America on Pakistan : अमेरिकेचा दुटप्पीपणा उघड, पाकिस्तानला दिलासा, भारताला मात्र मोठा धक्का

America on Pakistan : पुन्हा एकदा अमेरिकेचा दुटप्पी चेहरा उघडा पडला आहे. अमेरिकेने पाकिस्तानला मोठा दिलासा दिला आहे. पण त्याचवेळी अमेरिकेची ही भूमिका भारतासाठी धक्कादायक आहे. अमेरिका एकाच गोष्टीकडे दोन वेगवेगळ्या दृष्टीकोनातून कशी बघते, त्याचं हे उत्तम उदहारण आहे.

America on Pakistan : अमेरिकेचा दुटप्पीपणा उघड, पाकिस्तानला दिलासा, भारताला मात्र मोठा धक्का
America on Pakistan
Follow us
| Updated on: Dec 14, 2024 | 9:45 AM

अमेरिकेच्या स्टेट डिपार्टमेंटचा वर्षाला एक रिपोर्ट येतो. या रिपोर्टमध्ये इराणला दहशतवादाला प्रोत्साहन देणारा देश म्हटलय. मागच्या 39 वर्षांपासून अमेरिका या रिपोर्टमध्ये इराणचा समावेश करत आहे. इराणवर मध्य पूर्वेत अशांततेसाठी आपल्या प्रॉक्सी ग्रुपचा वापर करण्याचा आरोप आहे. काँग्रेसकडून दरवर्षाला जारी होणाऱ्या कंट्री रिपोर्ट ऑफ टेररिज्ममध्ये (CRT) 1984 पासून सतत इराणच नाव घेतलं जातय. यात हिजबुल्लाह, हमास आणि हुती या बंडखोर, दहशतवादी संघटनांना इराणच समर्थन प्राप्त आहे.

या रिपोर्टमध्ये इराणशिवाय सीरिया, उत्तर कोरिया आणि क्यूबा सारख्या अन्य देशांना सुद्धा दहशतवादाला प्रोत्साहन देणारे देश म्हणून घोषित करण्यात आलय. या सगळ्यामध्ये इराण सर्वात वर आहे. 1979 साली इराणमध्ये इस्लामिक क्रांती झाली. त्यानंतर 1984 पासून सतत या लिस्टमध्ये इराणच नाव येतय. त्याआधी कुठल्याही देशाला या यादीत टाकलं जात नव्हतं. 2023 CRT रिपोर्टमध्ये इराणवर प्रामुख्याने इस्लामिक रिवोल्यूशनरी गार्ड कॉर्प्स-कुद्स फोर्सच्या (IRGC-QF) माध्यमातून दहशतवाद आणि अन्य कारवायांमध्ये सहभागी असल्याचा आरोप आहे.

रिपोर्टमध्ये काय म्हटलय?

IRGC-QF च्या माध्यमातून इराणने या भागात अनेक दहशतवादी गटांना पैसा, ट्रेनिंग, शस्त्र आणि उपकरणं पुरवली. त्यातून अनेक दहशतवादी हल्ले करण्यात आले असं रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. हमासकडून 7 ऑक्टोबरला इस्रायलवर हल्ला करण्यात आला. त्यानंतर इराण समर्थित गटांनी आपला उद्देश पुढे नेण्यासाठी संघर्षाचा फायदा उचलला असं रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.

त्यामुळे ते हल्ला करु शकले

इस्रायलवर 7 ऑक्टोंबरला हमासने जो हल्ला केला, त्याची इराणला पूर्वकल्पना होती हे सिद्ध करणारा एकही पुरावा नाहीय असं रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. पण हमासला इराणकडून दीर्घकाळापासून जी मदत मिळत होती, त्यामुळे ते हल्ला करण्यासाठी सक्षम झाले.

पाकिस्तानला दिलासा

अमेरिकेचा हा रिपोर्ट अनेक अर्थांनी धक्कादायक आहे. कारण या रिपोर्टमध्ये दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या देशांच्या यादीत पाकिस्तानच नाव नाहीय. भारत सरकारने अनेकदा पाकिस्तानवर दहशतवाद्यांना ट्रेनिंग, पैसा आणि मदत करण्याचा आरोप केला आहे. पाकिस्तानने आतापर्यंत भारतावर अनेक दहशतवादी हल्ले केले आहेत. अमेरिकेच्या दहशतवाद्यांच्या लिस्टमध्ये असे अनेक पाकिस्तानी दहशतवादी आहेत, ज्यांना अजून अटक झालेली नाही.

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.