कोरोनाचा कहर, न्यूयॉर्कमध्ये आणीबाणी घोषित
कोरोना व्हायरसचं संकट लक्षात घेता न्यूयॉर्कचे राज्यपाल अॅड्रयू कुओमो यांनी आणीबाणी घोषित केली आहे (Emergency declare in New York).
न्यूयॉर्क : कोरोना व्हायरस जगभरात प्रचंड वेगाने पसरत आहे. कोरोना व्हायरसचं संकट लक्षात घेता न्यूयॉर्कचे राज्यपाल अॅड्रयू कुओमो यांनी न्यूयॉर्कमध्ये आणीबाणी घोषित केली आहे (Emergency declare in New York). न्यूयॉर्कच्या न्यू रोशेल या भागात 23 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर वेस्टचेस्टर काउंटी येथे 57 जण कोरोनाने ग्रासले आहेत (Emergency declare in New York).
कोरोना व्हायरस आतापर्यंत 70 देशांमध्ये पोहोचला आहे. कोरोनामुळे अमेरिकेत 19 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा वाढता प्रभाव बघता अखेर न्यूयॉर्कच्या राज्यपालांनी आणीबाणी घोषित केली आहे. राज्यपालांनी याबाबत आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर माहिती दिली आहे.
An emergency declaration allows the state to perform expedited procurement, leasing of lab space, hiring, and more.
This will help us get resources to local health departments and others who need it quickly and efficiently. https://t.co/YVAJusbLer
— Andrew Cuomo (@NYGovCuomo) March 7, 2020
“न्यू रोशेलमधील परिस्थिती भयानक आहे. कोरोना आजाराला बळी पडणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात येणं जरुरीचं आहे. कोरोनावर ताबा मिळवण्यास न्यूयॉर्कमधील स्थानिक आरोग्य विभाग कमी पडत आहे. त्यामुळे अतिरिक्त आरोग्य अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे”, अशी माहिती न्यूयॉर्कच्या राज्यपालांनी दिली.
Price gouging will NOT be tolerated in New York.
I’m directing @NYSConsumer to investigate reports of unfair price increases on products like hand sanitizer.
If you see price gouging, I urge you to file a complaint by calling 800-697-1220 or visit https://t.co/aNTC46WDQI
— Andrew Cuomo (@NYGovCuomo) March 7, 2020
राज्यपालांचे नागरिकांना तक्रार करण्याचे आवाहन
आणीबाणी दरम्यान कोणत्याही वस्तूची किंमत वाढवली गेली तर ते सहन केलं जाणार नाही. हँड सॅनेटायझरची किंमत वाढवली गेली तर नागरिकांनी तातडीने सरकारकडे तक्रार करावी, असं आवाहन राज्यपाल अॅड्रयू कुओमो यांनी केलं आहे. यासाठी राज्यपालांनी 800-697-1220 हा हेल्पलाईन नंबर जारी केला आहे. याशिवाय https://dos.ny.gov/consumerprotection/ या वेबसाईटवर तक्रार करण्याचे आवाहन राज्यपालांनी केलं आहे.
संबंधित बातम्या :