Vladimir Putin | महाविजयानंतर पुतिन यांचं भारतासाठी चिंता वाढवणार वक्तव्य, जवळचा मित्र असं बोलू लागला तर…
Vladimir Putin | रशियात पुन्हा एकदा व्लादिमीर पुतिन सत्तेवर विराजमान झाले आहेत. मागच्या अनेक वर्षांपासून रशियावर पोलादी पकड असलेला हा नेता आहे. पुतिन, पुतिन आणि फक्त पुतिन असच या निकालाच वर्णन कराव लागेल. व्लादिमीर पुतिन यांच्या तोडीचा दुसरा नेताच सध्याच्या घडीला रशियामध्ये नाहीय. रशिया हा भारताचा जवळचा मित्र आहे. पण या विजयानंतर पुतिन यांनी भारताच्या दृष्टीने चिंता वाढवणार एक वक्तव्य केलं आहे.
मॉस्को : रशियाची सत्ता पुन्हा एकदा व्लादिमीर पुतिन यांच्या हातात आली आहे. रशियात पुन्हा एकदा पुतिन यांचं राज्य असेल. पुतिन यांनी रविवारी रशियन निवडणुकीत रेकॉर्ड विजय मिळवला. जवळपास 88 टक्के मत त्यांना मिळाली. पुतिन यांनी राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत धमाकेदार विजय मिळवला आहे. राष्ट्राध्यक्ष म्हणून त्यांचा हा पाचवा कार्यकाळ असेल. 1999 मध्ये पुतिन यांनी पहिल्यांदा रशियाची सूत्र आपल्या हातात घेतली होती. तेव्हापासून आतापर्यंत ते एकदाही निवडणूक हरलेले नाहीत.
रेकॉर्ड विजयानंतर व्लादिमीर पुतिन यांनी रशियन नागरिक आणि युक्रेनमध्ये लढणाऱ्या सैनिकांचे आभार मानले. विजयानंतर एका मुलाखतीत ते म्हणाले की, “रशियाला घाबरवल जाऊ शकत नाही किंवा आमचा आवाज दाबला जाऊ शकत नाही. या निकालावरुन रशियन नागरिकांचा विश्वास दिसून येतो. रशियन नागरिक माझ्यावर विश्वास ठेवतात, हे निवडणूक निकालावरुन स्पष्टपणे दिसून येतं” कुठलीही भीती किंवा निस्वार्थ भावनेने देशासाठी लढणाऱ्या सैनिकांचे सुद्धा पुतिन यांनी आभार मानले.
भारताच चिंता वाढवणार वक्तव्य
चीन विषयीच्या संबंधांवर ते म्हणाले की, “जागतिक स्तरावर रशिया आणि चीन दोघांच समान हित आहे. हा एक योगायोग आहे. पुढच्या काही वर्षात मॉस्को चीनसोबत संबंध विकसित करेल. दोन्ही देशांमधील संबंध अधिक भक्कम होतील” पुतिन यांच्या चीन विषयीच्या या भावना भारताच्या चिंता वाढवणाऱ्या आहेत. कारण चीन हा भारताचा स्पर्धक आहे. रशिया भारताचा जवळचा मित्र आहे. पण चीन बरोबर त्यांच्या वाढती जवळीकीमुळे भारताबरोबरच्या संबंधांवर परिणाम होऊ शकतो.
He ganado las elecciones de 2024 y las de 2030 también! Vodka gratis para todos! pic.twitter.com/l7eJRwcD60
— Vladímir Putin 🇷🇺ᴾᵃʳᵒᵈʸ (@TheBigBossPutin) March 17, 2024
गद्दारांना तसच वागणार, जसं…
रशियातील सर्व कायदेशीर यंत्रणांना रशिया विरोधी युद्धात सहभाग घेणाऱ्यांची ओळख पटवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पुतिन यांनी यावेळी प्रतिबंधित रशियन स्वयंसेवी कोरचा (आरवीसी) उल्लेख केला. या कोरमध्ये फक्त 2500 सदस्य आहेत. त्यांना देशाबाहेर काढलं जाईल, असं पुतिन म्हणाले. ते म्हणाले की, रशियात मृत्यूच्या शिक्षेची तरतूद नाहीय. पण गद्दारांना तीच वागणूक दिली जाईल, जी युद्धाच्या मैदानात दिली जाते. त्यांनी प्रतिबंधित रशियन स्वयंसेवी कोरला दहशतवादी संघटना ठरवलं.