नवी दिल्ली : रशिया (Russia) आणि यूक्रेन (Ukraine) यांच्यातील वाद काही केल्या थांबण्याची चिन्ह नाहीत. रशियानं यूक्रेनच्या भूभागातील दोन प्रादेशिक विभागाना स्वतंत्र देशाचा दर्जा दिल्याचं जाहीर केल्यानंतर जगभऱ खळबळ उडाली होती. यापार्श्वभूमीवर अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन (Joe Biden) यांनी देशाला संबोधित केलं. यूक्रेन आणि रशिया यांच्यात सुरु असलेल्या तणावार बोलताना बायडन यांनी आम्ही स्थितीचा आढाव घेत असून संरक्षणात्मक पावलं उचलली जात असल्याचं जाहीर केलं. बायडन यांनी दोन रशियनं वित्तसंस्थांवर प्रतिबंध लावत असल्याची घोषणा केली. रशिया आता पश्चिमेकडील देशांशी व्यापार करु शकणार नाही, असंही बायडन यांनी स्पष्ट केलं. आमच्याकडे अजून काही गोष्टी आहेत त्यावर देखील पावलं उचचलली जातील, असं बायडन यांनी स्पष्ट केलं.आता पश्चिमी देशांकडून रशियाला मिळणारं सहकार्य आणि मदत देखील थांबवली जाईल, असं बायडन यांनी स्पष्ट केलं आहे.
रशियाकडून वारंवार आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन केलं जात आहे. यूक्रेनच्या सीमेवर मोठ्या प्रमाणावर सैनिक तैनात असल्याचं दिसून येत आहे. बायडन यांनी आम्ही गेल्या दोन दिवसात बैठका घेतल्या आहेत. रशियाशी युद्ध करण्याचा आमचे मनसुबे नाहीत. रशियानं यूक्रेनला चारी बाजूनं घेरलं आहे. आम्ही रशियाच्या पुढच्या हालचालीवर नजर ठेऊन आहोत. यूक्रेनच्या राष्ट्रपतींसोबत सातत्यानं बातचीत सुरु असल्याचं बायडन म्हणाले. आम्ही रशिया आणि यूक्रेन वाद सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्ही युद्ध टाळण्याचा प्रयत्न करत आहोत. रशिया यूक्रेन यांच्यातील तनाव कमी करावा, वाद सोडवण्याचा प्रयत्न सुरु राहील, असं बायडन म्हणाले.
एएआयचं ट्विट
Will impose sanctions on Russia far beyond previous measures. Sanctions cut Russia off from Western financing. We will impose sanctions on Russia’s elites: US President Joe Biden#Ukraine pic.twitter.com/xe9JxEfQKX
— ANI (@ANI) February 22, 2022
रशिया यूक्रेन वाद चर्चेतून सोडवा
राजनाथ सिंह यांनी युद्धाच्या शक्यतेमुळं निर्माण झालेला तणाव हा जागतिक दृष्ट्या योग्य नसल्याचं म्हटलंय. जर युद्ध झालं तर हा प्रश्न केवळ दोन ते तीन देशांपुरता मर्यादित राहणार नाही. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्यात चर्चेचा मार्ग खुला आहे. दोन्ही नेत्यांमध्ये लवकरच चर्चा होणार आहे. बायडन यांनी चर्चेती तयारी दर्शवली आहे. सोमवारी व्हाईट हाऊसनं बायडन आणि व्लादिमीर पुतीन यांच्यात चर्चा होऊ शकते, पण रशियानं यूक्रेनवर हल्ला करु नये ही पूर्व अट असेल, असं सांगंण्यात आलं होतं.
इतर बातम्या: