F-35 Crash : अमेरिकन एअर फोर्सला मोठा झटका, जगातील सर्वात शक्तीशाली फायटर विमान कोसळलं, VIDEO
F-35 Crash : F-35 हे जगातील सर्वात शक्तीशाली, महागड फायटर विमान आहे. अलास्का येथील एइलसन एअर फोर्सच्या बेसवर या विमानाला अपघात झाला. F-35 चा अपघात हा अमेरिकन एअर फोर्ससाठी झटक्यापेक्षा कमी नाही.
![F-35 Crash : अमेरिकन एअर फोर्सला मोठा झटका, जगातील सर्वात शक्तीशाली फायटर विमान कोसळलं, VIDEO F-35 Crash : अमेरिकन एअर फोर्सला मोठा झटका, जगातील सर्वात शक्तीशाली फायटर विमान कोसळलं, VIDEO](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/Stealth-Fighter-Jet.jpg?w=1280)
अलास्कामध्ये मंगळवारी एक मोठी दुर्घटना घडली. एका सिंगल-सीटर F-35 फायटर जेट दुर्घटनाग्रस्त झालं. आधी या फायटर जेटने नियंत्रण गमावलं आणि नंतर थेट खाली येऊन कोसळलं. खाली कोसळताच विमानाचा स्फोट होऊन आग लागली. सुदैवाने वैमानिक वेळीच विमानातून बाहेर पडल्याने त्याचे प्राण बचावले. पॅराशूटच्या मदतीने तो खाली आला. एइलसन एअर फोर्स बेसच्या रनवेवर ही घटना घडली. “स्थानिक वेळेनुसार दुपारी 12.49 मिनिटांनी ही दुर्घटना घडली. F-35 लँडिंगच्या तयारीमध्ये असताना हा अपघात झाला” एइलसन एअर बेसचे प्रवक्ते सार्जेंट किम्बर्ली टॉचेट यांनी ही माहिती दिली.
354 व्या फाइटर विंगचे कमांडर कर्नल पॉल टाउनसेंड यांनी सांगितलं की, “पायलटने सुरक्षित बाहेर निघण्याआधी खराबीमुळे विमानातील इनफ्लाइट इमरजेंसी ऑन केलेली” इमर्जन्सी पथकाने पायलटला चेकअपसाठी बॅसेट आर्मी रुग्णालयात दाखल केलय अशी माहिती एपी वृत्तसंस्थेने दिली आहे.
सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. विमान आकाशातून जोरात फिरुन खाली कोसळताना व्हिडिओमध्ये दिसतय. कोसळल्यानंतर स्फोट होऊन विमानात आग लागली. या घटनेचा व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रत्येकजण एकच गोष्ट बोलतोय, पायलटच बचावणं हे कुठल्या चमत्कारापेक्षा कमी नाहीय.
अपघाताची कारणं शोधण्याच काम सुरु
F-35 फायटर जेटचा अपघात कुठल्या कारणामुळे झाला तसच भविष्यात धोका कमी करण्यासाठी चौकशी केली जाईल असं कर्नल टाउनसेंड यांनी आश्वासन दिलं आहे. अपघात चौकशी समिती आणि सुरक्षा तपास समिती दोघेही अपघात कशामुळे झाला? त्याचा अभ्यास करत आहेत.
F-35 mishap at Eielson AFB, AK.
Pilot appears to have ejected. https://t.co/7LpsoyJGKF pic.twitter.com/lNWIgqkVHV
— TheIntelFrog (@TheIntelFrog) January 29, 2025
काय खास आहे या विमानात?
F-35 हे जगातील सर्वात शक्तीशाली, महागड फायटर विमान आहे. अमेरिकेने काही देशांना हे विमान विकलय. F-35 हे पाचव्या पिढीच फायटर जेट आहे. रडारलाही हे विमान पकडता येत नाही. अत्यंत अत्याधुनिक सोयी-सुविधांनी हे फायटर जेट सुसज्ज आहे. F-35 चा अपघात हा अमेरिकन एअर फोर्ससाठी झटक्यापेक्षा कमी नाही.