Wagner Group | पुतिन यांच्याविरोधात बंड पुकारणाऱ्या वॅगनर ग्रुपची मोठी पलटी, पडद्यामागे काय घडलं?
Wagner Group | रशियात वॅगनर ग्रुपच्या बंडानंतर परिस्थिती खराब झाली आहे. मॉस्कोमध्ये इमर्जन्सी घोषित करण्यात आली आहे. तिथल्या लोकांना घरातच थांबण्याचा सल्ला दिला आहे. सोमवारी मॉस्कोमध्ये 'नॉन-वर्किंग डे' घोषित करण्यात आला आहे.

मॉस्को : रशियामध्ये टेन्शनची स्थिती आहे. रशियाने तयार केलेला वॅगनर ग्रुप त्यांच्यावरच उलटला. वॅगनर ग्रुपने रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याविरोधात मोठी आघाडी उघडली होती. वॅगनर ग्रुपचे सैनिक मॉस्कोवर चाल करुन येत होते. त्यामुळे संपूर्ण रशियामध्ये मोठा तणाव निर्माण झाला होता. वॅगनर ग्रुपच्या बंडानंतर रशियामध्ये इमर्जन्सी घोषित करण्यात आली होती. 24 तासानंतर आता स्थिती बदलल्याची माहिती आहे.
वॅगनर ग्रुप आणि रशियन सरकारमध्ये करार झाला आहे. या करारानंतर आता वॅगनर ग्रुपचे योद्धे पुन्हा युक्रेनच्या दिशेने निघाले आहेत. काल या बंडामुळे रशियाच्या रस्त्यावर रणगाडे तैनात करण्यात आले होते.
पडद्यामागे काय घडलं?
वॅगनर ग्रुपच बंड शमवण्यात बेलारुसचे राष्ट्रपती अलेक्जेंडर लुकाशेंको यांची महत्वाची भूमिका आहे. वॅगनर ग्रुप बरोबर कराराचा ड्राफ्ट तयार झाला आहे, असा लुकाशेंको यांनी दावा केला. प्रिगोजिन आणि रशियन सरकारमध्ये करार झाला आहे. यानंतर वॅगनर गटाच्या योद्धयांनी पुन्हा रणागणाकडे कूच केली आहे. लुकाशेंको यांनी वॅगनर ग्रुपचे प्रमुख येवगेनी प्रिगोजिनसोबत चर्चा केली. रशियावर हल्ला रोखण्याची विनंती केली.
वॅगनर चीफने नव्या आदेशात काय म्हटलय?
वॅगनरच सैन्य मॉस्कोच्या वाटेवारुन माघारी फिरलं आहे. राष्ट्रपती पुतिन यांनी वॅगनर सैन्याला सुरक्षेच आश्वासन दिलं आहे, असं लुकाशेंको यांनी सांगितलं. वॅगनर ग्रुपचा चीफ प्रिगोजिनने टेलिग्रामवरुन ऑडियो मेसेजकरुन वॅगनर योदध्यांना पुन्हा युक्रेनच्या दिशेने कूच करण्याचा आदेश दिला आहे.
मॉस्कोमध्ये इमर्जन्सी
वॅगनर ग्रुपच्या बंडानंतर रशियात परिस्थिती खराब झाली होती. मॉस्कोमध्ये इमर्जन्सी घोषित करण्यात आली होती. तिथल्या लोकांना घरातच राहण्याचा सल्ला दिला होता. सोमवारी मॉस्कोमध्ये ‘नॉन-वर्किंग डे’ घोषित करण्यात आला आहे. वॅगनर चीफने जाणूनबुजून हे बंड केलं. वॅगनरच्या बंडावर सगळ्या जगाच लक्ष आहे. या संपूर्ण प्रकरणावर युक्रेनचे राष्ट्रप्रमुख व्लोदोमीर झेलेंस्की काय म्हणाले?
रशियामधील या तणावाच्या पार्श्वभूमीवर युक्रेनचे राष्ट्रप्रमुख व्लोदोमीर झेलेंस्की यांनी एक महत्वाच वक्तव्य केलं. पुतिन यांनी स्वत: हा धोका निर्माण केलाय. पुतिन मॉस्कोमध्ये नसल्याच त्यांनी सांगितलं. रशिया विरोधात युद्धात आमचा विजय निश्चित आहे, असं झेलेंस्की म्हणाले.