Ayman al-Zawahiri killed : अल जवाहिरीला यमसदनी पाठवण्यासाठी वापरलेलं मिसाईल कोणतं?; या मिसाईलची खासियत काय?
Ayman al-Zawahiri killed : या मिसाईलच्या हल्ल्यानंतर स्फोटाचे काहीच पुरावे मिळत नाहीत, असं रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. दरम्यान, बदलत्या काळानुसार या मिसाईलचं नाव बदलून ‘फ्लाइंग जिंसु’ (Flying Ginsu) करण्यात आलं आहे.
वॉशिंग्टन: अल कायदाचा महोरक्या आणि मोस्ट वाँटेड अतिरेकी अयमान अल जवाहिरी (Ayman al-Zawahiri) याचा अमेरिकेने खात्मा केला आहे. अफगाणिस्तानच्या (US strike Afghanistan) काबूलमध्ये घुसून अमेरिकेने जवाहिरीला ढगात पाठवलं. एअर स्ट्राईक करून अमेरिकेने हा हल्ला केला आहे. जवाहिरीने 9/11च्या हल्ल्यापासून अनेक हल्ल्यात भाग घेतला होता. त्यामुळे अमेरिकेला तो हवा होता. मात्र, जवाहिरी हा लपून बसल्याने सापडत नव्हता. अखेर अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेला त्याचा ठावठिकाणा लागला. जवाहिरी काबूलमध्ये एका घरात लपून बसल्याचं अमेरिकेची गुप्तचर संघटना सीएआयला (CAI) कळलं. त्याची माहिती राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना देण्यात आली. बायडेन यांनी ऑपरेशन करण्यास मंजुरी दिली आणि त्यानंतर अखेर अमेरिकेने काबूलमध्ये घुसून जवाहिरीला उडवलं. जवाहिरीला यमसदनी पाठवण्यासाठी एका विशिष्ट आणि खास मिसाईलचा वापर केला होता. हे मिसाईल केवळ टार्गेटवरच हल्ला करतं अन् या मिसाईलने जवाहिरीला टार्गेट करून त्याचं काम तमाम केलं.
जवाहिरीला मारण्यासाठी RX9 Hellfire मिसाईलचा वापर करण्यात आला. ही एक वायरहेड लेस मिसाईल आहे. सुक्ष्म टार्गेटवर अचूक मारा करण्यासाठी या मिसाईलचा वापर केला जातो. RX9 हेलफायरचं वैशिष्ट्ये म्हणजे हे मिसाईल केवळ टार्गेटवर हल्ला करतं. हे मिसाईल एक्सपलोड करत नाही. एवढेच नाही तर RX9 मिसाईलचा वापर घरात लपलेले अतिरेकी किंवा गाडीतून पळ काढणाऱ्या अतिरेक्यांना निशाणा बनवण्यासाठी करण्यात येतो.
ब्लास्टचे पुरावे सापडत नाही
अमेरिकेने या मिसाईलचा अफगाणिस्तानात यापूर्वीही वापर केला आहे. या मिसाईलचा वापर सीरियामध्येही मोठ्या प्रमाणावर वापर केला गेला आहे. न्यूज एजन्सी एपीच्या रिपोर्टनुसार, 2017मध्ये अलकायदाचा अतिरेकी अबू अल खैर मसरीला कंठस्नान घातल्यानंतर हेलफायर RX9ची चर्चा सुरू झाली होती. कारण या मिसाईलद्वारेच मसरीला ठार करण्यात आलं होतं. या मिसाईलच्या हल्ल्यानंतर स्फोटाचे काहीच पुरावे मिळत नाहीत, असं रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. दरम्यान, बदलत्या काळानुसार या मिसाईलचं नाव बदलून ‘फ्लाइंग जिंसु’ (Flying Ginsu) करण्यात आलं आहे.
आता न्याय झाला
दरम्यान, जवाहिरीचा खात्मा झाल्याची बातमी कळताच जो बायडेन यांनी व्हाईट हाऊसला संबोधित केलं. यावेळी त्यांनी आता न्याय झाला, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. तसेच अफगाणिस्तानात दहशतवाद्यांना आसरा देऊ नये आणि पुन्हा दहशतवादी कारवाया होऊ नयेत, असं बायडेन म्हणाले.