US presidential debate : ट्रम्प यांचं वादग्रस्त वक्तव्य, बायडेन यांची कुत्र्यासोबत तुलना
US presidential debate : "कमला हॅरिस यांचे वडील कम्युनिस्ट होते. कमला हॅरिस यांना त्यांनी डावी विचारसरणी शिकवली आहे. म्हणूनच पुतिन सुद्धा कमला हॅरिस यांचं समर्थन करतात" असं ट्रम्प म्हणाले.
अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीआधी प्रेसिडेंशियल डिबेट होते. बुधवारी डोनाल्ड ट्रम्प आणि कमला हॅरिस यांच्यात प्रेसिडेंशियल डिबेट झाली. गर्भपातासह वेगवेगळ्या मुद्यांवर या डिबेटमध्ये चर्चा झाली. एबीसी न्यूजने ही प्रेसिडेंशियल डिबेट ठेवली होती. डोनाल्ड ट्रम्प हे तिसऱ्यांदा अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवत आहेत. डोनाल्ड ट्रम्प हे फटकळ, वादग्रस्त बोलण्यासाठी ओळखले जातात. काल सुद्धा डिबेटमध्ये ट्रम्प असच काहीतरी बोलून गेले. डोनाल्ड ट्रम्प यांनी विद्यमान राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांची तुलना कुत्र्यासोबत केली.
डिबेटमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी कमला हॅरिस डाव्या विचारसरणीच्या असल्याचा आरोप केला. “कमला हॅरिस यांचे वडील कम्युनिस्ट होते. कमला हॅरिस यांना त्यांनी डावी विचारसरणी शिकवली आहे. म्हणूनच पुतिन सुद्धा कमला हॅरिस यांचं समर्थन करतात” असं ट्रम्प म्हणाले. ते एवढ्यावरच थांबले नाहीत, तर ‘ज्यो बायडेन यांना राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीतून कुत्र्यासारखं बाजूला काढलं’ असही ट्रम्प म्हणाले.
कमला हॅरिस यांचा पलटवार
कमला हॅरिस यांनी सुद्धा लगेच पलटवार केला. “जग तुमच्यावर हसंत डोनाल्ड ट्रम्प. 8 कोटी लोकांनी तुम्हाला फायर केलं आणि हीच गोष्ट तुम्हाला पचत नाहीय” असं कमला हॅरिस म्हणाल्या. 90 मिनिटांच्या या प्रेसिडेंशियल डिबेटमध्ये अबॉर्शन, अर्थव्यवस्था, परराष्ट्र नीति, संसदेतील हिंसाचार सारख्या महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा झाली.