WITT 2025: Tv9च्या मंचावर कलाकारांची मांदियाळी! यामी गौतम-विजय देवरकोंडा लावणार चार चाँद
टीव्ही 9 नेटवर्कच्या व्हाट इंडिया थिंक्स टुडे कार्यक्रमात मनोरंजन विश्वातील अनेक नामवंत व्यक्ती सहभागी होणार आहेत. साऊथ इंडस्ट्रीतील सुपरस्टार विजय देवरकोंडा, बॉलीवूड अभिनेत्री यामी गौतम आणि आपल्या कामाने सर्वांची मने जिंकणारा अभिनेता अमित साध आणि जिम सरभ देखील सहभागी होणार आहेत.

देशातील सर्वात मोठे न्यूज नेटवर्कने Tv9ने आपल्या ‘व्हॉट इंडिया थिंक्स टुडे ग्लोबल समिट 2025’ कार्यक्रमाचे आज, २८ मार्च रोजी आयोजन केले होते. हा कार्यक्रम २ दिवस चालणार आहे. या कार्यक्रमाला राजकीय क्षेत्रातील व्यक्तींपासून ते मनोरंजन क्षेत्रातील दिग्गज देखील सहभागी होणार आहेत. प्रत्येकजण वेगवेगळ्या मुद्द्यांवर आपली मते मांडतील.
साऊथचा सुपरस्टार विजय देवरकोंडा
‘व्हॉट इंडिया थिंक्स टुडे ग्लोबल समिट 2025’ या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी. याशिवाय मनोरंजन जगतातील अनेक दिग्गज चेहरे आज या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. साऊथ इंडस्ट्रीतील सुपरस्टार विजय देवरकोंडा संध्याकाळी 6 वाजून 40 मिनिटांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे. विजयसोबतच्या सेगमेंटला ‘विजय’ पाथ ऑफ सिनेमा असे नाव देण्यात आले आहे. आज साऊथ स्टारसोबत स्टारडमच्या मुद्द्यावर चर्चा होणार आहे.
अमित साध आणि जिम सरभ
छोट्या पडद्यासोबतच मोठ्या पडद्यावरही आपली छाप सोडणारा अभिनेता अमित साधने आपल्या कामाने सर्वांची मने जिंकली आहेत. अमितचा आज चाहता वर्ग मोठा आहे. पण त्याने आयुष्यात खूप संघर्ष केला आहे. सलमान खान आणि अक्षय कुमार सारख्या बड्या स्टार्ससोबत काम केलेल्या अमित साधला आज कोणत्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही. अमित साध आणि जिम सरभ देखील संध्याकाळी 7 वाजून 15 मिनिटांनी TV9 च्या महामंचावर उपस्थित राहणार आहेत. ‘पद्मावत’मध्ये ‘मलिक काफूर’ची भूमिका करून सर्वांचे लक्ष वेधून घेणारा जिम सरभ छोट्या छोट्या पात्रांमध्येही जीव ओततो. 2016 मध्ये रिलीज झालेल्या ‘नीरजा’ चित्रपटातून जिमने बॉलिवूडमध्ये करिअरला सुरुवात केली होती. आत्तापर्यंत त्याने अनेक चित्रपट तसेच शॉर्ट फिल्म्समध्ये काम केले आहे.
यामी गौतमही सहभागी होणार आहे
बॉलिवूड इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री यामी गौतमने मोठ्या पडद्यावर अशा अनेक व्यक्तिरेखा साकारल्या आहेत, ज्यांनी प्रेक्षकांना खूप प्रभावित केले आहे. मोठ्या पडद्यावर आव्हानात्मक कथा सादर करणाऱ्या अभिनेत्रींपैकी यामी एक आहे. आज यामी गौतम संध्याकाळी 7 वाजून 45 मिनिटांनी ‘व्हॉट इंडिया थिंक्स टुडे’च्या मंचावर सर्वांसोबत आपले विचार शेअर करताना दिसणार आहे.