाचं रुपांतर लग्नात झालं. श्यामला आणि डोनाल्ड हॅरिस यांच्या कमला हॅरिस आणि माया या दोन मुली आहेत. मात्र, या दोन्ही बहिणी लहान असतानाच त्यांचे आई-वडील वेगळे झाले होते.

वकील ते उपराष्ट्राध्यक्षा

अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षपदी विराजमान झालेल्या कमला हॅरिस या पहिल्या आशियाई महिला आहेत. त्या डेमोक्रॅटच्या गेराल्डाइन फेरारो आणि रिपब्लिकनच्या सारा पॉलिननंतरच्या प्रमुख पक्षाच्या उपराष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरलेल्या तिसऱ्या महिला आहेत. कमला यांचं शिक्षण ऑकलंडमध्येच झालं. त्यांनी हॉवर्ड विद्यापीठातून पदवी घेतलेली आहे. त्यानंतर त्यांनी कॅलिफोर्निया विद्यापीठातून कायद्याचं शिक्षण घेतलं. त्यांनी सॅनफ्रान्सिस्कोमध्ये जिल्हा अॅटर्नी म्हणून काम पाहिलं आहे. 2003मध्ये त्या सॅनफ्रान्सिस्कोमध्ये जिल्हा वकील बनल्या होत्या.

त्यांनी 2017मध्ये कॅलिफोर्नियामधून संयुक्त राज्य सीनेटर म्हणून शपथ घेतली होती. या पदावर जाणाऱ्या त्या दुसऱ्या कृष्णवर्णीय महिला होत्या. त्यांनी होमलँड सिक्युरिटी अँड गव्हर्नमेंट अफेयर्स कमिटी, इंटेलिजन्सची सिलेक्ट कमिटी, ज्युडिशिअरी कमिटी आणि बजेट कमिटीवरही काम केलं आहे. विशेष म्हणजे त्या गेल्या वर्षीपर्यंत अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या स्पर्धेत होत्या. मात्र, त्यांना पाहिजे तसं पाठबळ न मिळाल्याने त्या या स्पर्धेतून बाहेर पडल्या. (US Election: Who is Kamala Harris?)

संबंधित बातम्या:

Kamala Harris | भारतीयवंशाच्या कमला हॅरिस यांचा ऐतिहासिक विजय, अमेरिकेच्या पहिल्या महिला उपराष्ट्राध्यक्ष

जो बायडन अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष, ट्रम्प यांचा पराभव

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकताच बायडन यांचं पहिलं ट्विट, म्हणतात…

(US Election: Who is Kamala Harris?)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.