Donald Trump : ‘कमला हॅरिस यांनी शारीरिक संबंध ठेऊन…’, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून आक्षेपार्ह पोस्ट री-शेयर
Donald Trump : यावर्षाच्या अखेरीस अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. रिपब्लिक पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी अपेक्षेप्रमाणे वादग्रस्त गोष्टी सुरु केल्या आहेत. त्यांनी भारतीय वंशाच्या प्रतिस्पर्धी उमेदवार कमला हॅरिस यांचं चरित्रहनन सुरु केलं आहे. कमला हॅरिस यांना डेमोक्रॅटिक पक्षाकडून उमेदवारी मिळाली आहे.
अमेरिकेत यावर्षी राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. विद्यमान राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी प्रकृतीच्या कारणामुळे माघार घेतली आहे. आता सामना माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि कमला हॅरिस यांच्यामध्ये आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना रिपब्लिकन पक्षाकडून उमेदवारी मिळाली आहे, तर कमला हॅरिस डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार आहेत. अमेरिकेत वर्षानुवर्ष या दोन पक्षांचेच उमेदवार राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक जिंकत आहेत. डोनाल्ड ट्रम्प हिलरी क्लिंटन यांना हरवून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनले होते. मागच्या निवडणुकीत डेमोक्रॅटचे उमेदवार जो बायडेन यांनी त्यांना पराभूत केलं होतं. डोनाल्ड ट्रम्प यांनी आता पुन्हा रिपब्लिकन पक्षाकडून उमेदवारी मिळवली आहे. डोनाल्ड ट्रम्प हे आक्रमक, प्रक्षोभक आणि वादग्रस्त मत व्यक्त करण्यासाठी ओळखले जातात. ती त्यांच्या राजकारणाची खासियत आहे.
डोनाल्ड ट्रम्प हे स्वभावानुसार कमला हॅरिस यांच्याबद्दल काहीतरी वादग्रस्त बोलतील अशी अपेक्षा होतीच. त्याची सुरुवातही त्यांनी केली आहे. बुधवारी डोनाल्ड ट्रम्प यांनी कमला हॅरिस यांच्याबद्दल अभद्र आणि आक्षेपार्ह टिप्पणी केली. त्यांनी कमला हॅरिस यांच्याविषयी सोशल मीडियावर पोस्ट केलेली अभ्रद टिप्पणी पोस्ट केली. यावरुन अमेरिकेच्या राजकारणात मोठा वाद निर्माण झाला असून डोनाल्ड ट्रम्प सर्वांच्या निशाण्यावर आले आहेत. रॉयटर्सनुसार, ही टिप्पणी एका अन्य सोशल मीडिया युजरने केली होती. त्याने कमला हॅरिस आणि हिलरी क्लिंटन यांच्या फोटोखाली लिहिलं होतं की, ‘शारीरिक संबंधांचा दोघींच्या करियरवर प्रभाव पडला’
कमला हॅरिस यांनी कोणाला डेट केलेलं?
या पोस्टला हिलरी क्लिंटन यांचे पती माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन आणि मोनिका लेविंस्की स्कँडलशी जोडलं जात आहे. कमला हॅरिस यांचे सॅन फ्रॅन्सिस्कोचे माजी महापौर विली ब्राऊन यांच्यासोबत प्रेमसंबंध होते. 1990 च्या दशकात दोघांनी एकमेकांना डेट केलं.
10 दिवसात दुसऱ्यांदा आक्षेपार्ह पोस्ट
विली ब्राऊन यांच्यासोबत संबंध ठेऊन कमला हॅरिस यांनी आपलं राजकीय करियर बनवलं, असं ट्रम्प यांना म्हणायच आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी मागच्या 10 दिवसात दुसऱ्यांदा आपल्या पर्सनल अकाऊंटवरुन कमला हॅरिस यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केली आहे. आपल्या विरोधकांचा अपमान करण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा इतिहास आहे.