Ayman Al-Zawahiri : जवाहिरीचा जावई मोहम्मद अब्बाते अल कायदाची गादी सांभाळणार?, कोण असणार नवा म्होरक्या वाचा सविस्तर…
मोहम्मद अब्बाते अल कायदाचा नवा म्होरक्या? वाचा सविस्तर...
वॉशिंग्टन : अमेरिकेने अफगाणिस्तानात (US strike Afghanistan) घुसून सर्वात मोठी कारवाई केली आहे. सीआयएच्या (CIA) ड्रोन हल्ल्यात अल कायदाचा दहशतवादी अल जवाहिरीला (Ayman al-Zawahiri) ठार मारण्यात आलं आहे. अमेरिका मीडियाच्या आऊटलेट्सनेही माहिती दिली आहे. अफगाणिस्तानात अमेरिकेने ड्रोन स्ट्राईक करून मोठी कारवाई केल्याची घोषणा व्हाईट्स हाऊसने केल्याचं अमेरिका मीडियाच्या आऊटलेट्सने म्हटलं आहे. ओसामा बिन लादेन याला मारल्यानंतरची ही सर्वात मोठी कारवाई असल्याचा दावा अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी केली आहे. जवाहिरीच्या मृत्यूनंतर अमेरिका आता त्याचा जावई मोहम्मद अब्बाते याचा शोध घेत आहेत. दहशतवादी संघटना अल-कायदाचा तो वरिष्ठ सदस्य आहे. अब्द-अल-रहमान अल-मघरेबी उर्फ अब्बातेसाठी 55 कोटींच बक्षीसही जाहीर करण्यात आलं आहे. तो AQ च्या मीडिया शाखा अल-साहबचे संचालक देखील आहे. त्याने अल कायदाच्या अनेक मोहिमा यशस्वी केल्या आहेत. मोहब्बत अब्बातेला अब्द-अल-रहमान अल-मगरेबी म्हणूनही ओळखलं जातं. तो इराणमध्ये आहे, असं बोललं जात आहे. मात्र, तो सध्या कुठे आहे, याबाबत कुठलीही अधिकृत माहिती नाहीये.
कोण आहे मोहम्मद अब्बाते?
अमेरिका अब्बातेचा शोध घेत आहे. अब्बाते हा मोरोक्कनमध्ये जन्मलेला दहशतवादी अल-जवाहिरीचा जावई आहे. मोहब्बत अब्बातेला त्याच्या अल-कायदामधील सदस्यत्वासंदर्भात चौकशीसाठी हवा आहे. अल कायदा संघटनेने अमेरिकेत अनेक दहशतवादी घटना घडवून आणल्या आहेत. अफगाणिस्तानात जाण्यापूर्वी मगरेबीने जर्मनीमध्ये सॉफ्टवेअर प्रोग्रामिंगचा अभ्यास केला. अफगाणिस्तानात गेल्यानंतर प्राथमिक माध्यम शाखेच्या व्यवस्थापनावर देखरेख करण्यासाठी त्यांची नियुक्ती करण्यात आली. अमेरिकेत 11 सप्टेंबर 2001 च्या दहशतवादी घटनांनंतर अल माघरेबी इराणला पळून गेला, असं बोललं गेलं की तो पळून गेला. इराण आणि पाकिस्तानमध्ये गेल्याचीही चर्चा होती.
या कारवाईमुळे दहशतवादी संघटनांना मोठा दणका देण्यात आला आहे. अल जवाहिरीवर अमेरिकेने 25 मिलियन डॉलरचं बक्षिस ठेवलं होतं. दरम्यान, व्हाईट हाऊसने अफगाणिस्तानात एक लक्ष्य पूर्ण करण्यात आल्याचा दावा केला असला तरी अमेरिकन सरकारने जवाहिरीला मारल्याचा कोणताही दावा केलेला नाही. व्हाईट हाऊसने अफगाणिस्तानात एक लक्ष्य पूर्ण करण्यात आल्याचा दावा केला असला तरी अमेरिकन सरकारने जवाहिरीला मारल्याचा कोणताही दावा केलेला नाही.