F-47 : जगातील सर्वात घातक अस्त्राच्या निर्मितीची घोषणा, ‘कोणी आसपास पण फिरकरणार नाही’ ट्रम्प यांचे शब्द
F-47 : भविष्यातील हवाई युद्धाचा विचार करुन डोनाल्ड ट्रम्प यांनी एक मोठी घोषणा केली आहे. अमेरिकेने एकाच दमात बरीच पावलं पुढे टाकत F-47 कार्यक्रमाची घोषणा केली आहे. अमेरिकेचा हा प्रोजेक्ट गेमचेंजर ठरेल असं संरक्षण तज्ज्ञांच मत आहे. चीन आणि रशिया हे अमेरिकेचे मुख्य स्पर्धक देश आहेत. F-47 च्या कोणी आसपास पण फिरकरणार नाही, हे ट्रम्प यांचे शब्द आहेत.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठी घोषणा केली आहे. अमेरिकेसाठी सहाव्या पिढीच फायटर विमान बनवण्याच्या कार्यक्रमाची त्यांनी घोषणा केली आहे. एफ सीरीजमधल्या नव्याने येणाऱ्या फायटर जेटच नाव F-47 असेल. डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष आहेत. म्हणून त्यांनी नव्या फायटर जेटला F-47 नाव दिलं आहे. “F-47 हा एक सुंदर नंबर आहे. अशी गोष्ट याआधी कोणी पाहिली नसेल. फायटर जेटचा विचार करता शस्त्रास्त्र वाहून नेण्यासह वेग, हवाई कौशल्य या बाबतीत कोणीही या नव्या फायटर जेटच्या आसपास सुद्धा येणार नाही” असं डोनाल्ड ट्रम्प F-47 निर्मितीच्या कार्यक्रमाची घोषणा करताना म्हणाले. अमेरिकेतील एयरोस्पेस इंजिनिअरींग क्षेत्रातील महत्त्वाची कंपनी बोईंग या नव्या फायटर जेटची निर्मिती करणार आहे.
सहाव्या पिढीच हे नवीन फायटर जेट पाचव्या पिढीच्या F-22 ची जागा घेईल. F-22 रॅप्टर हे सध्याच पाचव्या पिढीच अमेरिकेच शक्तीशाली फायटर विमान आहे. F-47 हे F-22 आणि F-35 पेक्षा अधिक अत्याधुनिक असेल. यात नवीन टेक्नोलॉजीचा वापर केला जाईल. चीनने सहाव्या पिढीच फायटर जेट बनवल्याची चर्चा असताना आता अमेरिकेने त्यांच्या सहाव्या पिढीच्या फायटर विमान कार्यक्रमाची घोषणा केली आहे. यामुळे अमेरिकेची हवाई युद्ध लढण्याची क्षमता अधिक बळकट होणार आहे. सध्या अमेरिका, चीन आणि रशिया या तीनच देशांकेड 5th जनरेशन फायटर जेट आहे. भारताकडे राफेलच्या रुपाने 4.5 th जनरेशन फायटर जेट आहे.
किती खर्च होणार ?
F-47 हे ड्रोनसोबत काम करण्यास सक्षम असेल. यामुळे अमेरिकेची हवाई युद्धाची रणनिती अधिक घातक आणि धारदार होईल. या प्रोजेक्टवर एकूण किती खर्च होणार आहे, तो आकडा सुरक्षेच्या कारणास्तव ट्रम्प यांनी गोपनीय ठेवला आहे.
नव्या नोकऱ्यांची निर्मिती
बोईंग कंपनीसाठी हा करार एक मोठा दिलासा आहे. कारण मागच्यावर्षी कंपनीत दीर्घकाळ संप चालला तसच सुरक्षा कारणांमुळे कंपनीला नुकसान सहन करावं लागलं. या प्रोजेक्टमुळे कंपनीला आर्थिक फायदा होईल, तसच संरक्षण साहित्य उत्पादनात बोईंग कंपनीची जागितक बाजारपेठ अधिक भक्कम होईल. F-47 विकास कार्यक्रमामुळे अनेक नव्या नोकऱ्यांची निर्मिती होईल.
F-47 ची खासियत काय?
F-47 फायटर जेटला सुपरक्रूज टेक्निकने तयार करण्यात येईल. सुपरसॉनिक गतीने उडण्यास हे विमान सक्षम असेल. त्याशिवाय स्टेल्थ टेक्नोलॉजीत अजून सुधारणा केली जाईल. त्यामुळे शत्रूच्या रडारला हे विमान सापडणार नाही. F-47 भविष्यातील हायपरसोनिक मिसाइल सिस्टिम आणि आर्टिफिशियल इंटेलिजेंस ड्रोन स्क्वाड्रनसोबत समन्वयाने काम करेल. अमेरिकी सुरक्षा तज्ज्ञांच्या मते हा प्रोजेक्ट हवाई युद्ध क्षेत्रात गेमचेंजर ठरणार आहे.