अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात अल-कायदाच्या टॉप लीडरचा खात्मा, फंडिंग आणि दहशतवादी हल्ल्यांच्या प्लॅनिंगची होती जबाबदारी

20 सप्टेंबर रोजी सलीम अबू-अहमद अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात मारला गेला. हा हल्ला इदलिब शहरावर करण्यात आला.

अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात अल-कायदाच्या टॉप लीडरचा खात्मा, फंडिंग आणि दहशतवादी हल्ल्यांच्या प्लॅनिंगची होती जबाबदारी
सीरियामध्ये ड्रोन हल्ल्यात अल-कायदा या दहशतवादी संघटनेचा कमांडर ठार झाला आहे.
Follow us
| Updated on: Oct 01, 2021 | 4:47 PM

वॉशिंग्टन: सीरियामध्ये ड्रोन हल्ल्यात अल-कायदा या दहशतवादी संघटनेचा कमांडर ठार झाला आहे. अमेरिकन चॅनेल फॉक्स न्यूजने अमेरिकेच्या संरक्षण अधिकाऱ्यांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. 20 सप्टेंबर रोजी सलीम अबू-अहमद अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात मारला गेला. हा हल्ला इदलिब शहरावर करण्यात आला. सलीम अल-कायदाला फंडींग करायचा शिवाय, विविध दहशतवादी हल्ल्यांना मंजुरी देण्याचा अधिकारही त्याच्याकडे होता. ( us-killed-al-qaeda-top-leader-salim-abu-ahmad-in-drone-strike-in-syria-idlib-was-responsible-for-planning-funding)

नक्की कसा मारले गेला टॉप लीडर?

अमेरिकेच्या संरक्षण अधिकाऱ्याने सांगितले, ” या हवाई हल्ल्यात कुठल्याही सीरियाच्या नागरिकांचं नुकसान झालं नाही.” अमेरिकेने याआधीही इदलिब शहरात अनेक हल्ले केले आहेत, ज्यात त्यांनी अल कायदाच्या दहशतवाद्यांचा लक्ष्य केलं. सीरियात होत असलेल्या हल्ल्यांना घाबरुन आयएसआयएसचा प्रमुख अबू अल बकर बगदादी पूर्व सीरियामधून इडलिबला पळून आला आणि अजूनही तो याच शहरात लपला आहे. अमेरिकेकडून होणारे हे ड्रोन हल्ले कधी दहशतवाद्यांच्या ट्रकवर केले जातात तर कधी त्यांच्या कारवर.

सीमेवरच कारला लक्ष्य करण्यात आलं

याआधी अमेरिकन हवाई दलाच्या विमानाने सीरिया-इराक सीमेवर 2 कार उडवल्या होत्या. हे विमान अमेरिकन लष्कराचे होतं. या घटनेची माहिती इराकच्या पॉप्युलर मोबिलायझिंग फोर्सशी संबंधित सूत्राने दिली आहे. या सूत्राने सांगितले की, ‘सीरिया-इराक सीमेवर 2 कारवर हवाई हल्ला झाला. मात्र या हल्ल्याबद्दल अमेरिकेकडून कुठलंही स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही.

पाइपलाइनवर दहशतवादी हल्ला

गेल्या महिन्यात दहशतवाद्यांनी सीरियाची राजधानी दमास्कसच्या आग्नेय दिशेला असणाऱ्या नैसर्गिक वायू पाइपलाइनवर मोठा हल्ला केला. यामुळे या शहराची आणि इतर भागांची वीज गुल झाली. इस्लामिक स्टेटने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. दहशतवादी संघटनेने म्हटले होते की, इसिसच्या दहशतवाद्यांनी तिशरीन प्लांट्स आणि देयर अली प्लांट्सकडे जाणारी गॅस पाइपलाइन स्फोट करुन उडवली.

हेही वाचा:

पाकिस्तानला अमेरिकेचा निर्वाणीचा इशारा, दहशतवाद्यांना पोसणं थांबवा, नाहीतर आम्हाला एअर स्ट्राईक करण्याचा पूर्ण अधिकार

ऑस्ट्रेलियाच्या सीमा जगासाठी खुल्या, होम क्वारंटाईनची परवानगी, कोविशिल्डलाही मान्यता, ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांची मोठी घोषणा

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.