सतत नडणाऱ्या इराणसाठी अमेरिकेने बाहेर काढलं ब्रह्मास्त्र, काही कळण्याआधीच काम होईल तमाम

Iran vs Israel : इराणकडून सतत युद्धाची धमकी दिली जात आहे. इराणला इस्रायलला धडा शिकवायचा आहे. पण इस्रायलवर कुठलाही हल्ला झाल्यास आम्ही प्रत्युत्तर देऊ असं अमेरिकेने जाहीर केलय. याआधी सुद्धा इस्रायलने अमेरिकेच्या मदतीने इराणचा हल्ला निष्प्रभ केला होता. अमेरिकेने इस्रायलच्या रक्षणासाठी आता ब्रह्मास्त्र बाहेर काढले आहे.

सतत नडणाऱ्या इराणसाठी अमेरिकेने बाहेर काढलं ब्रह्मास्त्र, काही कळण्याआधीच काम होईल तमाम
Iran vs Israel
Follow us
| Updated on: Aug 12, 2024 | 4:11 PM

इस्रायलने इराणमध्ये घुसून हमासचा चीफ इस्माइल हानियाला संपवलं. इराणसाठी ही सणसणीत चपराकच आहे. या अपमानानंतर इराणने आपण इस्रायलला जशास तस उत्तर देण्याच जाहीर केलं आहे. इराण नेमकं काय करणार? हे अजून स्पष्ट नाहीय. इराण फक्त मिसाइल हल्ला करुन शांत बसणार की, युद्ध पुकारणार. इराणकडून सतत धमक्यांची भाषा दिली जात आहे. युद्ध पुकारल्यास आपण इस्रायलला साथ देणार हे अमेरिकेने आधीच स्पष्ट केलं आहे. अमेरिकेने आता इस्रायलच्या रक्षणासाठी आपल सर्वात मोठ घातक ब्रह्मास्त्र बाहेर काढलं आहे. अमेरिकेच हे ब्रह्मास्त्र आहे F-22 फायटर जेट. आखातामध्ये शत्रुचे मनसुबे धुळीस मिळवण्यासाठी हे F-22 सज्ज आहे. इस्रायलवर इराणचा संभाव्य हल्ला लक्षात घेऊन अमेरिकेने F-22 फायटर जेट्स तैनात केले आहेत.

मिडिल ईस्टमध्ये पोहोचताच F-22 फायटर जेट्सनी आपली ताकद दाखवण्यास सुरुवात केली आहे. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने ही माहिती दिलीय. गुरुवारी F-22 फायटर जेटने हुती बंडखोराने डागलेलं एंटी शिप क्रूज मिसाइल लाल सागरात पाडलं. अमेरिकेच F-22 फायटर विमान हवेतून हवेत आणि हवेतून जमिनीवर हल्ला करण्यास सक्षम आहे. काही सेकंदात हे विमान शत्रुला टार्गेट करु शकतं. हे इतकं एडवान्स आणि घातक आहे की, या फायटर विमानाची तुलना कुठल्या दुसऱ्या विमानाशी करता येऊ शकत नाही. याचे सेंसर धोका ओळखून पहिला हल्ला करण्याची संधी देतात. F-22 फायटर जेट एकाचवेळी 8 बॉम्बसनी हल्ला करु शकतं. ऑफ्टरबर्नरचा वापर केल्याशिवाय हे सुपरसॉनिक एयरस्पीडने उड्डाण करु शकतं.

समजण्याआधीच शत्रूचा गेम

F-22 मध्ये एक सेंसर सूट आहे, जो पायलटला समजण्याआधी हवेतला धोका हवेत ओळखून, शूट करण्याची परवानगी देतो. कॉकपिट डिजाइन आणि सेंसर फ्यूजन पायलटला अलर्ट करुन पहिला हल्ला करण्याची संधी देतो. याची रेंज 1600 न्यूटिकल माइल्स आहे. हे फायटर जेट 50 हजार फूट उंचीवरुन उड्डाण करु शकतं. या फायटर जेटमध्ये 38 हजार किलो वजन वाहण्याची क्षमता आहे. याच वजन 19700 किलोग्रॅम आहे.

थियोडोर रूजवेल्ट दाखल

अमेरिका इराणच्या संभाव्य हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मिडिल ईस्टमध्ये वॉरशिप आणि फायटर विमानं तैनात करत आहे. याआधी विमानवाहक युद्धनौका थियोडोर रूजवेल्ट दाखल झाली आहे. जवळपास एक डझन F/A-18 फायटर विमानं या युद्ध नौकेवर आहेत.

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.