Video: तालिबानचा क्रूर चेहरा पुन्हा समोर, काबुल विमानतळात घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या नागरिकावर गोळीबार

अफगाणिस्तानची राजधानी काबुलमधून तालिबानच्या क्रुरतेचा एक व्हिडीओ समोर आलाय. काबुल विमानतळात जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका नागरिकावर तालिबान्यांनी थेट गोळीबार केला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.

Video: तालिबानचा क्रूर चेहरा पुन्हा समोर, काबुल विमानतळात घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या नागरिकावर गोळीबार
Follow us
| Updated on: Aug 18, 2021 | 7:26 AM

काबुल : अफगाणिस्तानची राजधानी काबुलमधून तालिबानच्या क्रुरतेचा एक व्हिडीओ समोर आलाय. काबुल विमानतळात जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका नागरिकावर तालिबान्यांनी थेट गोळीबार केला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. अश्वका न्यूजने हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केलाय. या व्हिडीओत एक नागरिक विमानतळाच्या भिंतीवर चढून विमानतळात जाण्याचा प्रयत्न करत आहे. त्यावेळी खालून काळ्या कपड्यातील एक बंदुकधारी या नागरिकाच्या दिशेने गोळी धाडतो. यानंतर हा नागरिकही भिंतीवरुन खाली पडतो.

संबंधित वृत्तवाहिनीने हा व्हिडीओ शेअर करताना म्हटलं आहे, “काबुल विमानतळामध्ये घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका व्यक्तीवर तालिबानच्या व्यक्तीने गोळीबार केला. या व्यक्तिला तालिबानी मागील सरकारच्या पोलिसांप्रमाणे वागतील असं वाटलं, पण तालिबानी वेगळीच भाषा (बंदुकीची) बोलतात.”

व्हिडीओ पाहा :

120 भारतीय परतले

भारतीय हवाई दलाच्या C-17 विमानातून 120 भारतीय नागरिकांना घेऊन काबूल येथून विमान 17 ऑगस्टला सकाळी भारताकडे रवाना झाले होते. गुजरातमधील जामनगर विमानतळावर हे विमान उतरलं. मायदेशी परत आणले गेलेले सर्व अफगाणिस्तानातील भारतीय राजदूत कार्यालयाचे कर्मचारी, सुरक्षा कर्मचारी होते. याशिवाय भारतीय पत्रकारांना देखील माघारी करण्यात आलं आहे. गुजरातच्या जामनगर येथे या विमानातून मायदेशी परतलेल्या नागरिकांचं जोरदार स्वागत करण्यात आलं.

जल्लोषात स्वागत

अफगाणिस्तानातून परत आलेल्या लोकांना हार घालून त्यांचे स्वागत करण्यात आलं. तिथून बस द्वारे त्यांना पुढे पाठवण्यात आले. यावेळी लोकांनी भारत माता की जय अशा घोषणा दिल्या. काबूल आंतरराष्ट्रीय विमानतळावरील परिस्थिती बिघडत चालली असल्यामुळे सोमवारी विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली होती. मात्र, अमेरिकी सैन्य दलाने परिस्थितीवर नियंत्रण मिळवल्यामुळे मंगळवारी पहाटेपासून विमानतळ सुरू झालं. यानंतर भारतीय विमानाने तिथून उडाण केलं. भारतीय हवाई दलाच्या विमानाचे फोटो प्रसिद्ध झाले आहेत. भारतीय नागरिकांना आपल्या देशात परत आणलं गेलं.

दरम्यान, तालिबान्यांच्या आक्रमणानंतर अफगाणिस्तानच्या भविष्याचे काय, असा प्रश्न संपूर्ण जगाला सतावत आहे. याचदरम्यान आता या देशात सत्तास्थापनेच्या पार्श्वभूमीवर अनेक नाट्यमय घडामोडी घडण्यास सुरुवात झाली आहे. देशाचे नवे राष्ट्रपती कोण असतील, याबाबत तर्कवितर्कांना ऊत आला असतानाच अमरुल्लाह सालेह यांनी स्वतःला हंगामी राष्ट्रपती म्हणून घोषित केले आहे. सालेह हे अफगाणिस्तानचे पहिले उपराष्ट्रपती आहेत. त्यांनी ट्विट करून स्वतः हंगामी राष्ट्रपती बनल्याचे जाहीर केले आहे.

हेही वाचा :

अफगाणिस्तानात तालिबान्यांचं ‘राज’, पण या तालिबानचा जन्म कसा झाला? पाकिस्तानने कसं पोसलं?, वाचा सविस्तर…

3 लाख अफगाण सैन्य असतानाही, 60 हजार तालिबान्यांनी अफगाणिस्तानवर ताबा कसा मिळवला? वाचा काय आहेत मुख्य कारणं

Taliban Crisis : काबूलमधील परिस्थितीनंतर भारताने सुरू केला ई-आणीबाणी एक्स-मिस्क व्हिसा, जाणून घ्या याबाबत

व्हिडीओ पाहा :

Video of Talibani shooting on citizen who trying to enter in Kabul Airport

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.