Russia-Ukrain War | पुतिन यांनी पुन्हा जगाला दाखवली न्यूक्लियर पावर, ‘या’ घातक विमानाच उड्डाण

Russia-Ukrain War | व्लादिमीर पुतिन यांनी पुन्हा एकदा जगाला ताकद दाखवून दिलीय. स्वत: पुतिन या विमानात सहवैमानिक म्हणून बसले होते. हे विमान खूप घातक आहे. पुतिन यांचा इतिहास पाहता ते टोकाच पाऊल उचलण्यासाठी सुद्धा मागे-पुढे पाहणार नाहीत.

Russia-Ukrain War | पुतिन यांनी पुन्हा जगाला दाखवली न्यूक्लियर पावर, 'या' घातक विमानाच उड्डाण
Vladimir putin
Follow us
| Updated on: Feb 23, 2024 | 11:01 AM

Russia-Ukrain War | युक्रेन बरोबर युद्ध सुरु असताना रशियाने अमेरिकेसह पाश्चिमात्य देशांना पुन्हा एकदा आपली न्यूक्लियर पावर दाखवून दिलीय. अमेरिकेसह नाटो देश युक्रेनला शस्त्रांचा पुरवठा करतायत. त्या पार्श्वभूमीवर दबाव टाकण्यासाठी रशियाने ही चाल खेळली. रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी गुरुवारी न्यूक्लियर हल्ला करण्यास सक्षम असलेल्या बॉम्बवर्षक विमानातून सह-वैमानिक म्हणून उड्डाण केलं. पुढच्या महिन्यात रशियात निवडणुका आहेत. त्याआधी मजबूत नेता म्हणून आपली छाप उमटवण हा सुद्धा पुतिन यांचा या उड्डाणामागे उद्देश असू शकतो. रशियात होणाऱ्या निवडणुकीत पुतिन यांचा विजय निश्चित मानला जातोय.

टीयू-160 एम सुपरसॉनिक बॉम्बवर्षक विमानातून पुतिन यांनी जवळपास 30 मिनट उड्डाण केलं. युक्रेन युद्धावरुन पाश्चिमात्य देशांबरोबर तणाव आहे. त्यांना अणवस्त्र शक्तीची ताकद दाखवण हा सुद्धा रशियाचा उद्देश असू शकतो. अपक्ष उमेदवार म्हणून 71 वर्षीय पुतिन निवडणूक लढतायत. रशियाच्या राजकीय व्यवस्थेवर त्यांची मजबूत पकड आहे. मागच्या 24 वर्षात पुतिन यांनी हे साध्य करुन दाखवलय.

अँटी सॅटलाइट टेक्नोलॉजी काय?

अलीकडेच अमेरिकेने दावा केला होता की, रशियाची अवकाशात न्यूक्लियर शस्त्र तैनातीची योजना आहे. त्यावर पुतिन यांनी रशियाचा असा कोणताही इरादा नसल्याच स्पष्ट केलं होतं. रशियाने फक्त अमेरिकेच्या तोडीची अवकाश क्षमता विकसित केलीय असं पुतिन म्हणाले. व्हाइट हाऊसच्या दाव्यानंतर पुतिन यांनी हे वक्तव्य केलं. रशियाने अँटी सॅटलाइट टेक्नोलॉजी विकसित केल्याचा दावा अमेरिकन प्रशासनाने केला होता.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.