Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमेरिकेने फायटर जेटमधून मिसाइल डागून चीनला दिला मोठा झटका

अमेरिकेच्या या कारवाईनंतर चीनला चांगलाच खवळला आहे. दोन्ही देशांमध्ये शाब्दीक युद्धा भडकलं आहे. अमेरिकेच्या मते, चीनचा जो बलून पाडला, तो स्पाय बलून होता. म्हणजेच चीनने हेरगिरी करण्यासाठी हा बलून आकाशात सोडला होता.

अमेरिकेने फायटर जेटमधून मिसाइल डागून चीनला दिला मोठा झटका
America Action
Follow us
| Updated on: Feb 05, 2023 | 10:49 AM

न्यूयॉर्क : अमेरिकेने चीन विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. अमेरिकेने थेट धडक कारवाई करत चीनला झटका दिला. अमेरिकेने त्यांच्या हवाई क्षेत्रात उडणारा चिनी बलून पाडला आहे. अमेरिकेच्या या कारवाईनंतर चीनला चांगलाच खवळला आहे. दोन्ही देशांमध्ये शाब्दीक युद्धा भडकलं आहे. अमेरिकेच्या मते, चीनचा जो बलून पाडला, तो स्पाय बलून होता. म्हणजेच चीनने हेरगिरी करण्यासाठी हा बलून आकाशात सोडला होता. अमेरिकेचे राष्ट्राध्य जो बायडेन यांच्या आदेशानंतर अमेरिकन एअर फोर्सने ही कारवाई केलीय. बलून दिशा भरकटल्यामुळे अमेरिकेच्या हवाई हद्दीत गेला होता, असं स्पष्टीकरण चीनकडून देण्यात आलय.

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने काय म्हटलं?

चिनी बलूनचा अमेरिकन एअर स्पेसमध्ये प्रवेश हे अमेरिकन संप्रभुतेच उल्लंघन असल्याचं बायडन यांनी म्हटलं आहे. अमेरिकेच्या फायटर जेट्सनी दक्षिण कॅरोलिना येथील समुद्र किनाऱ्याजवळ हा बलून पाडला. बलून विरोधात शक्तीचा उपयोग ही अतिप्रतिक्रिया असून आंतरराष्ट्रीय प्रथांच उल्लंघन असल्याचं चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे.

किती मोठ्या आकाराचा होता हा बलून?

चीन या बलूनच्या माध्यमातून हेरगिरी करत होता, असं पेंटागन आणि अन्य अमेरिकन अधिकाऱ्यांनी सांगितलं. तीन स्कूल बस इतका या बलूनचा मोठा आकार होता. जवळपास 60 हजार फूट उंचीवर अमेरिकेत पूर्वे दिशेला हा बलून सरकत होता. देखरेख आणि गुप्त माहिती गोळा करण्यासाठी या बलूनचा उपयोग केला जातो, असं अमेरिकन अधिकाऱ्यांनी सांगितलं. कुटुनितीक संबंध बिघडणार

अमेरिकेच्या सैन्य ठिकाणांची माहिती गोळा करण्यासाठी या बलूनचा उपयोग करण्यात आला, असा अमेरिकेचा दावा आहे. यामुळे दोन्ही देशातील कुटनितीक स्तरावरील संबंध बिघडणार आहेत. या घडामोडींनंतर अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्री एंटोनी ब्लिंकन यांनी आपला चीन दौरा रद्द केला आहे.