पेजर स्फोटानंतर महासत्ताक हादरला… चीन सॉफ्टवेअर अन् हॉर्डवेअरवर बंदी तयारी, कारण…

pager blast in lebanon: लेबनॉनमध्ये पेजर आणि वॉकी-टॉकी स्फोटापूर्वी इलेक्ट्रॉनिक उपकरणांद्वारे हेरगिरीचे काम केले जाऊ शकते, असे मानले जात होते. परंतु आता या स्फोटानंतर नवीन प्रकारच्या युद्धाचा धोका वाढला आहे. खूप लांब राहून इलेक्ट्रॉनिक उपकरणांद्वारे स्फोट करू शकतो.

पेजर स्फोटानंतर महासत्ताक हादरला... चीन सॉफ्टवेअर अन् हॉर्डवेअरवर बंदी तयारी, कारण...
गेल्या 15 वर्षांपासून या हल्ल्याचा कट रचला जात होता. हल्ल्याच्या नियोजनात शेल कंपन्यांचा सहभाग होता. गुप्तचर अधिकाऱ्यांनीच या कंपन्या स्थापन केल्या होत्या. हिजबुल्लाच्या अतिरेक्यांच्या पेजरमध्ये झालेल्या स्फोटाचे केरळ कनेक्शन समोर आले आहे. या प्रकरणात केरळमध्ये जन्मलेला एका नागरिकाचे नाव समोर आले आहे. हा व्यक्ती आता नॉर्वेचा नागरिक आहे.
Follow us
| Updated on: Sep 24, 2024 | 3:40 PM

लेबनानमधील पेजर स्फोटाचा धक्का हिजबुल्लाह या दहशतवादी संघटनेला बसला. या स्फोटात हिजबुल्लाहचे 20 पेक्षा जास्त दहशतवादी मारले गेले. सुमारे चार हजार लोक जखमी झाले. या पेजर स्फोटाचा धसका फक्त लेबनाननेच घेतला नाही तर जागतिक महासत्ताक असलेल्या अमेरिकेनेही घेतला आहे. यामुळे घटनेनंतर अमेरिका आता सतर्क झाला आहे. अमेरिकेच्या वाणिज्य विभागाला सुरक्षेची चिंता भेडसावू लागली आहे. यामुळे अमेरिकेत वापरल्या जाणाऱ्या गाड्यांमधील चीन सॉफ्टवेअर अन् हार्डवेअरवर बंदी आणण्याचा विचार सुरु झाला आहे.

काय म्हटले अमेरिकन अधिकाऱ्यांनी

अमेरिकेचे वाणिज्य सचिव जीना रेमोंडो यांनी म्हटले आहे की, रस्त्यावर लाखो गाड्या चालत असतील आणि अचानक सॉफ्टवेअर निष्क्रीय केले गेले तर किती मोठे विनाश होईल. यामुळे चीनमधून आयात होणाऱ्या ऑटोमॅटिक ड्रायव्हिंग सिस्टम सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर असलेल्या वाहनांच्या आयात आणि विक्रीवर बंदी घालण्याचा विचार आहे.

डेटाचा वापर होण्याचा धोका

अमेरिकन रस्त्यावर धावणारी जवळपास सर्व वाहने कनेक्टेड आहेत. या वाहनांमध्ये ऑनबोर्ड नेटवर्क हार्डवेअर आहे. त्यातून इंटरनेटच्या माध्यमातून गाडी आत आणि बाहेर दोन्ही डिव्हाइससह डेटा शेअर करते. नोव्हेंबरमध्ये अमेरिकेतील खासदारांनी एक चिंता व्यक्त केली होती. त्यांनी म्हटले होते की, चिनी ऑटो आणि टेक कंपन्या वाहनांची चाचणी करताना संवेदनशील डेटा गोळा करतात. हा डेटा ते भविष्यात वापरु शकतात.

हे सुद्धा वाचा

ब्रिटीश मीडियाच्या अहवालात असा दावा करण्यात आला होता की, गुप्तचर अधिकाऱ्यांना चिनी स्पायवेअरबद्दल चिंता व्यक्त केली होती. यासाठी त्यांनी शासकीय व मुत्सद्दी वाहनांची तपासणी करून घेतली होती. तपासणीत किमान एक सिम कार्ड सापडले जे लोकेशनचा डेटा पाठवत होते. हे उपकरण एका चिनी पुरवठादाराकडून खरेदी करण्यात आले होते.

पेजर स्फोटानंतर हा धोका वाढला

लेबनॉनमध्ये पेजर आणि वॉकी-टॉकी स्फोटापूर्वी इलेक्ट्रॉनिक उपकरणांद्वारे हेरगिरीचे काम केले जाऊ शकते, असे मानले जात होते. परंतु आता या स्फोटानंतर नवीन प्रकारच्या युद्धाचा धोका वाढला आहे. खूप लांब राहून इलेक्ट्रॉनिक उपकरणांद्वारे स्फोट करू शकतो. यामुळे निष्क्रीय करुन मोठा विनाश घडवण्याची शक्यता आहे. चीनमधील शेन्झेन येथील हुआई ही दूरसंचार कंपनी, अनेक वर्षांपासून चीन आणि अमेरिका यांच्यातील तंत्रज्ञानाच्या केंद्रस्थानी आहे. अमेरिकन अधिकाऱ्यांनी याबाबत चेतावणी दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, चिनी अधिकारी हे उपकरण हेरगिरीसाठी वापरू शकतात. परंतु चीनने हे आरोप फेटाळले आहेत.

'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत.
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'.
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?.
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात.
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत.
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.