US Elections 2024 : अमेरिकेत ही 7 राज्य ठरवणार पुढचा राष्ट्राध्यक्ष, सामान्य मतदारापेक्षा इलेक्टोरल वोट ज्याच्या बाजूने तो विजेता

US Elections 2024 : अमेरिकेत आज राष्ट्राध्यक्षपदासाठी मतदान होईल. याआधी सुद्धा अर्ली वोटिंग झालय. या निवडणुकीत कोट्यवधी लोक मतदानाचा हक्क बजावतील. पण यातला एक छोट्सा भाग त्या उमेदवाराला राष्ट्राध्यक्षपदाच्या खुर्चीपर्यंत पोहोचवेल. म्हणजे कोट्यवधी मत मिळाली, तर काही हजार मतांनी उमेदवार जिंकू शकतो.

US Elections 2024 : अमेरिकेत ही 7 राज्य ठरवणार पुढचा राष्ट्राध्यक्ष, सामान्य मतदारापेक्षा इलेक्टोरल वोट ज्याच्या बाजूने तो विजेता
donald trump and kamala harris
Follow us
| Updated on: Nov 05, 2024 | 11:09 AM

जगातील शक्तीशाली देश अमेरिकेची राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक शेवटच्या टप्प्यात आहे. 5 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. कोण जिंकणार? हे आत्ताच ठामपणे सांगता येणार नाही. ट्रम्प आणि हॅरिस या दोघांपैकी एकजण काही हजार मतांच्या अंतराने राष्ट्राध्यक्षपदाच्या खुर्चीपर्यंत पोहोचू शकतो. असं झाल्यास हे अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदा होणार नाहीय. 2020 साली ज्यो बायडेन अवघ्या 0.03 टक्के अंतराने राष्ट्राध्यक्ष बनले होते. 2016 साली डोनाल्ड ट्रम्प सुद्धा अशाच फरकाने राष्ट्राध्यक्ष बनले होते. यावेळी अमेरिकेच्या निवडणुकीत एकूण 24 कोटी मतदार आहेत. यात 7 कोटी लोकांनी अर्ली वोटिंगच्या माध्यमातून आधीच मतदान केलय.

अमेरिकेच्या निवडणूक प्रक्रियेत सर्वात महत्त्वाचा आणि निर्णायक ठरतं इलेक्टोरल कॉलेज. या प्रोसेसमध्ये निवडणुकीचा निकाल जनतेच्या मतांवर नाही, तर इलेक्टोरल कॉलेजच्या माध्यमातून होतो. यात महत्त्वाची ठरतात 7 स्विंग स्टेटस. हे स्विंग स्टेटस ज्या उमेदवाराच्या बाजूने उभे राहतात, त्याचं पारड भारी ठरतं.

ही सात स्विंग स्टेट्स कुठली?

अमेरिकेची जी इलेक्टोरल सिस्टम आहे, त्यात 538 इलेक्टर्स म्हणजे प्रतिनिधी असतात. प्रत्येक राज्याच्या लोकसंख्येनुसार इलेक्टर्सची संख्या ठरते. म्हणजे कॅलिफोर्नियाकडे 55 इलेक्टर आहेत, तर वायोमिंगकडे फक्त तीन. कॅलिफोर्निया, वायोमिंग ही अमेरिकेतील राज्य आहेत. राष्ट्राध्यक्ष बनण्यासाठी कुठल्याही उमेदवाराला इलेक्टर्सचा 270 चा जादुई आकडा पार करावा लागतो. म्हणजे एवढ्या इलेक्टर्सची मत मिळावावी लागतात. काही राज्यांच कुठल्या पक्षाला मतदान करायचं ते आधीपासून ठरलेलं असतं. पण काही राज्य अशी आहेत, जी कुठल्याही पक्षाचा बालेकिल्ला नाहीत. त्यामुळे ही निवडणूक कुठल्याही उमेदवाराच्या बाजूने झुकू शकते. यालाच अमेरिकेत स्विंग स्टेट म्हणतात. अमेरिकेत अशी सात स्विंग स्टेट आहेत. यात, मिशिगन, पेन्सिलवेनिया, विस्कॉन्सिन, एरिजोना, नेवादा, जॉर्जिया आणि नॉर्थ कैरोलिना ही राज्य आहेत.

अमेरिकेत एकूण किती राज्य?

अमेरिकेत एकूण 50 राज्य आहेत, त्यात 538 इलेक्टोरल कॉलेज वोट आहेत. यात 93 मतं या सात राज्यात आहेत. 270 चा आकडा गाठण्यासाठी ही मत महत्त्वाची ठरतात. जो कुठला उमेदवार या स्विंग स्टेटमध्ये आघाडी मिळवेल, ते व्हाइट हाऊसच्या शर्यतीत बाजी मारेल.

‘विनर टेक्स ऑल’ म्हणजे काय?

अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत सर्वाधिक मतदान घेणारा उमेदवार विजेता ठरत नाही. अमेरिकेत 50 पैकी 48 राज्यांमध्ये इलेक्टर्सची निवड ‘विनर टेक्स ऑल’च्या आधारावर होते. समजा कॅलिफोर्नियात 55 इलेक्टोरल वोट्स आहेत, त्यात ट्रम्प यांना 29 वोट्स मिळाली, तर सर्व 55 मत त्यांनाच मिळणार.

2020 मध्ये फक्त 42 हजारपेक्षा जास्त मतांनी ठरला राष्ट्राध्यक्ष

2020 च्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डेमोक्रेटिक पक्षाकडून ज्यो बायडेन हे रिंगणात होते. त्यांच्यासमोर रिपब्लिकन उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांचं आव्हान होतं. या निवडणुकीत 15 कोटी पेक्षा जास्त लोकांनी मतदानाचा हक्क बजावला. पण राष्ट्रपतीची निवड अवघ्या 42,918 मतांनी झाली. म्हणजे 0.03% टक्क्याच्या फरकाने बायडेन राष्ट्राध्यक्ष बनले. विजयाच अंतर निश्चित करण्यामध्ये जॉर्जिया, ऐरिजोना आणि विस्कॉन्सिन या तीन राज्यानी महत्त्वाची भूमिका बजावली. बायडेन यांना याच तीन राज्यांमुळे 306 इलेक्टोरल वोट्स मिळाले.

30 लाख मतांवर भारी पडली 70 हजार मत

2016 साली डोनाल्ड ट्रम्प सुद्धा असेच राष्ट्राध्यक्ष बनले. त्या निवडणुकीत 13.7 कोटी लोकांनी मतदान केलं. पण ट्रम्प यांनी 0.06 पर्सेंट फरकाने निवडणूक जिंकली. विस्कॉन्सिन, मिशिगन आणि पेन्सिलवेनियामध्ये 70 हजार मतांमुळे ट्रम्प विजयी ठरले. ही मतं हिलरी क्लिंटन यांच्या 30 लाख मतांवर भारी पडली.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.