Breaking : अमेरिकेतही फायझर लसीच्या आपत्कालीन वापरास मंजूरी

अमेरिकामध्ये सतत वाढत असलेल्या कोरोना संसर्गाच्या घटना रोखण्यासाठी लसीचा तातडीने ​वापराला परवानगी देण्यात आली आहे.

Breaking : अमेरिकेतही फायझर लसीच्या आपत्कालीन वापरास मंजूरी
Follow us
| Updated on: Dec 12, 2020 | 8:58 AM

वॉश्गिंटन : अमेरिकेत फायझरच्या (Pfizer-BioNtech) कोरोना लस वापरास अखेर अधिकृत मान्यता देण्यात आली आहे. गुरुवारीच, अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाच्या (एफडीए) सल्लागार पॅनेलवरील फायझर-बायोनोटेकच्या सल्लागार एक्सपर्ट पॅनेलने यावर बैठक घेत हा महत्त्वाचा निर्णय दिला आहे. अमेरिकामध्ये सतत वाढत असलेल्या कोरोना संसर्गाच्या घटना रोखण्यासाठी लसीचा तातडीने ​वापराला परवानगी देण्यात आली आहे. (US Food and Drug Administration authorizes Pfizer COVID19 vaccine for emergency use)

अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने फायझर-बायोटेक कोविड -19 या लसीच्या आपत्कालीन वापरास मान्यता दिली. एफडीए पॅनेलमध्ये लस सल्लागार, वैज्ञानिक, संसर्गजन्य रोग डॉक्टर आणि तज्ञांचा समावेश होता. न्यूयॉर्क टाईम्सने दिलेल्या माहितीनुसार, ही लस 16 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांवर आपत्कालीन परिस्थिती वापरावी असं या पॅनलमध्ये ठरवण्यात आलं आहे. खरंतर, अमेरिकेत बुधवारी कोरोनामुळे तीन हजारांहून अधिक मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे आता लस मंजूर झाल्यानंतर, देशातील कोरोना परिस्थिती नियंत्रित येते का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी आठ तासाच्या महत्त्वाच्या बैठकीत एफडीए पॅनेलच्या सदस्यांनी फायझर लसीच्या वापराला पाठिंबा दिला होता. त्यामुळे ब्रिटन, कॅनडानंतर तात्काळ अमेरिकेतही या लसीच्या वापरास परवानगी देण्यात आली आहे.

कॅनडाकडूनही फायझर-बायोएनटेकच्या कोरोना लसीला मंजुरी

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी दिलेल्या माहितीनुसार कॅनडामध्ये या महिनाभरात लसीचे 2 लाख 49 हजार डोस मिळणार आहे. कॅनडा सरकारने लसीच्या एकूण 2 कोटी डोसची खरेदी केली आहे. जी कॅनडातील एक कोटी नागरिकांच्या लसीकरणासाठी उपयुक्त ठरणार आहे.

कॅनडामध्ये लसीचा पुरवठा झाल्यानंतर लगेच लसीकरणालाही सुरुवात होण्याची शक्यता आहे. तेथिल अधिकाऱ्यांच्या सांगण्यानुसार कॅनडामध्ये एकूण 14 वितरण केंद्र उभारण्यात आली आहे. तर जिथे गरज आहे त्याठिकाणी शितगृहांची व्यवस्थाही करण्यात आली आहे.

कॅनडामध्ये सर्वात प्रथम आरोग्य कर्मचारी आणि जे अस्थावस्थ किंवा गंभीर परिस्थितीमध्ये आहेत अशा नागरिकांना लस दिली जाणार आहे. सुरुवातीला लसीचा उपयोग हा 16 वर्षाहून अधिक वय असलेल्या नागरिकांवर करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. कॅनडा सरकारने या लसीला दिलेली मंजुरी ही कॅनडातील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आणि कॅनडातील कोरोना पीडित लोकांची संख्या कमी करण्याच्या दिशेनं एक ऐतिहासिक पाऊल असल्याचं फायझरने म्हटलं आहे. (US Food and Drug Administration authorizes Pfizer COVID19 vaccine for emergency use)

इतर बातम्या –

67 देशांचे राजदूत भारत दौऱ्यावर, भारत बायोटेकच्या कोरोना लसीचा आढावा घेणार

कोरोना लशीच्या नोंदणीसाठी ‘हे’ अ‍ॅप लोकांना मदत करणार, आरोग्य मंत्रालयाची माहिती

(US Food and Drug Administration authorizes Pfizer COVID19 vaccine for emergency use)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.