Video: “चहा कमी प्या”; पाकिस्तानच्या मंत्र्यांचं नागरिकांना अजब आवाहन, कारण ऐकून तुम्हीही हसाल!
पाकिस्तानचे केंद्रीय नियोजनमंत्री (Pakistan minister) एहसान इक्बाल (Ahsan Iqbal) यांनी देशवासियांना चहा कमी करण्याचं आवाहन केलं आहे. यामागचं कारण ऐकून तुम्हालासुद्धा हसू आवरणार नाही.
पाकिस्तान सरकारने आपल्या नागरिकांना चहा (Tea) पिणं कमी करण्याचं अजब आवाहन केलं आहे. यामागचं कारण ऐकून तुम्हालासुद्धा हसू आवरणार नाही. सध्या पाकिस्तान सरकार आर्थिक डबघाईला आल्याने चहा आयातीसाठी लागणारं शुल्क कमी होण्यास त्यामुळे मदत होईल, असं कारण नागरिकांना देण्यात आलं आहे. पाकिस्तानचे केंद्रीय नियोजनमंत्री (Pakistan minister) एहसान इक्बाल (Ahsan Iqbal) यांनी देशवासियांना चहा कमी करण्याचं आवाहन केलं आहे. ‘न्यूज इंटरनॅशनल’ या वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, 2021-22 या आर्थिक वर्षात तब्बल 83.88 अब्ज रुपये (40 कोटी डॉलर) किंमतीच्या चहाचं सेवन पाकिस्तानमध्ये केलं गेलंय. ही गोष्ट निदर्शनास आल्यानंतर नियोजनमंत्र्यांनी नागरिकांना हे अजब आवाहन केलं.
“जगातील सर्वाधिक चहा आयात करणाऱ्या देशांमध्ये पाकिस्तानचा समावेश आहे. चहा आयात करण्यासाठी कर्ज घ्यावं लागतं. त्यामुळे मी देशवासियांना असं आवाहन करतो की दिवसातून एक-दोन कप चहा कमी प्या. कारण आपल्याला कर्ज करून चहा आयात करावा लागतोय”, असं एहसान हे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हणाले. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
पहा व्हिडीओ-
کتنی آسانی سے آپنے ہم سے ہماری زندگی مانگ لی ۔۔ pic.twitter.com/zJE9wWFtXw
— Nabya Shahid (@nabyashahid) June 14, 2022
ऊर्जा बचतीसाठी आपण व्यापाऱ्यांनाही बाजारपेठ रात्री साडेआठला बंद करण्याचं आवाहन केल्याचंही ते म्हणाले. “त्यामुळे इंधन आयातीसाठी शुल्क कमी करण्यास हातभार लागेल. जर कठोर निर्णय घेऊन ते अमलात आणले नाही, तर पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेची अवस्था श्रीलंकेप्रमाणेच दयनीय होईल”, असा इशारा पाकिस्तानच्या अर्थमंत्र्यांनी दिला.
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया-
Pakistanis are seething over Ahsan Iqbal’s suggestion to have fewer cups of tea: “First, half a roti and now we should reduce our tea consumption too?” Reham Khan asks incredulously #news #newspakistan pic.twitter.com/02n8e2oLJC
— Toufaani (@Toufaani) June 15, 2022
Ahsan Iqbal sahib, we can also try ‘intermediate’ fasting so we just stop eating/drinking all together. So excited with your vision of the future. 500 years ahead of it’s time. Bless you oh saviour of mankind. ? #CostOfLivingCrisis #AhsanIqbal
— Anoushey Ashraf (@Anoushey_a) June 15, 2022
मंत्र्यांच्या आवाहनाची नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
एहसान इक्बाल यांनी चहा कमी पिण्याचं केलेलं आवाहन पाकिस्तानी नागरिकांना रुचलेलं दिसत नाही. त्यांनी सोशल मीडियाद्वारे त्यांच्या या वक्तव्याची खिल्ली उडवली. ‘इक्बाल यांनी खरंच चहा कमी करण्याचं आवाहन केलंय का? ते आम्हाला मूर्ख समजत आहेत का’, असं एका ट्विटर युजरने विचारलं. तर इक्बाल यांच्या चहा कमी करण्याच्या आवाहनाला मी प्रतिसाद देणार नाही, असं दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं.