नरेंद्र मोदी जो बायडन यांच्यात फोनवरुन चर्चा; भविष्यातील वाटचालीचा अजेंडा ठरला
अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात फोनवर चर्चा झाली आहे. Joe Biden Narendra Modi
नवी दिल्ली : अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात फोनवर चर्चा झाली आहे. जो बायडन यांनी अध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर प्रथमच नरेंद्र मोदींसोबत फोनवर चर्चा झाली आहे. नरेंद्र मोदी यांनी याबाबत ट्विट करुन माहिती दिली आहे. बायडन यांना त्यांच्या कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्याची माहिती मोदींनी दिली आहे. (US President Joe Biden talks with Narendra Modi after inauguration ceremony)
नरेंद्र मोदी यांचे ट्विट
Spoke to @POTUS @JoeBiden and conveyed my best wishes for his success. We discussed regional issues and our shared priorities. We also agreed to further our co-operation against climate change.
— Narendra Modi (@narendramodi) February 8, 2021
भारत आणि अमेरिका या जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशांच्या प्रमुखांमधील चर्चा सकारात्मक झाली. भारत आणि अमेरिका यांच्यातील प्राथमिकता असणारे मुद्दे, प्रादेशिक मुद्यांवर देखील चर्चा झाली. मोदींनी ट्विटमध्ये दिलेल्या माहितीनुसार पर्यावरणातील बदलांबद्दल दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली.
दोन्ही देशांतील संबध मजबूत करण्यावर चर्चा
जो बायडन आणि नरेंद्र मोदी यांच्यामध्ये झालेल्या चर्चेबद्दल व्हाईट हाऊसनं प्रसिद्धीपत्रक जारी केलं आहे. नरेंद्र मोदी आणि बायडन यांच्यात दोन्ही देशांमधील संबंध मजबूत करण्याबद्दल चर्चा झाली. दोन्ही देशांच्या प्रमुखांमध्ये लोकशाही मजबूत करण्यावर आणि तिचा प्रसार करण्यावर चर्चा झाली. बायडन यांनी भारताशी मजबूत संबंध असल्याचं स्पष्ट केलं. तर अमेरिकेतील भारताचे राजदूत टी. एस. संधू यांनी भारत आणि अमेरिका दोन्ही देश मिळून जागतिक आव्हानांचा सामना करणार असल्याचं सांगितलं. भारत आणि अमेरिका दोन्ही देश आपआपसातील संबंध मजबूत करण्यासाठी कटिबद्ध असल्याचंही संधू यांनी सांगितलं.
जो बायडन 46 वे अध्यक्ष
डेमॉक्रॅटिक पक्षाकडून विजयी झालेले जो बायडन अमेरिकेचे 46 वे राष्ट्राध्यक्ष ठरले आहेत. त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव केला. तर, उपराष्ट्रपती म्हणून भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांची निवड झाली आहे. जो बायडन आणि कमला हॅरिस यांचा शपथविधी सोहळा 20 जानेवारीला पार पडला. त्यानंतर जगभरातील राष्ट्रप्रमुखांनी बायडन आणि हॅरिस यांचं ट्विटद्वारे अभिनंदन केले होते.
नरेंद्र मोदी आणि जो बायडन यांच्यातील फोनवरील चर्चेनंतर दोन्ही देशांमधील संबंध मजबूत होतील अशी आशा व्यक्त केली जात आहे. जो बायडन यांनी त्यांच्या टीममध्ये अनेक भारतीय वंशाच्या व्यक्तींना संधी दिली आहे. कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी अमेरिकेत मास्क अनिवार्य करण्यात आला आहे.
संबंधित बातम्या:
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘त्या’ धोरणावर जो बायडन यांचा यूटर्न म्हणाले..
नव्या कोरोना लसीचा धसका?, थांबा..! अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला बघा, निर्णय घ्या! (US President Joe Biden talks with Narendra Modi after inauguration ceremony)