POK Protest : POK मध्ये भयानक स्थिती, आझादीच्या घोषणा, पाकिस्तानी सैन्याकडून अत्याचार, गोळीबार
POK Protest : पाकिस्तानला त्यांच्या ताब्यात असलेला पाकव्याप्त काश्मीर संभाळता येत नाहीय. तिथली जनता रस्त्यावर उतरली आहे. पाकिस्तानला दैनंदिन गरजेच्या गोष्टी पुरवता येत नाहीयत. खवळलेली जनता हिंसक विरोध प्रदर्शन करतेय. पाकिस्तानी सैन्य POK मधील जनतेवर गोळ्या चालवत आहे.
पाकव्याप्त काश्मीरमध्ये भयानक स्थिती आहे. तिथली जनता चिडून रस्त्यावर उतरली आहे. POK मध्ये हिंसक विरोध प्रदर्शन सुरु आहेत. पाकव्याप्त काश्मीरच्या मुझफ्फराबादमध्ये पाकिस्तानी रेंजर्सनी गोळीबार केलाय. त्या तीन नागरिकांचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले आहेत. पाकिस्तानी रेंजर्सनी संतप्त जमावाला पांगवण्यासाठी गोळीबार केला. अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. पाकिस्तानातील सरकारने POK च्या जनतेचा राग शांत करण्यासाठी 23 अब्जची मदत जाहीर केलीय. डॉनने हे वृत्त दिलय.
मुझफ्फराबाद येथील शोर्रान दा नाक्का गावात पाकिस्तानी रेंजर्सच्या ताफ्यातील 19 गाड्यांवर दगडफेक करण्यात आली. रेंजर्सनी लगेच अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या, गोळीबार केला. मुझफ्फराबाद-बाराकोट रोडवर पॅरामिलिट्रीच्या गाड्या पेटवून दिल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आंदोलकांचा एक गट पाकिस्तान विरोधात आझादीच्या घोषणा देताना दिसत आहे.
90 पेक्षा जास्त लोक यामध्ये जखमी
जम्मू अँड काश्मीर जॉइंट आवामी एक्शन कमिटी या आंदोलनाला धार देत आहे. ते या आंदोलनाचा विस्तार करत आहेत. पाकिस्तान सरकार मागण्या पूर्ण करणार नाही, त्यामुळे JAAC ने आंदोलकांना मार्च सुरु ठेवण्यास सांगितलं. पीओकेच्या रस्त्यावर हे हिंसक विरोध प्रदर्शन 10 मे रोजी सुरु झालं. 90 पेक्षा जास्त लोक यामध्ये जखमी झाल्याच पाकिस्तानी मीडियाने म्हटलं आहे.
POK च्या जनतेला यायचय भारतामध्ये
पाकिस्तानी पंतप्रधान शहाबाज शरीफ यांनी रविवारी पीओकेसाठी इलेक्ट्रीसिटी आणि गव्हावर 23 अब्जची सबसिडी जाहीर केली. 40 किलो पीठाचे दर 3,100 वरुन 2000 रुपयापर्यंत कमी झाला आहे. इलेक्ट्रीसिटीचे दरही कमी झाले आहेत. डॉनने हे वृत्त दिलय. पाकव्याप्त काश्मीरमधील जनतेने सुद्धा भारतामध्ये सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पीओकेवर पाकिस्तानच नियंत्रण आहे. पण हा भारताचा अविभाज्य भाग आहे. भविष्यात भारताची पुढची चाल पीओकेवर असेल, याची पाकिस्तानला सुद्धा कल्पना आहे. सध्या तिथली जनताच पाकिस्तानवर खवळली आहे.