युक्रेनमधील भारतीयांसाठी आम्ही 24 तास बांधिल; दूतावासकडून भारतीय नागरिकांना आवाहन
रशियाकडून क्षेपणास्त्रांचा हल्ला होत असल्याने त्या युक्रेनमधील हवाई मार्ग बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे एका ठिकाणांहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित होताना स्वतःसह बरोबर असलेल्या भारतीयांना सुरक्षित ठेवा असे आवाहन करण्यात आले आहे.
मुंबईः रशियाने युक्रेनवर क्षेपणास्त्रांचा (Missile) मारा केल्यानंतर युक्रेनमधील (Ukraine) जनजीवन विस्कळीत झाले आहे. स्थानीक नागरिकांसह त्या ठिकाणी असलेल्या स्थलांरीत नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. युक्रेनमध्ये अनेक देशातील नागरिक, विद्यार्थी आणि महिला तिथे जाऊन राहिल्या आहेत. सध्या युद्धजन्य परिस्थिती असल्याने भारतीय दूतावासचे राजदूत पार्थो सँटपँथी यांनी युक्रेनमधील भारतीयांना (Indian Citizens) सुरक्षित ठिकाणी राहण्याचे थांबण्याचे आवाहन केले आहे. हे आवाहन करत असताना त्यांनी सांगितले आहे की, युद्ध काळात तुम्ही तुमचा धीर खचू देऊ नका, भारतीय दूतावास तुमच्या सेवेसाठी आणि मदतीसाठी 24 तास बांधिल आहे असेही त्यांनी सांगितले आहे.
युक्रेनची राजधानी कीवसह परिसरातील अनेक शहरांवर रशियाने हल्ला केला आहे. त्यामुळे युक्रेनमधील सर्व जनजीवन आणि नागरिकांच्या मूलभूत सोयीसुविधा विस्कळीत झाल्या आहेत. युक्रेनमधील विमानतळे, रेल्वे आणि महामार्ग बंद झाले आहेत. त्यामुळे स्थलांतरित होऊन आलेल्या नागरिकांचा राहण्याचा आणि त्यांच्या जगण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. म्हणून भारतीय दूतावासचे राजदूत पार्थो सँटपँथी यांनी सुरक्षिततेची काळजी घ्या असा संदेश नागरिकांना दिला आहे.
#BREAKING: India writes to President of Ukraine informing about 15,000 Indian students being stranded in various regions of Ukraine. India asks for their safety and security be ensured. Food and water needs to be provided to them. #RussiaUkraineConflict pic.twitter.com/lW9uieu4GA
— Aditya Raj Kaul (@AdityaRajKaul) February 24, 2022
वाहनव्यवस्था कोलमडली
रशियाकडून क्षेपणास्त्रांचा हल्ला होत असल्याने त्या युक्रेनमधील हवाई मार्ग बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे एका ठिकाणांहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित होताना स्वतःसह बरोबर असलेल्या भारतीयांना सुरक्षित ठेवा असे आवाहन करण्यात आले आहे. रशियाच्या भूमिकेमुळे वाहनव्यवस्था कोलमडली आहे, त्यामुळे भारतीयांना स्थलांतरित होताना अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे भारतीयांनी सुरक्षित स्थळी जात असताना स्वतःची काळजी घेऊन आपल्या मित्र परिवारांकडे स्थलांतर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या स्थलांतर करत असताना तुम्हाला काही अडचणी जाणवत असतील तर भारतीय दूतावासला संपर्क करा असेही आवाहन या विभागाने केले आहे.
#BREAKING: Indian Ambassador to Ukraine Partha Satpathy reaches out to stranded Indian nationals and students in Ukraine. Stranded Indians being taken to safe shelters, arrangements being made for their evacuation. pic.twitter.com/S1xkNz83hS
— Aditya Raj Kaul (@AdityaRajKaul) February 24, 2022
भारतीय दूतावासकडे पोहचू शकता
युक्रेनमध्ये राहणाऱ्या भारतीयांची राहण्याची व्यवस्था होत नसेल तर ओळखीच्या भारतीयांकडे थांबण्यास सांगितले आहे, तसेच युक्रेनमध्ये असणाऱ्या भारतीय मित्र परिवाराचा आसरा घ्या असेही सांगण्यात आले आहे. सुरक्षित स्थळी पोहचण्याचे आवाहन जरी करण्यात आले असले तरी युक्रेनमधील भारतीयांच्या सुरक्षितता हीच आमची प्राथमिकता असल्याचे भारतीय दूतावासकडून सांगण्यात आले आहे, तसेच तुम्ही जर भारतीय दूतावासकडे सुरक्षितपणे पोहचू शकत असाल तर तिकडे पोहचण्याचा प्रयत्न करा असेही आवाहन करण्यात आले आहे. तसेच भारतयी नागरिकांनी या युद्धकाळात धीर ठेवण्याबरोबरच आम्ही तुमच्या मदतीसाठी 24 तास बांधिल आहोत असेही सांगण्या आहे.
संबंधित बातम्या
रशियाचे राष्ट्राध्यक्ष आहेत 160 अब्ज पौंड संपत्तीचे मालक; अलिशान कारची संख्या ऐकून थक्क व्हाल